ताज्या

Maharashtra cabinet : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार या तारखेनंतर होणार !

मुंबई : Maharashtra cabinet expansion soon: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 11 जुलैनंतरच होण्याची शक्यता आहे. मंत्रिमंडळ विस्ताराची घाई न करता सर्वोच्च न्यायालयाच्या 11 जुलैच्या सुनावणीनंतरच तो करावा, असा विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप करत आहेत. (Maharashtra Cabinet expansion likely on July 11)  मंत्रिपदाच्या संधीसाठी परफॉर्मन्स फॉर्म्युला वापरण्यावर शिंदे आणि फडणवीस यांचं एकमत झाल्याचीही माहिती आहे. विभागीय निकषांसोबतच मंत्री म्हणून काम करण्याचा …

Read More »

किरीट सोमय्या यांची प्रताप सरनाईक आणि यशवंत जाधव यांच्याबाबतची भूमिका काय?

रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली :  राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना भाजपच्या किरीट सोमय्या यांनी शिवसेनेच्या अनेक नेत्यांना जेरीस आणलं. सोमय्या तक्रारींमुळेच शिवसेनेचे अनेक नेतेमंडळी हे ईडीच्या रडारवर आले. यशवंत जाधव आणि प्रताप सरनाईक हे त्यापैकीच.  मात्र आता राज्यात अनेक दिवसांच्या सत्तानाट्यानंतर सत्तापालट झाली. महाविकास आघाडी सरकार कोसळून एकनाथ शिंदे-भाजप सत्तेत आली. (maharashtra political crisis what roll now of …

Read More »

पुरुषांच्या सुटच्या स्लीव्सला का असतात 3 बटण? यामागील कारण खूपच रंजक

मुंबई : आपल्या आजूबाजूला अशा अनेक गोष्टी घडतात, ज्याकडे आपलं लक्ष नसतं. परंतु त्यामागे दडलेली रहस्ये आपल्याला चकित करतात. तुम्ही बऱ्याचदा लोकांना पार्टी किंवा लग्न कार्यामध्ये सुट-बुटमध्ये पाहिलं असेल. परंतु तुम्ही कधी या सुटला किंवा कोटला नीट पाहिलं आहे का? तुम्ही हे तर पाहिलं असेल की, सुटच्या हाताला 3 बटणं असतात. परंतु ही बटणं का असतात? किंवा याच कार्य काय …

Read More »

तुम्हाला माहितीय का विस्की, वाइन, वोडका, बियर, रम यांमधील फरक, यात सगळ्यात स्ट्राँग काय?

मुंबई : दारूचे नाव घेतलं की, व्हिस्की, वाईन, ब्रँडी, बिअर, रम अशा अनेक नावं समोर येतात. बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की, ते सर्व सारखेच आहेत, तर काहींनी चवीपूर्ताच त्यामध्ये फरक असल्याचे म्हटले आहे. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की, या सर्व अल्कोहोलिक ब्रँडमध्ये नक्की काय फरक आहे? यानंतर तुम्ही या सर्वांमध्ये सहज फरक ओळखू शकाल. त्यापूर्वी हे …

Read More »

Petrol Diesel Price : ताजमहाल नसता तर पेट्रोल 40 रुपये लिटर असतं : असदुद्दीन ओवेसी

Petrol Diesel Price : खासदार आणि एमआयएमचे सर्वेसर्वा असदुद्दीन ओवेसी यांनी पेट्रोलच्या वाढत्या किंमतीसाठी ताजमहालला जबाबदार धरलंय. ताजमहाल बांधला नसता, तर आज पेट्रोलचे भाव इतके वाढले नसते, असा टोला लगावला. शहाजहानने ताजमहाल बांधला नसता तर आज पेट्रोलची किंमत 40 रुपये लिटर असती, अशी उपरोधिक टीका ओवेसी यांनी केली. (mim chief and mp asaduddin owaisi blames taj mahal for rising petrol …

Read More »

वाऱ्याच्या वेगाने धावत होती बाईक, क्षणार्धात घडला असा अपघात; व्हिडीओ धक्कादायक

मुंबई : दिवसभरात आपल्या अजूबाजूला एकतरी अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतो. हा अपघात कधी चालकाच्या चुकीमुळे घडतो, तर कधी तो तांत्रिक बिघाडामुळे घडतो. यामध्ये चालकाच्या चुकीमुळे घडलेल्या अपघाताची संख्या जास्त आहे. त्यामुळे चालकाने जर मनावर ताबा आणि संयम ठेवला तर असे अपघात कमी करता येतात. परंतु आज कालची तरुण मंडळी ही आपल्या जीवाची जराही पर्वा करत नाहीत. परंतु यामुळे ते …

Read More »

