करिअर

SSC HSC Exam 2022: दिव्यांग विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’; पाच तास परीक्षा केंद्रावर!

म. टा. प्रतिनिधी, नाशिकराज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये यंदा वेळ वाढवून देण्यात आला आहे. यामुळे दिव्यांग विद्यार्थ्यांना तब्बल पाच तास परीक्षा केंद्रावर थांबावे लागणार आहे. तसेच दुपारच्या सत्रातील विद्यार्थ्यांचे पेपर संपण्यास सायंकाळचे सात वाजणार असल्यामुळे, परीक्षेदरम्यान या विद्यार्थ्यांची चांगलीच कसरत होणार आहे. बोर्डाच्या परीक्षेदरम्यान दिव्यांग विद्यार्थ्यांना अन्य विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्रत्येक पेपरला अर्धा तास वेळ …

Read More »

IBPS PO भरती मुलाखत पत्र जाहीर, ‘या’ बँकांमध्ये नोकरी मिळेल

IBPS PO Interview Latter: इंस्टिट्यूट ऑफ बॅंकिंग पर्सनल सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection,IBPS) द्वारे पीओ मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी मुलाखत पत्र (Interview Latter) जाहीर करण्यात आले आहे. उमेदवारांना IBPS च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजेच पीओ / मॅनेजमेंट ट्रेनी च्या भरतीसाठी मुलाखत प्रवेशपत्र डाउनलोड करता येणार आहे.आयबीपीएस पीओ मुख्य परीक्षेत …

Read More »

राज्यातील वसतिगृहांना मुहूर्त कधी?

म. टा. प्रतिनिधी, पुणे महाविद्यालये सुरू झाल्याने वसतिगृहे सुरू करण्याची वारंवार मागणी होऊनही राज्य सरकार अद्याप उदासीन असल्याचे चित्र आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत वसतिगृहे सुरू करणार, असे वारंवार सांगत असले, तरी निर्णय होत नसल्याने हजारो विद्यार्थ्यांचे हाल सुरू आहेत. केवळ वसतिगृहे नाहीत म्हणून पुण्या-मुंबईसारख्या शहरांमध्ये विद्यार्थी येण्याचे धाडस करीत नाहीत.दिवाळीनंतर राज्यातील सर्व महाविद्यालये सुरू करण्यात आली. त्यानंतर …

Read More »

MPSC: महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा २०२१ साठी जागांमध्ये वाढ

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा २०२१ साठी जागांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता विविध पदांच्या १०८५ जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे एमपीएससीमार्फत ट्विटरद्वारे जाहीर करण्यात आली आहे.एमपीएससीमार्फत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक अशा …

Read More »

Railway Recruitment 2022: भारतीय रेल्वेमध्ये २.६५ लाखांहून अधिक पदे रिक्त

Railway Recruitment 2022:भारतीय रेल्वे अंतर्गत येणाऱ्या विविध कॅटेगरीमध्ये २.६५ लाखांहून अधिक जागा रिक्त आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्यसभेत ही माहिती दिली आहे. भारतीय रेल्वेत विविध कॅटेगरीमध्ये २.६५ लाखांहून अधिक गॅजेटेड आणि नॉन गॅजेटेड पदे अनेक वर्षांपासून रिक्त आहेत. वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या भरती प्रक्रियेला गती द्यावी लागेल. यामुळे नोकऱ्या निर्माण होतील असे रेल्वेमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जेणेकरून नवीन नोकऱ्या (Railway …

Read More »

Hijab Controversy: कर्नाटकात शाळांनंतर आता कॉलेज सुरु करण्याचा निर्णय

Hijab Row: कर्नाटक सरकारने राज्यातील प्री-विद्यापीठ आणि पदवी महाविद्यालये पुन्हा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. ही महाविद्यालये बुधवार १६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. राज्याचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी ही माहिती दिली आहे. याआधी, हिजाब परिधान करून शाळा महाविद्यालयात प्रवेश घेण्यावरून वाढता वाद पाहता राज्य सरकारने ज्युनिअर कॉलेज आणि पदवी महाविद्यालये १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवली …

Read More »

TCS Recruitment 2022: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती

TCS Recruitment 2022: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (Tata Consultancy Services) विविध पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त जागेवर उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. याअंतर्गत उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे.टीसीएसद्वारे कॅम्पस डिजिटल हायरिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज करू इच्छिणारे उमेदवार [email protected] वर भेट देऊन रिक्त जागेची संपूर्ण माहिती मिळवू शकतात.टीसीएस कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, सतत …

Read More »

इंजिनीअरिंगमध्ये नव्या शाखांना मागणी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईइंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये (Engineering) पारंपरिक शाखांमधील प्रवेश घटत असताना नव्याने उदयाला येणाऱ्या शाखांची मागणी मात्र वाढत आहे. यामुळे या कॉलेजांनीही कात टाकण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) तब्बल ४० हजार जागांना मान्यता दिली आहे. देशातील इंजिनीअरिंग कॉलेजांमधील रिक्त जागांचे वाढते प्रमाण ही मोठी समस्या ठरली होती. यामुळे इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये …

Read More »

दहावी, बारावी परीक्षांसाठी लसीकरण बंधनकारक नाहीच; बोर्डाने केले स्पष्ट

म. टा. प्रतिनिधी, पुणेआगामी दहावी-बारावीच्या परीक्षांसाठी (SSC HSC Exam 2022) विद्यार्थ्यांना लसीकरण बंधनकारक नसल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सोमवारी स्पष्ट केले. लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांची अडवणूक करू नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव पालकांच्या संमतीनुसार लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही राज्य मंडळाने केले आहे. राज्यामध्ये काही शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांकडून परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस …

Read More »

CTET Results 2022: आज जाहीर होणार सीटीईटी निकाल, जाणून घ्या अपडेट

CTET 2022 Result: सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) च्या वतीने डिसेंबर २०२१ च्या शिक्षक पात्रता चाचणी (CTET 2021) चा निकाल आज म्हणजेच१५ फेब्रुवारी २०२२ रोजी जाहीर केला जाऊ शकतो. निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवार अधिकृत वेबसाइट ctet.nic.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात. सीटीईटीची उत्तरतालिका १ फेब्रुवारी रोजी जाहीर करण्यात आली असून त्यावर हरकती नोंदविण्यासाठी ४ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली …

Read More »

SSC HSC Exam 2022: एसटी संपामुळे परिक्षार्थींचे हाल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईएसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाचा (MSRTC Strike) फटका ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणावर बसला आहे. आता बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू झाल्या आहेत. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लेखी परीक्षाही सुरू होणार आहेत. या विद्यार्थ्यांचे एसटीअभावी (ST Strike) प्रचंड हाल होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. एसटी संप सुरू असल्याने ग्रामीण भागात वाहतूक समस्या निर्माण झाली आहे. कोकणासह राज्यातील अन्य ग्रामीण …

Read More »