करिअर

नागपूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये भरती, ७५ हजारपर्यंत मिळेल पगार

Nagpur Smart City Recruitment 2022: नागपूर स्मार्ट आणि सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (Nagpur Smart and Sustainable City Development Corporation Limited) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.नागपूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये रिसेटलमेंट आणि रिहॅबिलिटेशन ऑफिसर (Resettlement …

Read More »

टीइटी गैरव्यवहारप्रकरणी दोषारोपपत्र दाखल

म. टा. प्रतिनिधी, पुणेशिक्षक पात्रता परीक्षा (TET) गैरव्यवहारप्रकरणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे तत्कालीन उपसचिव सुशील खोडवेकर, राज्य परीक्षा परिषदेचा तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे यांच्यासह पंधरा आरोपींविरोधात सायबर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या साधनांमधून सबळ पुरावा उपलब्ध झाला असून, त्या आधारे पोलिसांनी तीन हजार ९५५ पानांचे दोषारोपपत्र प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांच्या न्यायालयात दाखल केले. त्यामुळे …

Read More »

SSC Exam Update: पहिल्याच विषयाचा पेपर सोपा, भीती झाली कमी

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोनामुळे दोन वर्षांनंतर होत असलेली मंडळाची परीक्षा. करोना पार्श्वभूमीवर नियमावली, पेपरबाबत काहीसी धाकधूक परीक्षा कक्षात प्रवेश करताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर होती, परंतु प्रत्यक्ष परीक्षेत प्रश्नपत्रिकेतील सहज आकलन होतील असे प्रश्न, अधिकचा मिळालेला वेळ. असा पहिलाच मराठी विषयाचा पेपर सोपा असल्याने परीक्षेची भीती कमी झाल्याची भावना पेपर सुटल्यानंतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीच्या लेखी …

Read More »

SSC Exam: शिक्षण घेण्यासाठी वय नसतं! ५६ वर्षांच्या आजीने नातवासोबत दिला दहावीचा पेपर

औरंगाबाद: शिक्षण घेण्यासाठी वय नसते असं म्हणणात, हे अगदी खरं आहे, आणि याचा प्रत्यय औरंगाबादेत आलाय. ज्या महिलांना वेगवेगळ्या कारणामुळे शिक्षण घेता आलं नाही, अशा चाळीशी- पन्नाशी उलटलेल्या महिला आणि आजीनी दहावीची परीक्षा दिली. एवढंच नाही तर शहरातील हर्सूलमध्ये राहणाऱ्या एका ५६ वर्षीय आजीने सुद्धा नातवासोबत यावर्षी दहावीचा पहिला पेपर दिला. शेख हजराबी शेख गनी असं या आजीचं नाव आहे.शहरातील …

Read More »

NBCC India मध्ये विविध पदांवर नोकरीची संधी, ‘येथे’ करा अर्ज

NBCC JE Recruitment 2022: एनबीसीसी इंडियामध्ये नोकरी मिळवण्याची चांगली संधी समोर आली आहे. भारतातील नऊ रत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या एनबीसीसी इंडियाकडून ज्युनिअर इंजिनीअर पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. एनबीसीसी इंडियामध्ये ज्युनिअर इंजिनीअरची ८० पदे भरली जाणार …

Read More »

ICAI कडून CA फाउंडेशन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल

CA May Exam Dates 2022: इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स संस्थेने (ICAI) मे सीए फाउंडेशन परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. आयसीएआयकडून अधिकृत वेबसाइटवर नवीन तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. मे सीए फाउंडेशन परीक्षेमध्ये (CA Foundation exam 2022) बसलेल्या सर्व उमेदवारांना अधिकृत वेबसाइट icai.org वर वेळापत्रक तपासता येणार आहे. परीक्षेच्या तारखा बदलल्याचे कारणही संस्थेने नोटीसमध्ये दिले आहे.सीबीएसई टर्म २ परीक्षा २०२२ चे …

Read More »

SSC Exam 2022: ‘ती’ मुलगी देणार रुग्णालयातून परीक्षा

म. टा. प्रतिनिधी, पुणे‘एकतर्फी प्रेमातून हल्ला झालेली अल्पवयीन मुलगी रुग्णालयात उपचार घेत असून, तिला तेथूनच दहावीची परीक्षा देता यावी; तिला लेखनिक सुविधा मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे,’ अशी माहिती राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी दिली. वडगावशेरी येथे एका शाळेत घुसून अल्‍पवयीन मुलीवर वर्गातच वार केल्‍याचा धक्‍कादायक प्रकार सोमवारी घडला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर चाकणकर यांनी मंगळवारी पीडित मुलीची …

