करिअर

शिक्षण अर्धवट सोडून १५ वर्षे करतेय अभिनय, दीपिका पदुकोणच्या करिअरविषयी जाणून घ्या

Deepika Padukone Education Details: बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणने अभिनय क्षेत्रात १५ वर्षे पूर्ण केली आहेत. तिच्या मेहनतीमुळे बॉलिवूड इंडस्ट्रीत तिने विशेष स्थान मिळवले आहे. कोणतीही फिल्मी पार्श्वभूमी नसताना तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. दीपिका पदुकोणचा जन्म भारतात झाला नाही हे फार कमी जणांना माहिती असेल. दरम्यान तिच्या शैक्षणिक प्रवासाविषयी जाणून घेऊया.दीपिका पदुकोण २००६ पासून बॉलिवूड इंडस्ट्रीत सक्रिय आहे तिची …

Read More »

YCMU: पुनर्परीक्षार्थींसाठी शेवटची संधी

म. टा. प्रतिनिधी, नाशिकयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत पुनर्परीक्षार्थींना ऑनलाइन परीक्षा अर्ज भरण्यासाठी १२ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यानंतर कोणत्याही कारणास्तव मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे विद्यापीठामार्फत स्पष्ट करण्यात आले असून, हे अर्ज दाखल करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे केवळ चार दिवसांचा अवधी आहे. मुक्त विद्यापीठामार्फत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या हिवाळी सत्र परीक्षांची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, यासाठी पुनर्परीक्षार्थी असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन …

Read More »

Bank Clerk Vacancy: देशभरातील विविध बँकांत क्लर्कची पदे रिक्त

म.टा. प्रतिनिधी, नागपूरदेशभरातील विविध राष्ट्रीयीकृत बँकांचा विचार करता सर्वच शाखांमध्ये क्लर्कचा तुटवडा जाणवत आहे. नियमित भरती प्रक्रिया होत नसल्याने मनुष्यबळाचा अभाव जाणवत असल्याची टीका बँक कर्मचारी संघटना करीत आहेत. कर्मचारी भरती थांबलेली असून कामांचा बोझा वाढला आहे. सुमारे ४५ कोटी जनधन खाती उघडण्याचे काम बँक कर्मचाऱ्यांनी केले. त्यांना रूपे कार्ड देणे, आधार लिंकअप करण्याचा संपूर्ण भार बँकेवर होता. त्यात भरीस …

Read More »

आप, शिवसंग्राम, ठाकरे गट ते शिंदे गट; दिपाली सय्यद यांच्या करिअरविषयी जाणून घ्या

Deepali Sayyad Career: दिपाली सय्यद हे नाव राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेत आहेत. ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यामध्ये आपण मध्यस्थी घडविणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. दरम्यान आता त्या आता शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. मराठी अभिनेत्री ते शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या दीपाली सय्यद यांच्या शिक्षण आणि राजकीय प्रवासाविषयी जाणून घेऊया.दिपाली भोसले सय्यद यांचा जन्म १ एप्रिल १९७८ साली बिहारमध्ये झाला. …

Read More »

केंद्रीय विद्यालयांमध्ये ४,०१४ विविध पदांची भरती, ‘येथे पाठवा अर्ज

KVS Recruitment 2022: केंद्रीय विद्यालयांमध्ये नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. येथे बंपर रिक्त पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदभरतीअंतर्गत एकूण ४०१४ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. केंद्रीय विद्यालय संघटना (KVS) मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा (LDCE) २०२२ द्वारे विविध विषयांसाठी प्राचार्य, उप-प्राचार्य, विभाग अधिकारी, वित्त अधिकारी, टीजीटी आणि पीजीटी आणि मुख्याध्यापक या पदांची भरती केली जाणार आहे. या …

Read More »

शाळा बंदच्या निर्णयावर आंदोलन करुन उपयोग नाही, आता जिल्हा परिषदेनेच शोधला नवा पर्याय

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यातील जिल्हा परिषदांच्या वीसपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर पुणे जिल्हा परिषदेने नवा पर्याय शोधला आहे. वेल्हे तालुक्यातील १६ शाळांचे एकत्रीकरण करून एकच शाळा सुरू करण्याचा नवा प्रयोग साकारला जात आहे. पुणे जिल्ह्यात अनेक दुर्गम भाग आहेत. त्या ठिकाणी कमी लोकसंख्येची गावे, वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वीसपेक्षा कमीच असल्याचे …

Read More »

Sudha Murthy: इंजिनीअर, लेखिका ते इन्फोसिसच्या सर्वेसर्वा; सुधा मुर्ती यांच्या प्रेरणादायी करिअरविषयी जाणून घ्या

Sudha Murthy Education: इंजिनीअर, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेखिका सुधा मूर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी कर्नाटकातील शिगगाव येथे झाला. भारतीय अभियांत्रिकी शिक्षिका आणि कन्नड आणि इंग्रजी भाषेतील भारतातील प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांनी संगणक शास्त्रज्ञ आणि अभियंता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्या इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा आणि गेट्स फाउंडेशनच्या सार्वजनिक आरोग्य सेवा उपक्रमांच्या सदस्या आहेत. त्यांनी अनेक अनाथाश्रमांची स्थापना …

