करिअर

Part Time PhD: आता पार्ट टाइम पीएचडी करणे शक्य, आवश्यक कागदपत्रांची माहिती करुन घ्या

Part Time PhD: विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे (university grants commission) आयआयटीची प्रणाली अंगीकारली जाण्याची शक्यता आहे. यूजीसीकडून IIT प्रणालीनुसार अर्धवेळ पीएचडी अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे. यूजीसीचे उपाध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी यासंदर्भातील संकेत दिले. जगातील नामांकित विद्यापीठांमध्ये देखील अर्धवेळ पीएचडी अभ्यासक्रम आयोजित केले जातात. अंश-वेळ पीएचडी अभ्यासक्रमांमध्ये, विद्यापीठाचे प्राध्यापक सदस्य पीएचडी विद्यार्थ्यांचे सुपरवायझर असतात. विद्यार्थी त्यांच्या पर्यवेक्षकाच्या …

Read More »

Territorial Army मध्ये ऑफिसर बनण्याची संधी, पात्रता आणि पगार जाणून घ्या

Territorial Army Recruitment 2022: प्रादेशिक सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी महत्वाची बातमी आहे. यासाठी (Territorial Army), टेरिटोरियल आर्मीने ऑफिसर्सची पदे भरण्यासाठी अर्ज मागवले आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अधिकृत वेबसाइट joinerritorialarmy.gov.inवर जाऊन अर्ज करता येणार आहे. वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (Territorial Army Recruitment 2022) १ जुलैपासून सुरू झाली आहे.याशिवाय, उमेदवार www.jointerritorialarmy.gov.in या लिंकवर …

Read More »

‘ही’ कंपनी देतेय ३५ हजार नोकऱ्या; तेही Experience किंवा Resume शिवाय!

युरोपातील (Europe) प्रमुख हॉटेल्समध्ये (Hotel) सध्या कर्मचाऱ्यांची खूपच वानवा आहे. ही समस्या सोडवण्यासाठी युरोपातील प्रमुख हॉटेलांची चेन आता कुठल्याही अनुभवाशिवाय किंवा कुठल्या रेझ्युमेशिवाय कर्मचाऱ्यांना नोकरी देण्यास तयार होत आहे. हॉटेलांचे अधिकारीही हे मानत आहेत, की कमी पगारात कर्मचारी ठेवल्यामुळे त्यांना खूप नुकसान सोसावे लागत आहेत. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, करोनानंतर वाढलेली टूरिस्टची संख्या आणि त्याअनुषंगाने वाढलेली मागणी पूर्ण करताना युरोपातील हॉटेलांच्या …

Read More »

NEP: दहावी, बारावीचा परीक्षा पॅटर्न बदलणार? जाणून घ्या तपशील

Board Exam: दहावी, बारावीच्या परीक्षा या आपल्या करिअरचा पाया मानला जातो. विद्यार्थ्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत नेहमीच चिंता असते. विद्यार्थ्यांसोबतच पालकांवरही या परीक्षांचा ताण असतो. दहावी, बारावीच्या परीक्षा धाकधूक वाढविणाऱ्या असतात असे तुम्हाला देखील वाटत असेल सरकारपर्यंत आपले मत तुम्ही पोहोचवू शकता. नवीन शैक्षणिक धोरण (New Education Policy, NEP) अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार केला जात आहे. शालेय शिक्षण अधिक …

Read More »

‘नेट’दरम्यानचे पुणे विद्यापीठाचे पेपर पुढे ढकला; विद्यार्थ्यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक‘नॅशनल इलिजिबिलिटी टेस्ट’ (NET) दरम्यान येणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (SPPU) पदव्युत्तर विभागाच्या परीक्षांचे पेपर पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांमार्फत केली जात आहे. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला मेलही पाठविले असून, यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली जात आहे. विद्यापीठामार्फत २० जूनपासून शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात करण्यात आली आहे. या परीक्षा अद्याप सुरू …

Read More »

राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय खेळाडूंकरता पुणे विद्यापीठाची पर्यायी परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणेराष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणारे खेळाडू, राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना यांच्या राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील उपक्रमांमध्ये सहभागी होणारे विद्यार्थी; तसेच विद्यापीठाने मान्यता दिलेल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची पर्यायी परीक्षा घेण्याचा निर्णय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University, SPPU) परीक्षा व मूल्यमापन मंडळाकडून घेण्यात आला आहे. पर्यायी परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या …

Read More »

दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळेत मूळ गुणपत्रिकांचे वाटप

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळामार्फत (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेची मूळ गुणपत्रके (SSC Marksheets) अखेर विद्यार्थ्यांना शाळांमार्फत सोमवारी मिळाली. मंडळामार्फत १७ जूनला ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर जवळपास १७ दिवसांनी विद्यार्थ्यांना गुणपत्रके देण्यात आली. अनेक शाळांनी सोमवारी गुणपत्रिका दिल्या तर काही शाळा आज मंगळवारी गुणपत्रिकांचे वाटप विद्यार्थ्यांना करणार आहेत.सोमवारी सकाळी अकरा वाजेपासून मंडळामार्फत संबंधित …

