फेब्रुवारी 21, 2024

Tag Archives: Latest marathi News

मोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा

मयुर निकम, झी मीडिया, बुलढाणा : माघ एकादशीच्या निमित्ताने सुरू असणाऱ्या एका धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने तब्बल पाचशे ते सहाशे भाविकांना विषबाधा झाली. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात ही घटना घडली. लोणार तालुक्यातील सोमठाणा, खापरखेड या गावांमध्ये धार्मिक कार्यक्रम चालू होता यामध्ये उपवास असल्या कारणानं प्रसाद म्हणून भगर आणि शेंगदाण्याची आमटी करण्यात आली होती.  कार्यक्रमानंतर तयार करण्यात आलेल्या या प्रसादाचं अर्थात …

Read More »

बारावीच्या विद्यार्थ्यांनो, परीक्षा देण्यापुर्वी ‘या’ गोष्टी अजिबात विसरु नका!

HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा उद्यापासून म्हणजेच 21 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांची सर्व विषयाचा अभ्यास एव्हाना झाला असेल. वर्षभर केलेला अभ्यास योग्यपण उत्तरपत्रिकेवर उतरवण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे.  यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 15 लाख13 हजार 909 विद्यार्थ्यांनी (Students) नोंदणी केलेली आहे. यामध्ये 8 लाख 21 हजार 450 …

Read More »

बारावीची परीक्षा उद्यापासून! भरारी पथक, मोबाईलवर चित्रीकरण आणि … शिक्षण विभाग सज्ज

HSC Exam Schedule 2024: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेला (12th Board Exam) उद्यापासून म्हणजे 21 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळात परीक्षा पार पडणार आहे. यंदा या परीक्षेसाठी राज्यभरातून एकूण 15,13,909 …

Read More »

Maharastra Politics : ‘अजित पवारांचा कट उधळून लावलाय, त्यांना…’, जितेंद्र आव्हाडांची सडकून टीका!

Jitendra Awhad On Ajit Pawar : निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि घड्याळ हे चिन्ह उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Ajit Pawar) गटाला दिलं होतं. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात शरद पवार गटानं सुप्रीम कोर्टात धाव घेतली. अजित पवार गटाकडून राज्यसभा निवडणुकीसाठी व्हीप बजावला जाऊ शकतो, ही बाब पवार गटाकडून सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) निदर्शनास आणून दिली गेली. त्याच पार्श्वभूमीवर शरद …

Read More »

Maharastra Politics : ‘…म्हणून अजितदादा भाजपसोबत गेले’, रोहित पवारांचा खळबळजनक दावा, म्हणाले ‘मलाही ऑफर…’

NCP Political Crisis : लोकसभा निवडणूक (LokSabha Election) तोंडावर आल्याने आता राजकीय वर्तुळात देखील आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या वाढल्या आहेत. राज्यात गेल्या 5 वर्षात माजलेल्या (Maharastra Politics) राजकीय अराजकतेनंतर आता गटाचं राजकारण सुरू झालंय. त्यामुळे आता राज्याचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेला जातंय? असा सवाल विचारला जात आहे. अशातच आता आळंदी येथे बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit …

Read More »

Mumbai Crime : उल्हासनगर गोळीबार प्रकरणी आमदार गणपत गायकवाड यांना न्यायालयीन कोठडी; वकिलांनी केला खुलासा!

Mumbai Crime News : भाजप आमदार गणपत गायकवाड (MLA Ganpat Gaikwad) यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलीये. पोलीस कोठडी संपत असल्याने त्यांना आज सकाळी उल्हासनगरच्या चोपडा न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. महेश गायकवाड यांच्यावर पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. न्यायालय परिसरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले होते. यापूर्वी न्यायालय परिसरात घोषणाबाजी करणाऱ्या भाजपच्या 30 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात …

Read More »

Maharastra Politics : अशोक चव्हाणांनी ‘हात’ झटकला, नांदेडचा गड काँग्रेस राखणार का?