Read More »

Sudha Murthy Books: सुधा मुर्तींची ही ९ पुस्तके तुमचं आयुष्य बदलून टाकतील

Sudha Murthy Books: सुधा मूर्ती या खूप प्रभावशाली लेखिका आहेत आणि सुधा मूर्ती यांनी त्यांच्या जीवनातील अनुभव पुस्तकांच्या (Sudha Murthy Books) माध्यमातून मांडले आहेत. सामान्य माणसाच्या व्यथा मांडणाऱ्या आठ कादंबऱ्याही त्यांनी लिहिल्या आहेत. या सर्व कादंबऱ्यांमध्ये स्त्री पात्रे अतिशय कणखर आणि तत्त्वांवर ठाम असल्याचे दाखवले आहे. याशिवाय त्यांनी तांत्रिक पुस्तके, प्रवास, लघुकथांचे संग्रह आणि नॉन-फिक्शन तुकडे, तसेच लहान मुलांसाठी इंग्रजी …

Read More »

India Post Recruitment: दहावी, बारावी उत्तीर्णांना पोस्ट खात्यात नोकरीची संधी

Indian Post Recruitment: भारतीय टपाल विभागाने महाराष्ट्र सर्कलसाठी रिक्त जागा प्रसिद्ध केल्या आहेत. याअंतर्गत दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवार भारतीय टपाल विभागात सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइट dopsportsrecruitment.in वर अर्ज करावा लागेल. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.भारतीय टपाल …

Read More »

Scholarship Result: पाचवी, आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर

5th 8th scholarship Result: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल जाहीर करण्यात आला आहे. ही परीक्षा ३१ जुलै २०२२ रोजी घेण्यात आली होती.या परीक्षेला …

Read More »

PET Exam: क्लिष्ट प्रश्नांमुळे ‘पेट’ने फोडला घाम

म. टा. प्रतिनिधी, पुणेसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पीएचडी प्रवेशांसाठी घेण्यात आलेल्या ‘पेट’ प्रवेश परीक्षेची काठिण्यपातळी विद्यार्थ्यांना अधिक जाणवल्याने, त्यांना प्रश्न सोडवताना घाम फुटला. पेट परीक्षा सुरळीत पार पडली असली, तरी प्रश्नपत्रिका मराठीत उपलब्ध न झाल्याने काही विद्यार्थ्यांना प्रश्न समजून घ्यायला अधिक वेळ द्यावा लागला. मात्र, परीक्षेसाठी पुरेसा वेळ असल्याने, विद्यार्थ्यांनी पूर्ण प्रश्न सोडविले. यापुढील परीक्षेसाठी विद्यापीठाने इंग्रजीसोबतच मराठीत प्रश्न उपलब्ध …

Read More »

आर्थिक निकषांनुसार नोकरी व शिक्षणात आरक्षण, निर्णयाबद्दल जनतेला काय वाटतं?

म. टा. प्रतिनिधी, नाशिकसर्वोच्च न्यायालयाने आर्थिक दुर्बल घटकांना (ईडब्लूएस) नोकरी आणि शैक्षणिक प्रवेशांसाठी दहा टक्के आरक्षणाच्या वैधतेवर निकाल दिला आहे. १०३ व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून ही आरक्षणाची तरतूद वैध ठरवण्यात आली आहे. खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनाच त्याचा लाभ होणार आहे. यामुळे ‘ईडब्लूएस’ आरक्षणासंदर्भातील या निर्णयाचे सर्व घटकांतून स्वागत होत आहे. विद्यार्थ्यांसह तज्ज्ञ, कार्यकर्ते, राजकीय नेत्यांनी त्यावर भाष्य केले असून, शिक्षण-नोकरीचा मार्ग …

Read More »

PMC Recruitment: पुणे महापालिकेत पुन्हा भरती, जाणून घ्या तपशील

म. टा. प्रतिनिधी, पुणेराज्यात सध्या नोकरभरती करणारी पुणे ही एकमेव महानगरपालिका ठरली आहे. महापालिकेने नुकतीच ४४८ जागांची भरती यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यानंतर लगेचच २०० जागांसाठीची पुढील भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी दिली. याशिवाय अग्निशमन विभागातील जवानांचीही स्वतंत्र भरती; तसेच ‘इंजिनीअर केडर’मध्येही वाढ करण्यात येणार आहे. वादाशिवाय प्रक्रिया पूर्ण महापालिकेने २० जुलैपासून ४४८ …

Read More »

Abdul Sattar Education Details: राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार कितवी शिकलेयत? जाणून घ्या

Abdul Sattar Education Details: राज्याचे कृषीमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. त्यांच्या या स्वभावामुळे ते अनेकदा वादाच्या केंद्रस्थानी असतात. त्यांच्या राजकीय प्रवासातील अनेक बाबी सर्वांना माहिती आहेत. दरम्यान आपण त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दिविषयी जाणून घेऊया. अब्दुल सत्तार यांचा जन्म १ जानेवारी १९६५ रोजी एका छोट्या गावात झाला. एका लहान आणि गरीब कुटुंबात ते लहानाचे …