जर विमानाला छिद्र पडला तर? यामुळे किती वाढू शकतो अपघाताचा धोका? जाणून घ्या

मुंबई : विमान अपघाताच्या अनेक बातम्या समोर आल्या आहेत. ज्यामागची कारण वेगवेगळी असल्याचे समोर आले आहे. हल्लीच दुबईमध्ये विचित्र प्रकार घडला आहे. दुबईहून ब्रिस्बेनला जाणारे एमिरेट्सचे विमान एका मोठ्या अपघातातून बचावले. प्रवास सुरू झाल्यानंतर 14 तासांनंतर जेव्हा विमान ब्रिस्बेनला पोहोचले तेव्हा प्रवाशांच्या लक्षात आले की, विमानात एक होल आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, उड्डाणानंतर 45 मिनिटांनी मोठा आवाज ऐकू आला, परंतु कर्मचार्‍यांना …

Read More »

मूर्तीमध्ये आजही धडधडते कृष्णाचे हृदय? जगन्नाथ मंदिराशी संबंधित रहस्य ऐकून आश्चर्यचकित व्हाल

मुंबई : दरवर्षी आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी जगन्नाथ रथयात्रा पुरी, ओडिशातील जगन्नाथ मंदिरापासून सुरू होते. या यात्रेत सहभागी होण्यासाठी जगभरातून भाविक येतात. ही रथयात्रा 1 जुलैपासून सुरू झाली आहे आणि ती 12 जुलैपर्यंत चालणार आहे. या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, बहीण सुभद्रा आणि भाऊ बलभद्र यांच्यासह तीन भव्य रथांवर स्वार होतात आणि ही यात्रा मंदिरात पोहोचते. भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेला …

Read More »

तुम्हाला SBI Zero Balance सेव्हिंग अकाउंटचे फायदे माहित आहेत का? जाणून घ्या

SBI Zero Balance savings account: जेव्हा तुम्ही बँकेत बचत खाते उघडता, तेव्हा तुम्हाला किमान शिल्लक राखावी लागते. परंतु तुम्ही बँकांमध्ये झिरो बॅलन्स बचत खाते देखील उघडू शकता. त्याचे काही फायदे आहेत आणि काही मर्यादाही आहेत. येथे आम्ही SBI झिरो बॅलन्स बचत खात्याबद्दल सांगणार आहोत.. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, वैध केवायसी पूर्ण करून कोणीही बँकेच्या कोणत्याही शाखेत झिरो बॅलन्स खाते उघडू शकतो. …

Read More »

एखाद्याला आपली कार दिल्यानंतर हे काम करायला विसरु नका, नाहीतर होऊ शकतं मोठं नुकसान

मुंबई : अनेक वेळा असं होतं की, आपण आपल्या मित्रांना, ओळखीच्या लोकांना किंवा नातेवाईकांना आपली कार चालवाला देतो. समोरच्याने मागितले आणि त्याला नाही कसं म्हणायचं अशा विचाराने आपण आपली गाडी देतो खरी परंतु, या संदर्भात आपण महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, ज्यामुळे आपले स्वत:चेच नुकसान होते. त्यांपैकी एक आहे, ते म्हणजे ऑनलाईन चलान. आता बहुतांश चलन ऑनलाइन कापले जात असल्याने …

Read More »

भिकारी बनुन रस्त्यावर फिरत होती हा माणूस, पण त्याचं सत्य काही वेगळंच

मुंबई : आपल्याला नेहमी रस्त्याच्याकडेला गरीब किंवा भिकारी लोक नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आपण त्यांना कधी खायला देतो, तर कधी पैसे देतो. याशिवाय आपण त्यांना मदत करण्यासाठी दुसरं काहीही करु शकत नाही. परंतु उत्तर प्रदेशातील एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही देखील थक्कं व्हाल. तेथे एक व्यक्ती अनेक दिवस भिकाऱ्याच्या पोशाखात फिरत होता. तो कोण होता, कुठून …

Read More »

Zee न्यूज अँकरच्या घरी पोलीस पथक; कायदा हातात घेत जे केलं ते पाहून तुम्हालाही चीड येईल

नवी दिल्ली : काँग्रेसकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर छत्तीसगढ पोलिसांनी झी न्यूज DNA चे अँकर रोहित रंजन यांच्या घरी धडक दिली. गाझियाबादमधील इंदिरापुरम येथे असणाऱ्या त्यांच्या निवासस्थानी पहाटे सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास पोलिसांचं पथक दाखल झालं आणि तिथं एकच गोंधळ माजला. (chattisgarh police aressted DNA fame zee news anchor rohit ranjan) संकटं चहूबाजुंनी आल्याचं पाहिल्यानंतर रोहित रंजन यांनी उत्तर प्रदेश सरकार …

Read More »

मुसळधार कोसळतोय ! कोकणात 23 गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले

मुंबई : Heavy rain in konkan :कोकणात धुवॉंधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोकणातील २३ गावातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. प्रशासनाने काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्वीटद्वारे दिली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा दिलेला इशारा लक्षात घेता तसेच सध्या देखील पावसाचा जोर वाढल्याने पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये …

Read More »

Salary of MLAs: कोणत्या राज्याचे आमदार सर्वात श्रीमंत? तुम्ही निवडून दिलेल्या आमदारांचे पगार चक्रावणारे