Read More »

Coal India मध्ये विविध पदांची भरती, अर्ज प्रक्रिया जाणून घ्या

Coal India MT Recruitment 2022: कोल इंडिया लिमिटेडमध्ये (Coal India Recruitment) नोकरीची संधी शोधत असणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. कोल इंडियामध्ये मॅनेजमेंट ट्रेनी पदांची (Management Trainee) भरती केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ४८१ रिक्त पदे भरली जाणार आहेत. यामध्ये वैयक्तिक आणि एचएआरमध्ये (Personal And HAR) १३८ पदे, पर्यावरणातील (Environment) ६८, मटेरियल मॅनेजमेंटमध्ये (Material Management) ११५, मार्केटिंग आणि सेल्समध्ये …

Read More »

Technical Course शिकणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, हिंदी माध्यमातही उपलब्ध होणार पुस्तके

Hindi medium books: हिंदी माध्यमातून इंजिनीअरिंग आणि पॉलिटेक्निकचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑल इंडिया काऊन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशनने (All India Council of Technical Education, AICTE) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तांत्रिक आणि विज्ञानाची पुस्तके तयार केली आहेत. या पुस्तकांमध्ये इंजिनीअरिंगची नऊ पुस्तके आणि गणित (Mathematics), भौतिकशास्त्र (Physics)आणि रसायनशास्त्रासह (Chemistry) ११ पॉलिटेक्निक (Polytechnic) पुस्तकांचा समावेश आहे. या पुस्तकांचे प्रकाशन विज्ञान …

Read More »

अकरावी ऑनलाइन प्रवेशांसाठी विद्यार्थ्यांचे वेट अँड वॉच

म. टा. प्रतिनिधी, पुणेकेंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) दहावीचा निकाल जाहीर होत नसल्याने, शालेय़ शिक्षण विभागाला अकरावी प्रवेश प्रक्रियेतील (11th Online Admission 2022) अर्जाचा दुसरा टप्पा (भाग दोन भरणे) सुरू करता येत नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशासाठी आतुर असणारी पुणे, पिंपरी-चिंचवडसह राज्यातील शेकडो विद्यार्थी ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत. दरम्यान, ‘सीबीएसई’चा दहावीचा निकाल जाहीर झाल्यावर तातडीने भाग दोन …

Read More »

BRO Job 2022: बहु-कुशल कामगार भरतीसाठी ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज, ५५ हजारपर्यंत मिळेल पगार

BRO Recruitment 2022: बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने मल्टी स्किल्ड वर्कर (BRO Recruitment 2022) पद भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे. यापूर्वी, या पदांच्या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २२ जून होती आणि आता ती २२ जुलै २०२२ पर्यंत वाढली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट www.bro.gov.in वर जाऊन आपला अर्ज भरू शकतात. मल्टी स्किल्ड वर्करच्या पदांवर भरतीद्वारे मेसन …

Read More »

IGNOU July Session 2022: इग्नू जुलै सत्राच्या री-रजिस्ट्रेशनला मुदतवाढ

IGNOU July Session 2022: इग्नू जुलै सेशनसाठी री-रजिस्ट्रेशनला मुदतवाढ मिळाली आहे. इंदिरा गांधी नॅशनल ओपन यूनिवर्सिटीने (Indira Gandhi National Open University) इग्नू जुलै सत्र 2022 नोंदणीची तारीख वाढवली आहे. या अंतर्गत, आता या सत्रासाठी १५ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. जे उमेदवार या सत्रासाठी अर्ज करू इच्छितात, ते इग्नूची अधिकृत वेबसाइट ignou.ac.in च्या माध्यमातून अर्ज करू शकतात. याव्यतिरिक्त उमेदवार …

Read More »

CBSE 10th Result 2022: वेबसाइट क्रॅश झाली, तर ‘येथे’ पाहा दहावीचा निकाल

CBSE 10th Result 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) लवकरच दहावी बोर्डाच्या टर्म-2 परीक्षेचा निकाल जाहीर करेल. CBSE च्या अधिकृत वेबसाईट cbse.gov.in वर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होईल. याशिवाय विद्यार्थी cbseresults.nic.in ला भेट देऊ शकतात. तथापि, इतर अनेक मार्ग आहेत ज्याद्वारे विद्यार्थी त्यांच्या बोर्ड परीक्षेचे निकाल तपासू शकतात. CBSE 10th Result 2022: CBSE डिजिलॉकर अॅपच्या मदतीने,गेल्या वर्षीप्रमाणे, यावेळी देखील CBSE बोर्ड …

Read More »

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे विविध पदांची भरती

संजय मोरे महाराष्ट्र सरकारच्या विविध विभागांतर्गत ८०० पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) ८ ऑक्टोबरला परीक्षा घेण्यात येणार आहे.१. सामान्य प्रशासन विभाग- सहाय्यक कक्ष अधिकारी गट-ब (अराजपत्रित)- ४२ पदं २. वित्त विभाग- राज्य कर निरीक्षक गट-ब (अराजपत्रित)- ७७ पदं ३. गृह विभाग- पोलिस उपनिरीक्षक गट-ब (अराजपत्रित)- ६०३ पदं ४. महसूल आणि वन विभाग- दुय्यम निबंधक (श्रेणी १)/ मुद्रांक निरीक्षक गट-ब …

Read More »

झेडपीचे विद्यार्थी जपानी भाषेचे परीक्षार्थी!!