Read More »

Anti NEET Bill मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

TamilNadu Anti-NEET Bill: वैद्यकीय प्रवेशांसाठी नीट परीक्षेतून (NEET Exam) सवलत देण्याची मागणी तामिळनाडू सरकारकडून करण्यात येत आहे. राज्याच्या विधानसभेने नीट विरोधी विधेयक (Anti NEET bill) मंजूर केले आहे. यानंतर हे विधेयक राष्ट्रपतींच्या संमतीसाठी केंद्राकडे पाठवले जाईल असे आश्वासन तामिळनाडूचे राज्यपाल आरएन रवी (Tamil Nadu Governor RN Ravi) यांनी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांना दिले.मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राजभवनात राज्यपाल रवी यांची भेट …

Read More »

Ukraine मधून परतलेल्या वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिलासा

Russia Ukraine War:रशिया-युक्रेनमधील युद्धामुळे (Russia Ukraine War) तेथील मेडीकल कॉलेजमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना (Indian Medical Student) स्वदेशी परतावे लागले. अशावेळी त्यांच्या भविष्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहीले होते. पण आता या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील अनिश्चितता दूर करण्यासाठी युक्रेन विद्यापीठाने ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत.रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना आपले शिक्षण अर्धवट सोडून भारतात परतावे लागले. सरकारने …

Read More »

SSC, HSC Exam: उशिरा येणाऱ्या विद्यार्थ्यांकडे सापडले पेपर! परीक्षेच्या नियमात बोर्डाने केला महत्त्वाचा बदल

SSC HSC Exam Updates: राज्यभरात सुरू असलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने एक नवा नियम जारी केला आहे. राज्यात बारावीचा पेपर व्हॉट्स अपवर व्हायरल झाल्याच्या घटनेनंतर राज्य मंडळाने हा नियम बदलला आहे. हा नियम बुधवार १६ मार्च २०२२ च्या पेपरपासून अंमलात आणला जाणार आहे. काय आहे नवा नियम?आतापर्यंत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षात उत्तरपत्रिका लेखन …

Read More »

नोकरीच्या शोधात असाल तर ‘या’ ६ टिप्स नक्की फॉलो करा

Job 2022: नोकरी ही व्यक्तीच्या पात्रतेवर अवलंबून असते, पण अनेक वेळा पात्रता असूनही लोकांना नोकरी सहजासहजी मिळत नाही (Recruitment 2022). खूप प्रयत्न करूनही अपयश येते. अशा परिस्थितीत, स्वतःवरील विश्वास कमी न करणे आणि आपल्या प्रयत्नांचे पुनरावलोकन करणे महत्वाचे आहे. आपण चुकीच्या दिशेने प्रयत्न केला आहे का ते पाहणे महत्वाचे असते. ज्या विद्यार्थ्यांनी बारावी किंवा ग्रॅज्युएशन पूर्ण केले आहे ते आपल्याला …

Read More »

Karnataka Hijab Row: हायकोर्टाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबबंदी योग्य का ठरवली? वाचा सविस्तर कारणे…

शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबचा वापर करण्यावरून गेले अनेक दिवस देशात गदारोळ सुरू होता (Karnataka Hijab Row)त्यानंतर मंगळवारा कर्नाटक हायकोर्टाने (Karnataka High Court) या प्रकरणी निर्णय दिला. कोर्टाने स्पष्ट सांगितलं की हिजाबचा वापर करणे इस्‍लाम (Islam) चा अनिवार्य भाग नाही. त्यामुळे विद्यार्थी शाळा-कॉलेजने ठरवलेला गणवेश परिधान करण्यास नकार देऊ शकत नाही. हिजाबबंदीवर आक्षेप घेता येणार नाही. इतकेच नव्हे तर कोर्टाने हिजाबशी संबंधित …

Read More »

UPSC CSE मुख्य परीक्षेचा निकाल कधी? आयोगाने दिली माहिती

UPSC CSE Mains 2021 Result date time: केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे (UPSC)सिविल सेवा मुख्य परीक्षा २०२१ च्या निकालाची घोषणा लवकरच केली जाणार आहे. यूपीएससीने सिविल सर्विसेस मेन्स २०२१ निकालाच्या तारखेची माहिती दिली आहे. यासंबंधी आयोगाची अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर नोटिस जारी झाली आहे. यानुसार यूपीएससी मेन्स २०२१ चा निकाल (UPSC result) मार्च २०२२ च्या चौथ्या आठवड्यात जाहीर केला जाणार आहे. यूपीएससी …

