राजकारण

‘पत्रकारांना चहा प्यायला न्यायला पहिजे म्हणजे…’; त्या’ वादग्रस्त विधानावर बावनकुळेंचं स्पष्टीकरण!

Maharashtra Politics : भाजपाच्या (BJP) ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र यावेळी बोलताना त्यांनी केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहाला घेऊन, जा धाब्यावर घेऊन जा असा सल्ला दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी दिलेल्या या अजब …

Read More »

भंडाऱ्यात अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला, प्रेत सोडून नातेवाइकांनी काढला पळ; शेकडो जखमी

प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हाच्या तुमसर तालुक्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला (Bee Attack) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात अंत्ययात्रेसाठी आलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे तब्बल 200 लोक जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह रस्त्यावर सोडून पळ काढावा लागला आहे. आधीच मुलाच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या कुटुंबावर या हल्ल्यानंतर आणखी एक मोठा आघात …

Read More »

पुण्यात गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला; 100 जणांना घेतला चावा

Ganesh Visarjan 2023 :  गणपती विसर्जनासाठी गेलेल्या नागरिकांवर मधमाशांचा हल्ला केला आहे.  पुण्याच्या भोर तालुक्यातील हिर्डोशी गावात, नीरा देवघर धरण परिसरात हा प्रकार घडला आहे. हिर्डोशी‌ येथील स्मशानभूमीशेजारी विसर्जनावेळी भाविकांवर मधमाशांनी अचानक हल्ला केला  लहान मुलांसह, महिला आणि पुरुष अशा 100 हून अधिक जणांचा मधमाशांनी चावा घेतला. यामुळे एकच गोंधळ उडाला आणि पळापळ झाली.  गणपती विसर्जन न करताच अनेकजण निघून …

Read More »

खेड रेल्वे स्टेशनवर राडा, ट्रेनमधे चढण्यासाठी संघर्ष; कोकणातून परत येणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल

Konkan Ganeshotsav : गणेशोत्सावसाठी कोकमात गेलेल्या चाकरमान्यांचे परतीच्या प्रवासातही प्रचंड हाल होत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तर, रेल्वेही हाऊसफुल्ल झाल्या आहेत. गणपती स्पेशल ट्रेनही उशिराने धावत असल्याने हजारो प्रवासी खोळंबले आहेत. खेड रेल्वे स्टेशनवर प्रवाशांचा जोरदार राडा झाला. प्रवाशांनी एकमेकांना मारहाण केल्याची माहितीही समोर आली आहे.   खेड रेल्वे स्टेशनवर राडा खेड रेल्वे स्टेशनवर प्रवशांचा तुफान राडा …

Read More »

रविवारच्या सुट्टीत घराबाहेर पडताय? हवामान विभागाची पावसाबद्दल महत्वाची अपडेट

Heavy Rain in Maharashtra: रविवारची सुट्टी आणि गणेशोत्सव सुरु असताना आज सर्वजण घराबाहेर पडतील. पण घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाने दिलेली महत्वाची अपडेट जाणून घ्या. हवामान विभागाने  यलो अलर्ट जाहीर केला आहे. असे असले तरी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाचा जोर तुलनेत कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ (यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, …

Read More »

जिवंत बाळाला बॅगेत भरले आणि… नवी मुंबईत घडली धक्कादायक घटना

Navi Mumbai Crime News :  नवी मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. जिवंत बाळाला बॅगेत भरुन सोडून देण्यात आले आहे. बाळाच्या रडण्याचा आवाज आल्यानंतर या बॅगेत काय आहे ते उघडकीस आले. मात्र, बाळ असलेली बॅग ठेवून गुपचूप पलायन करणारा व्यक्ती CCTV कॅमेऱ्यात कैद झाला आहे.  नवी मुंबईतीस   घणसोली येथील सेक्टर 3 लक्ष्मी हॉस्पिटल आणि वनलाईट फिटनेस हब यामध्ये असलेल्या कॉमन …

Read More »

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस, पुरात तिघांचा मृत्यू; नुकसानग्रस्तांना 10 हजारांची मदत जाहीर

Nagpur Rain: नागपुरात पडलेल्या ढगफुटीसदृश पावसाने कहर केला आहे.  2 तासांत 90 मिमी पाऊस पडल्याने महापूर आला.अंबाझरीमध्ये पावसाचं पाणी घरांमध्येही शिरलं. या पुराच्या पाण्यात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला. नागपूर शहरात आज झालेल्या मुसळधार पावसाने प्रचंड नुकसान झालंय. नुकसानग्रस्तांना 10 हजारांची तर दुकानदारांना 50 हजारांपर्यंत मदत जाहीर करण्यात आलेय.  अंबाझरीमध्ये  अनेक रस्ते, घरं पाण्याखाली गेली. नागपूर शहरातल्या पूरस्थितीचा  आणि झालेल्या नुकसानीचा आढावा …

Read More »

गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमात शरद पवार; नेमकं चाललयं तरी काय?