Read More »

NEP ची अंमलबजावणी करण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आघाडीवर

पुणे : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या हेतूने, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने एक पाऊल पुढे टाकले असून, अभ्यासक्रमाच्या श्रेयांक पद्धतीनुसार (क्रेडिट सिस्टीम) विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारण्यात येणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी काही क्रेडिटचे शिक्षण विद्यार्थी इतर ठिकाणी किंवा शैक्षणिक प्लॅटफॉर्मवर घेत असल्यास, त्याचे शुल्क संबंधित ठिकाणी भरण्याची मुभा मिळेल. त्यामुळे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने नावीन्यपूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध …

Read More »

School Closed: ‘मराठी शाळा बंद करण्याविरोधात लढ्याची गरज’

म. टा. प्रतिनिधी, मुंबईमुंबई महानगरपालिकेच्या शाळा बंद करून त्या जागी सीबीएसई, आयसीएसई, आयबी बोर्डाच्या शाळा सुरू केल्या जात आहेत. यासाठी ‘बायजू’सारख्या खासगी संस्थेशी करार केले जात आहेत. मात्र या शाळांमध्ये मराठी माध्यमात शिकलेल्या व्यक्तींना नोकऱ्या दिल्या जात नाहीत. त्यामुळे या धोरणाच्या विरोधात न्यायालयीन आणि रस्त्यावरची लढाई लढली पाहिजे, असा सूर राज्यस्तरीय शिक्षण परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केला. मराठी अभ्यास केंद्र संलग्न …

Read More »

‘बाहुबली’ फेम अनुष्का शेट्टीचा योग ट्रेनर ते अभिनय असा प्रवास, कितवी शिकलीय? जाणून घ्या

Anushka Shetty’s Education Details: साऊथ इंडियन अभिनेत्री अनुष्का शेट्टीचा ७ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असतो. तिने आपल्या सौंदर्य आणि अभिनयाने एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘बाहुबली’मध्ये ‘देवसेना’ ही भूमिका साकारल्यानंतर ती घराघरात पोहोचली. तिच्या सिनेमांतील अभिनयाची सगळीकडे चर्चा सुरु असते. दरम्यान तिच्या शैक्षणिक कारकिर्दिवर एक नजर टाकूया. अनुष्काने ज्याप्रमाणे दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तिने स्वत:ची ओळख निर्माण केली तशी ती अभ्यासातही कुणापेक्षा …

Read More »

Facebook lay off: ट्विटरनंतर आता फेसबुकमध्ये कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार

Facebook lay off: ट्विटरनंतर आता दिग्गज सोशल मीडिया कंपनी फेसबुकनेही मोठ्या प्रमाणात कपातीची तयारी केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फेसबुकची मूळ कंपनी मेटा प्लॅटफॉर्म हजारो कर्मचाऱ्यांना बुधवारपासून कामावरून काढण्यास सुरुवात करणार आहे. मेटा कंपनी जगभरातील १२ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची शक्यता आहे. मेटामध्ये सध्या साधारण ८७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. याआधी शुक्रवारी ट्विटरने जगभरातील ३ हजार ७०० कर्मचाऱ्यांना काढून टाकले …

Read More »

आता पाठ्यपुस्तकांसोबत वह्याही मोफत मिळणार, शालेय शिक्षणमंत्र्यांचा मोठा निर्णय

म. टा. प्रतिनिधी, पुणे‘विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी करण्याबाबत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अनेक विद्यार्थ्यांना वह्या घेणे शक्य होत नाही. त्यामुळे पुढील वर्षापासून पुस्तकासोबत वह्याही सरकारमार्फत मोफत देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. यापुढे पाठ्यपुस्तकांमध्ये प्रत्येक पानासोबत एक कोरे पान दिले जाईल. त्यामुळे विद्यार्थ्याला सराव करता येईल व शाळेत अतिरिक्त वही नेण्याची …

Read More »

उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी आनंदाची बातमी, सत्तेत आल्यास दुचाकी भेट देण्याचे आश्वासन

वृत्तसंस्था, प्रस्वान-प्रागपूर (हिमाचल प्रदेश)मोफत सवलतींची रेवडी अशी खिल्ली पंतप्रधानांकडून उडवली जात असतानाच हिमाचल प्रदेशात मात्र, भारतीय जनता पक्षाने सहावी ते बारावीपर्यंत शिक्षण घेण्यासाठी मुलींना सायकल आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी दुचाकी भेट देण्याची योजना जाहीर केली आहे. ‘हिमाचल प्रदेशामध्ये भाजपने सत्तेत पुनरागमन केल्यास समान नागरी कायद्याची अंमलबजावणी केली जाईल,’ असे वचन केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी रविवारी दिले. हिमाचल प्रदेश निवडणूक …

Read More »