Read More »

IPS भरतीची संख्या १५० वरून २०० पर्यंत वाढवली, केंद्र सरकारची माहिती

Civil Services 2020 IPS Job : भारत सरकारने सन २०२० च्या नागरी सेवा परीक्षेतून होणाऱ्या आयपीएसची(IPS Recruitment) संख्या वाढवली आहे. यापूर्वी १५० पदांवर आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार होती. ती आता २०० करण्यात आली आहे. केंद्र सरकारतर्फे ही माहिती दिली आहे. गृह मंत्रालयाने मंगळवारी १५ मार्च २०२२ रोजी लोकसभेत याबाबत माहिती दिली आहे. गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, तेलंगणातील राज्य पोलीस …

Read More »

विद्यापीठात नोकरी मिळविण्यासाठी ५४ वर्षांचा संघर्ष, जाणून घ्या तपशील

Mahatma Phule Agricultural University: गेल्या ५४ वर्षात शेकडो आंदोलने करुनही महात्मा फुले कृषी विद्यापीठात (Mahatma Phule Agricultural University) प्रकल्पग्रस्तांना नियमानुसार न्याय मिळालेला नाही. अनेक प्रकल्पग्रस्त कुटुंबातील (Project affected family) पात्र उमेदवारांचे वय ४५ पेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरित करावे लागत असल्याने राहुरी तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना तातडीने नोकऱ्या (Recruitment 2022) द्याव्यात, अशी मागणी करत प्रकल्पग्रस्त कृती समितीतर्फे महात्मा फुले …

Read More »

बारावी पेपरफुटीप्रकरणी शिक्षणमंत्र्यांच्या घराबाहेर अभाविपचे आंदोलन

HSC Paper Leaked: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या कथित पेपरफुटीप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेर जोरदार निदर्शने केली आहेत. यानंतर मुंबई पोलसांना काही कार्यकर्त्यांस ताब्यात घ्यावे लागले.१५ मार्च दुपारी १२ च्या दरम्यान अभाविपच्या कार्यकर्त्यांनी वर्षा गायकवाड यांच्या सायन-धारावी येथील घराबाहेर आंदोलन केले. यावेळी त्यांनी …

Read More »

GATE 2022 Result: गेट परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर

GATE 2022 Result: GATE 2022 च्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) खडगपूर १७ मार्च २०२२ रोजी ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग (GATE 2022) म्हणजेच गेट परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. GATE 2022 परीक्षेला बसलेले उमेदवार त्यांचे निकाल IIT खरगपूरच्या अधिकृत वेबसाइट http://gate.itkgp.ac.in वर पाहू शकतात . उमेदवार २१ मार्च रोजी GATE 2022 …

Read More »

NBE FMGE 2022: फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षेचे नोटिफिकेशन जाहीर

NBE FMGE 2022: फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट परीक्षेचे (foreign medical graduate exam, FMGE 2022) नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. राष्ट्रीय परीक्षा मंडळातर्फे (National Examination Board, NBE) परीक्षेचे वेळापत्रक अधिकृत वेबसाइट nbe.edu.in वर जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया आज म्हणजेच १५ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजता सुरु झाली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना एनबीईच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करावे …

Read More »

विभागीय आयुक्त पुणे येथे विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील

Pune Recruitment: कायदा विषयक शिक्षण पूर्ण केलेल्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची माहिती आहे.विभागीय आयुक्त पुणे विभाग (Divisional Commissioner Pune Division) येथे विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन (Pune Division Recruitment 2022) प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. विभागीय आयुक्त पुणे विभागामध्ये …

Read More »

मुंबई विद्यापीठाच्या सिनेटमध्ये शिवरायांबद्दलच्या वक्तव्याबाबत निषेध

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेला मंगळवारपासून विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सुरुवात झाली. या सिनेट बैठकीच्या सुरुवातीलाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मराठी भाषा दिनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा मुद्दा ऐरणीवर आला. या मुद्द्यावरून अधिसभेतील युवा सेनेचे सदस्य आक्रमक झाले. त्यानंतर राज्यपाल नामनिर्देशित सदस्यांनी युवा सेना सदस्यांना विरोध केला. परिणामी या मुद्द्यावरून राज्यपाल नामनिर्देशित सदस्य आणि युवासेना सदस्य आमनेसामने आले आणि गोंधळ उडाला.राज्यपाल …

Read More »