Ashok Chavan joined BJP : अजूनही वेळ गेलेली नाही, अशोक चव्हाण यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असं आवाहन नाना पटोले यांनी गांधी भवन येथे काँग्रेसच्या बैठकीनंतर केलं. अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काँग्रेसला मोठा सेटबॅक बसलाय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘काँग्रेस पक्षाने अशोक चव्हाण यांना नेहमीच मोठी संधी दिली. अशोक चव्हाण यांना काँग्रेस पक्षात नेतृत्व करण्याची नेहमीच संधी मिळाली …

Read More »

Maharasta Politics : ‘दिल्लीपती बादशहाला मातीत…’, रोहित पवारांचा अशोक चव्हाणांना टोला, स्पष्टच विचारलं ‘आपण कोण?’

Maharasta Politics : ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी ‘हात’ झटकले अन् भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण यांना घेतलेल्या निर्णयामुळे काँग्रेस (Maharastra Congress) आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात काँग्रेसला देखील गळती लागल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता महाविकास आघाडीतील अस्वस्थता वाढली असून बैठकांचा धडाका सुरू झाला आहे. …

Read More »

Maharastra Politics: अशोक चव्हाण यांच्यानंतर यशोमती ठाकूर काँग्रेस सोडणार? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

Ashok Chavan Resign :  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत आणखी आमदार काँग्रेसला रामराम ठोकतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच येत्या काळात तिवसा मतदार संघातही मोठा चमत्कार दिसेल, असं म्हणत रवी राणा (Ravi Rana) यांनी काँग्रेसच्या गोत्यात खळबळ उडाली होती. अशातच आता …

Read More »

Ashok Chavan : ‘मी अस्वस्थ झालोय, 22 वर्ष…’, अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर सत्यजीत तांबे स्पष्टच म्हणाले…

Satyajit Tambe On Ashok Chavan Resignation : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी आज कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. महाराष्ट्र काँग्रेसचा चेहरा म्हणून अशोक चव्हाण यांची ओळख आहे. त्यामुळे आता अशोक चव्हाण जाता जाता 10 आमदार घेऊनच जाणार असल्याची चिन्ह दिसत आहेत. मात्र, अशोक चव्हाण यांना काँग्रेसच्या 17 आमदारांचा पाठिंबा असल्याचं चित्र देखील समोर आलंय. अशातच आता …

Read More »

‘राजकारणात वनवास झाला, दगाफटका…’,पंकजा मुंडे यांचं मोठं वक्तव्य

विष्णू बुर्गे, झी मीडिया बीड :  आगामी लोकसभा निवडणुका भाजपसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. याचपार्श्वभूमीवर समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याची भाजपची यंत्रणा कामाला लागली आहे. त्यातच आता ग्रामीण भागासाठी गाव चलो अभियान, तर शहरी भागासाठी वॉर्डस्तरावरील अभियानाची घोषणा भाजपने केली आहे. 50 हजार युनिट्समध्ये गाव चलो अभियानांतर्गत एका लोकसभेत साधारण 3.5 लाख घरांना भेटी देण्याचे उद्दिष्ट आहे. याचदरम्यान या अभियानाच्या माध्यमातून भाजप …

Read More »

Pakistan Election 2024 : पाकिस्तानी जनतेसाठी इम्रान खानच ‘कॅप्टन’, पण पुन्हा होणार टांगा पलटी?

Imran Khan may become PM of Pakistan : पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने 265 जागांपैकी 264 जागांचे निकाल जाहीर केले आहेत. फसवणुकीच्या तक्रारींमुळे एका जागेचा निकाल रोखण्यात आला होता. एका उमेदवाराच्या मृत्यूमुळे एका जागेवरील निवडणूक (Pakistan National Election Update) पुढे ढकलण्यात आली होती. आतापर्यंतच्या निकालांमध्ये, तुरुंगात बंद असलेले माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (PTI) ने पाठिंबा दिलेल्या अपक्ष …

Read More »

अजितदादा म्हणतात ‘आमचा कार्यकर्ता नव्हता’, प्रशांत जगतापांनी केली पोलखोल, थेट ‘तो’ Video दाखवला