Salary of MLAs: दिल्ली विधानसभेमध्ये सोमवारी विधानसभा सदस्यांच्या वेतन आणि भत्तांना दुपटीनं वाढवण्याचं विधेयक मंजूर करण्यात आलं. आम आदमी पार्टी (आप) कडून यानंतर देण्यात आलेल्या माहितीनुसार दिल्लीतील आमदारांचं वेतन हे देशात सर्वात कमी असल्याचं सांगण्यात आलं. (you will be shocked seeing salaries of MLAs) दिल्ली सरकारमधील कायदा, न्याय मंत्री कैलाश गहलोत यांनी मंत्री, आमदार, सभापती, उपसभापती, विरोधी पक्ष नेता यांच्या …

Read More »

मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प, परशुराम घाटात दरड कोसळली

रत्नागिरी :  landslide in Parshuram Ghat : मुंबई – गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. चिपळूण जवळच्या परशुराम घाटातील वाहतूक अजूनही ठप्पच आहे. काल या घाटात दरड कोसळली होती. त्यामुळे या घाटातील वाहतूक ठप्प झाली होती. संध्याकाळी चार वाजता बंद झालेली वाहतूक अद्यापही सुरु झालेली नाही. त्यामुळे घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. आज घाटाची पाहणी करुन वाहतूक सुरु करण्याबाबत निर्णय …

Read More »

Indian Railways संदर्भातली सर्वात मोठी, आनंदाची बातमी; IRCTC कडून महत्त्वाचे बदल

IRCTC : रेल्वेनं लांब पल्ल्यांचा प्रवास सातत्यानं करणाऱ्यांपैकी तुम्ही आहात, किंवा कोणा एका ठिकाणी जाण्यासाठी तुम्ही सतत रेल्वेलाच पसंती देता तर ही बातमी तुमच्यासाठी. बातमी महत्त्वाची यासाठी, कारण आयआरसीटी (IRCTC)नं अॅप आणि वेबसाईटच्या माध्यमातून तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. (big news Indian Railways Changed Ticket Booking Rules) सदर नियमांअंतर्गत आता तिकीटाचं आरक्षण करतेवेळी तुम्हाला अकाऊंट वेरिफाय करावं लागणार आहे. …

Read More »

Monsoon Updates : येते काही तास महत्त्वाचे; मुंबई, ठाणे, कोकणाला हवामान खात्याचा इशारा

Monsoon Updates : काही क्षणांची उसंत घेतल्यानंतर सोमवारपासून पावसानं पुन्हा जोर धरला. ठाणे, मुंबईत सोमवारी रात्रभर जोरदार पाऊस झाला. परिणामी सखल भागात साचलं पाणी हवामान विभागाकडून मुंबईसह उपनगरात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Monsoon updates thane mumbai konkan orange alert IMD NDRF) तिथं कोकणातही मुसळधार पाऊस सुरू आहे. दक्षिण कोकण आणि गोवा भागात सकाळपासून पाऊस आणि तुरळक ठिकाणी अतिवृष्टी …

Read More »

Service Charge: सर्व्हिस चार्जच्या नियमात बदल, हॉटेलचं बिल देण्यापूर्वी ही बातमी वाचा

मुंबई : सेवा शुल्क म्हणजेच सर्विस चार्जबाबत (Service Charge) गेले अनेक आठवडे सुरू असलेल्या चर्चेला कलाटणी मिळाली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) सेवा शुल्काबाबत (सेवा शुल्क मार्गदर्शक तत्त्वे) नवीन नियम तयार केले आहेत. CCPA नुसार, कोणतेही रेस्टॉरंट आपल्या ग्राहकांना सेवा देण्यासाठी सेवा शुल्क आकारू शकत नाही. कोणत्याही रेस्टॉरंटने सेवा शुल्क आकारल्यास, ग्राहक त्या रेस्टॉरंटविरुद्ध ग्राहक आयोगाकडे तक्रार करु शकतो. …

Read More »

कोकणात पावसाचा धुमशान! कुठे दरडी कोसळण्याच्या घटना तर कुठे पूरपरिस्थिती

Konkan Rain : कोकणाला सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसाने झोडपून काढले असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत तर काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी तालुक्यातील तळवडे नदीला पूर आल्याने तळवडे बाजारपेठेत पाणी शिरलं. बाजारपेठेतील रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं होतं.अनेक दुकानात पुराचे पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. अनेक भागातील रस्त्यांवर पाणी आल्याने …

Read More »

2 झाडांच्या सुरक्षेसाठी 3 सुरक्षा रक्षक आणि 6 कुत्रे, यामागचं कारण खूपच खास

मुंबई : सध्या आंब्याचा हंगाम आहे आणि उद्योगपती हर्ष गोएंका यांनी या फळांच्या सर्वात महागड्या जातींपैकी एक असलेल्या फळांचा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत तुम्ही मियाझाकी पाहू शकता, जे प्रामुख्याने जपानमध्ये पिकवल्या जाणार्‍या आंब्याची एक अशी जात किंवा प्रकार आहे, जो फारच दुर्मिळ आहे. त्यामुळेच ते पिकवणाऱ्यांना त्याच्या सुरक्षेची पूर्णपणे काळजी घ्यावी लागते. RPG ग्रुपच्या अध्यक्षांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले …

Read More »