Sharad Pawar Gautam Adani : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. शरद पवार यांनी देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींच्या घरगुती कार्यक्रमाला हजेरी लावली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. वंचित बहुजन आघाडीने शरद पवार आणि गौतम आदानी यांच्या भेटीवर टीका केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसवर देखील निशाणा साधला आहे.  गौतम अदानींच्या पॉवरप्लांटचं शरद पवारांच्या …

Read More »

‘पवार साहेबांनी 3 वेळा कर्करोगाशी झुंज दिली अन्…’, शिवसेनेचा उल्लेख करत सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला!

Supriya Sule On BJP : अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडली अन् महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा मिळाली. लोकसभेत सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाजपवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. त्यावेळी त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना देखील टोला लगावला होता. अशातच आता सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका करत भाजपला खडेबोल सुनावले आहेत. विरोधी पक्षांची आणि …

Read More »

Pune Rain News : पुणे शहरात मुसळधार पाऊस, पुढील 5 दिवसांसाठी अलर्ट जारी; ‘या’ भागांना झोडपलं!

Pune Rain News : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात काल दुपारपासून पावसाने जोरदार हजेरी (Pune Heavy Rainfall) लावल्याचं दिसून आलं होतं. अशातच पुण्यात आज सकाळपासून पावसाची संतधार सुरूच असल्याचं पहायला मिळतंय. तर कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात पुढील 3 ते 4 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात येतंय. पुण्याच्या (Pune News) कोथरूड, हडपसर, विद्यापीठ, विमाननगर भागात …

Read More »

नागपुरात ढगफुटीसदृश पाऊस! अंबाझरीत एका महिलेचा मृत्यू…लष्कर, NDRF, SDRFकडून रेस्क्यू ऑपरेशन

Nagpur Heavy Rain : नागपुरात मध्यरात्रीपासून पावसानं हाहाकार माजवलाय. मध्यरात्री ढगफुटी सदृश पाऊस (Cloudburst) पडलाय.. मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने (Heavy Rain) शहरात कहर केलाय. कधी नव्हे इतका पाऊस नागपुरात (Nagpur) झालाय. अनेक भागात पावसाचं पाणी घरांमध्येही शिरलंय. मोरभवन बसस्थानकात 12 ते 15 बसेस पावसाच्या पाण्यात अडकल्या होत्या. यात मध्यरात्री हॉल्ट करून थांबलेले चालक वाहक सुद्धा बसमध्ये अडकले होते त्यांची …

Read More »

Maharashtra Rain : नागपुरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; राज्यात पुढील 48 तास पावसाचे, हवामान विभागाचा इशारा

Maharashtra Rain : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार बरसणाऱ्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला असून, आता कोकण, विदर्भासह राज्यातील बहुतांश भागात तो बरसताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांत राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे. ज्यामुळं रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरात पावसाच्या तुरळक ते मुसळधार सरींची वर्तवली जात आहे. राज्यातल्या इतर भागांतही मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 आणि 26 सप्टेंबरला …

Read More »

घरबसल्या पैसे कमवण्याची संधी, झटपट पैसा.. सावधान! सायबर चोरीचा नवा फंडा

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : VO – वर्क फ्रॉम होम करुन पैसे कमवा, यू ट्युब व्हिडिओ लाईक करुन मालामाल व्हा, ऑनलाईन व्यवसाय सुरु करा लाखो कमवा, घरबसल्या कमाई करा, असे फोन तुम्हालाही आले असतील आणि तुमच्या मनातही झटपट पैसे कमवण्याचा विचार क्लिक झाला असेल, हे करुन बघूया असं तुम्हालाही वाटलं असेल तर सावधान व्हा. कारण तुमची फसवणूक होऊ शकते. …

Read More »

गौराईंचा आज पाहुणचार!…म्हणून गौराईसाठी दाखवला जातो मांसाहाराचा नैवेद्य, नेमकं कारण घ्या जाणून!