Prashant Jagtap On Ajit Pawar : पुण्यात आयोजित केलेल्या निर्भय बनो कार्यक्रमासाठी (Pune News) पोहोचलेल्या पत्रकार निखिल वागळे (Attack On Nikhil Wagle Car) यांच्या गाडीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना काल घडली. विशेष म्हणजे पोलिसांचा चोख बंदोबस्त असताना देखील वागळे यांच्या गाडीवर हल्ला झाल्याने संताप व्यक्त केला जातोय. भाजपने हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिल्याने पुण्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. अशातच …

Read More »

Abhishek Ghosalkar Case : मॉरिसची हत्या की आत्महत्या? सुषमा अंधारेंच्या पोस्टने खळबळ, ‘फुटेज समोर आलंय पण…’

Abhishek Ghosalkar Murder Case :  माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्या हत्येप्रकरणात धक्कादायक माहिती दिवसेंदिवस समोर येत आहे. एमएचबी पोलीस ठाण्यात आरोपी मॉरिस नरोन्हा (Mauris Noronha) याच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर मॉरिस नरोन्हाचा अंगरक्षक अमरेंद्र मिश्रा याला पोलिसांनी अटक केली आहे. अमरेंद्र मिश्रा याच्या अटकेनंतर अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. राज्याच्या राजकारणात (Maharastra Politics) देखील प्रकरण चांगलंच …

Read More »

बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्यायला हवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मोठी मागणी!

Raj Thackeray On Bharat Ratna : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तीन जणांना भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली. यामध्ये माजी पंतप्रधान नरसिंह राव, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंग आणि हरित क्रांतीचे जनक एस. एम स्वामीनाथन यांच्या नावाचा समावेश आहे. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना प्रमुख आणि हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना भारतरत्न द्यावा, अशी मागणी …

Read More »

कोरोना योद्धा पुरस्कार विजेता ते मारेकरी… मॉरिस भाई आणि घोसाळकरांमध्ये नेमका वाद काय होता?

Abhishek Ghosalkar Vs Murderer Mauris Noronha Mauris Bhai Issue: माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर बोरिवलीच्या आय सी कॉलनीमधील रहिवाशांना मोठा धक्का बसला आहे. कोरोना कालावधीमध्ये या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात समाजसेवा करणाऱ्या मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई …

Read More »

‘तुरुंगातून आल्यापासून मॉरिस सारखा म्हणायचा की, मी घोसाळकरला…’; पत्नीचा धक्कादायक खुलासा

Abhishek Ghosalkar Shoot Dead Mauris Bhai Wife Big Revelation: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही आत्महत्या केली. या हत्याकांडामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापलेलं असताना आता या प्रकरणात पोलिसांनी तपास सुरु केला आहे. …

Read More »

‘राज्यातली कायद्याची स्थिती बिघडली असं म्हणणं..’; घोसाळकरांच्या हत्येनंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Abhishek Ghosalkar Firing News: शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.  Abhishek Ghosalkar News: शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. घोसाळकर यांच्या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. तर, …

Read More »

‘आरोपी सांगतोय की एकनाथ शिंदेंमुळे मी गोळीबार केला, माझे कोट्यवधी रुपये..’; राऊतांचा सवाल

Sanajy Raut On CM Eknath Shinde: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे. या प्रकरणावरुन राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणांच्या निमित्ताने जो नंगा नाच पाहाया मिळत आहे तो अवस्थ करणारा आहे. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये यापूर्वी असं कधी घडलं …

Read More »

मृत्यूआधी आदित्य ठाकरेंना भेटलेले घोसाळकर! जाहीर सभेत आदित्य म्हणाले, ‘आता 5 वाजता…’

Abhishek Ghosalkar Meet Aaditya Thackeray Before Death: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गुरुवारी दहिसर येथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या पुत्रावर मॉरिस नारोन्हा ऊर्फ मॉरिस भाई नावाच्या व्यक्तीने 5 गोळ्या झाडल्या. यानंतर मॉरिसनेही स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या हत्येच्या घटनेवरुन ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी संताप व्यक्त करत राज्यामध्ये सत्तेत असलेल्या …

Read More »