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादउच्च शिक्षण व नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या परीक्षार्थ्यांसोबतच जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनीही जपानी भाषेची परीक्षा दिली अन्‌ इतर परीक्षार्थी, पर्यवेक्षकही अवाक झाले. हा अनुभव होता गाडीवाट जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचा. जपान सरकारद्वारे रविवारी जपानी भाषा प्रावीण्य चाचणी (JLPT) परीक्षा झाली. गाडीवाट शाळेतील पाच विद्यार्थ्यांनी या परीक्षेचा पहिला टप्पा ‘एन५’ला हजेरी लावली. विविध परकीय भाषांचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. …

Read More »

CBSE 10th Result 2022: सीबीएसई दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता

CBSE Class 10th Result 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी ४ जुलै रोजी जाहीर केला जाण्याची दाट शक्यता आहे. या दृष्टीने बोर्ड अधिकाऱ्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र निकालाच्या तारखेसंबंधी बोर्डाकडून अधिकृत घोषणा केलेली नाही. यंदा ही परीक्षा कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर दोन सत्रात आयोजित करण्यात आली होती.सीबीएसई १० वी टर्म २ निकाल पुढील पद्धतीने …

Read More »

दोन्ही हात गमावल्यानंतर पायाने लिहीली परीक्षा, नंदलालला आयएएस व्हायची इच्छा

Nandlal Story: आपले ध्येय पक्के असेल, मेहनत करण्याच्या तयारीला जिद्द आणि प्रामाणिकपणाची जोड असेल तर यश मिळविण्यापासून तुम्हाला कोणी रोखू शकत नाही. अशी अनेक उदाहरणे आपल्या देशात आहेत. बिहारमधील नंदलाल या वेगळ्या दिव्यांग विद्यार्थ्याची सध्या चर्चा होत आहे. त्याने आपल्या दिव्यांगपणाचा बाऊ न करता अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. एवढंच नव्हे तर भविष्यात आयएएस होण्याची त्याची इच्छा आहे. नंदलालला दोन्ही …

Read More »

दहावी, बारावीनंतर Polytechnicमध्ये घ्या प्रवेश, मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

Career and Jobs After Polytechnic: सरकारी नोकऱ्या आणि करिअरसाठी पॉलिटेक्निक डिप्लोमा कोर्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. वास्तविक, पॉलिटेक्निक अभ्यासाच्या क्षेत्रात रोजगाराच्या दृष्टिकोनातून प्रचंड क्षमता आहे. हा तांत्रिक अभ्यासक्रम घेऊन विद्यार्थी विविध क्षेत्रात सरकारी नोकऱ्या करू शकतात, मोठ्या खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये नोकरी मिळवू शकतात किंवा स्वयंरोजगार सुरू करू शकतात.दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच तरुणांना पॉलिटेक्निक प्रवेश परीक्षेद्वारे पॉलिटेक्निक …

Read More »

DRDO मध्ये परीक्षा न देताही मिळेल नोकरी, पात्रता निकष जाणून घ्या

DRDO Recruitment 2022: डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट (Defense Research and Development, DRDO) ने डिफेन्स बायोइंजिनियरिंग आणि इलेक्ट्रोमेडिकल लॅबोरेटरी (Defense Bioengineering and Electromedical Laboratory, DEBEL) अंतर्गत जेआरएफ पदे (DRDO Recruitment 2022) भरण्यासाठी अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी (DRDO Job 2022) अर्ज करू इच्छिणारे इच्छुक आणि पात्र उमेदवार DRDO च्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया …

Read More »

CBSE Results 2022: सीबीएसईने लॉन्च केले ‘परीक्षा संगम’ टॅब; परीक्षांची सर्व माहिती एका पोर्टलवर

CBSE Results 2022: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) अर्थात सीबीएसईने आपल्या अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर एक नवा टॅब लॉन्च केले आहे. मंडळाने दिलेल्या माहितीनुसार नवा टॅब – परीक्षा संगम ( Pariksha Sangam), सर्व परीक्षाविषयक घडामोडींसाठी एक व्यापक वन-स्टॉप पोर्टल आहे. परीक्षा संगम पोर्टल Parikshasangam.cbse.gov.in चे तीन विभाग आहेत. स्कूल (Ganga), रीजनल ऑफिस (Yamuna) आणि हेड ऑफिस (Saraswati). हे नवे परीक्षा …

Read More »