Gauri Pujan 2023 Naivedya : गणशोत्सवाची धूम सर्वत्र पाहिला मिळतेय. बाप्पाचा आगमनानंतर घरोघरी सोन्याच्या पावलांनी गौराईंचं (Gauri-Ganpati) आगमन झालं आहे. आज गौराईंना महानैवेद्य दाखविला जाणार आहे. काही भागात गौरीला मटण, कोंबडीवडे, अगदी चिंबोरी, मच्छीचं नैवेद्य (Gauri Naivedya) दाखवलं जाणार आहे. हिंदू धर्मात देवाला मासमच्छी वर्जीत असतं. अशामध्ये देवाच्या कामात गौराईंना नॉनव्हेजचं जेवण (gauri is offered non veg naivedya)  हे अनेकांना …

Read More »

घरात घुसून महिलेसह तिच्या मुलीवर वार केले आणि… मुंबईतील चेंबूरमध्ये घडली थरारक घटना

Mumbai Chembur Crime News : आईसोबत जात असलेल्या मुलीची भरदिवसा हत्या केल्याची खळबजनक घटना कल्याणमध्ये घडली होती. आता अशीच एक थरारक घटना मुंबईच्या चेंबुर परिसरात घडली आहे. चेंबूरमध्ये एका माथेफिरुने महिलेच्या घरात घुसून महिला आणि तिच्या मुलीवर वार करून स्वतः आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात चेंबूरच्या सेल कॉलनी परिसरात ही घटनी घडली आहे.  …

Read More »

रोगापेक्षा इलाज भयंकर! बाबा-बुवाच्या औषधांमुळे 10 रुग्णांच्या किडनी निकाम्या

विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : छत्रपत संभाजीनगरच्या एमजीएम रुग्णालयात (MGM Hospital) एका 33 वर्षीय महिलेवर उपचार सुरू आहे, या महिलेला  ताप आला होता उलट्या झाल्या होत्या. निदानात कावीळ (Jaundice) झाल्याचं पुढं आलं. ही महिला एका ठिकाणी काविळीची औषध घ्यायला गेली तिच्या नाकात काही ड्रॉप टाकण्यात आले आणि तिला काही पुड्या खायला देण्यात आल्या यामुळे  या महिलेच्या किडनीवर (Kidney) गंभीर …

Read More »

पुण्यात ‘अरेबियन नाईट्स’; परदेशी तरुणींचा विनापरवाना डान्स अन्…, सांस्कृतिक पुण्यात काय चाललंय?

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune News) काही हॉटेल, पब चालकांनी ‘अरेबियन नाईट्स’ च्या (arabian nights) नावे विदेशी तरुणींच्या नृत्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत. नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर नृत्याचे हे कार्यक्रम मद्यधुंद रात्र जागवत पहाटेपर्यंत होत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अशा कार्यक्रमांची जाहिरात करून ऑफर्सची खैरात केली जात असल्याचे समोर आलं आहे. तरुण-तरुणींना आकर्षित करून रात्रीच्या मैफिली …

Read More »

‘संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण…’; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका

Maharashtra Politics : राज्याचे महसूलमंत्री आणि अहमदननगर जिल्ह्यातील प्रवरा साखर कारखान्याचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या संस्थेत  झाकीर नाईक कडून पैसे आल्याचा गंभीर आरोप प्रवरा शेतकरी मंडळाच्या अध्यक्षांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. घोटाळ्यामधून सुटका व्हावी म्हणूनच हे लोक भाजपामध्ये गेले आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. …

Read More »

Maharashtra Rain : कुठे दमट वातावरण तर, कुठे मुसळधार; कसं आहे राज्यातील आजचं हवामान? पाहा…

Maharashtra Rain : मुंबईत पावसाची रिपरिप सुरु असून, मध्येच लख्ख सूर्यप्रकाश आणि मध्येच दाटून येणाऱ्या काळ्या ढगांची गर्दी हे असं चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. तिथं नवी मुंबई, ठाणे आणि पालघर पट्ट्यामध्येही परिस्थिती वेगळी नाही. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरींमुळं गणेशोत्सवाच्या निमित्तानं घराबाहेर पडणाऱ्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी काही दिवसांसाठी राज्यात पावसाचं असंच काहीसं …

Read More »

गणेशोत्सव पाहण्यासाठी मुंबईत येणाऱ्यांसाठी BMC ची हायटेक व्यवस्था; आधीच मंडळाकडून घेता येणार वेळ

ganesh visarjan 2023 :  गणेशोत्सवाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विविध सेवा सुविधा गणेशभक्तांसाठी उपलब्ध करून देण्यात येतात. या सुविधांमध्ये अद्ययावत व वापरास सुलभ अशा आणखी एका सुविधेची भर यंदा पडली आहे. मुंबईतील नागरिक आणि विशेषतः पर्यटक यांच्यासाठी नजीकचे गणपती मंडळ त्याचप्रमाणे गणेश भक्तांना देखील आपल्या नजीकचे मूर्ती विसर्जन स्थळ शोधण्याची सुविधा व्हॉट्स एप चॅटबॉट आणि महानगरपालिका संकेतस्थळ या दोन्ही माध्यमातून उपलब्ध …

Read More »