Tag Archives: Maharashtra

पुण्याचा बिहार होतोय? पुण्यात पुन्हा कोयता गँगचा धुमाकूळ

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्याचा बिहार होतोय का असा प्रश्न विचारण्याची वेळ आता आली आहे. पुण्यातील कोयता गँगची (Koyta Gang) दहशत काही केल्या कमी होताना दिसत नाहीए. आता पुन्हा एकदा कोयता गँगनं दहशत माजवलीय. वाहनांची तोडफोड करुन हे टोळकं थांबलं नाही तर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनाही या गँगनं धमकावलं. हा सर्व प्रकार बिबवेवाडीतील (Bibwewadi) संत निरंकारी सत्संग भवनसमोर घडला. …

Read More »

तरुणाने अवयवदानाचा फॉर्म भरला, कुरिअरने डोनर कार्डही आलं… दुर्देवाने चार दिवसातच ‘ती’ वेळ आली

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक :  मुंबई महामार्गावर इगतपुरी (Igatpuri) जवळ दोन चार चाकी वाहनांचा अपघात (Accident) झाला, हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात धुळ्यात राहाणाऱ्या 31 वर्षांच्या मनीष सनेर  याच्या डोक्याला गंभीर मार लागला. त्याला नाशिकच्या सुयश रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याची प्रकृती अत्यंत नाजूक होती. उपचारादरम्यान मनीष कोमात गेला आणि त्याचा मेंदू मृत अवस्थेकडे गेल्याचं डॉक्टरांच्या …

Read More »

Maharashtra Board HSC Result 2023 : 154 पैकी 23 विषयांचा निकाल 100 टक्के; पाहा कोणत्या विभागानं खाल्ली गटांगळी

Maharashtra Board HSC Result 2023 : वर्षभराचा अभ्यास आणि उराशी उज्वल भवितव्याचं स्वप्न बाळगून जवळपास 14 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा दिली. फेब्रुवारी- मार्च 2023 मध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेनंतर नुकताच राज्याच्या शिक्षण मंडळाकडून इयत्ता बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले. यावेळी कला, विज्ञान, वाणिज्य आणि व्यावसायिक शिक्षण अशा विविध शाखांमधील परीक्षांचे निकाल जाहीर करत महाराष्ट्र राज्य माध्यमिक …

Read More »

एका बुक्कीत जावयाने सासूचे दोन दात पाडले, चेहऱ्यावर गरम पाणी टाकलं… पुण्यातील धक्कादायक घटना

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : जावयाने (Son in Law) सासुला (Mother in Law) मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात झालेल्या किरकोळ वादानंतर जावयाने सासूला मारहाण करत तिच्या चेहऱ्यावर गरम पाणी टाकलं. इतकंच नाही तर तोंडावर बुक्की मारून सासूचे दोन दात देखील पाडले. खडकी पोलीस स्टेशनच्या (Khadki Police Station) हद्दीतील आर्मी कॉर्टरमध्ये हा प्रकार घडला. खडकी पोलीस ठाण्यात …

Read More »

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! बालभारतीच्या पुस्तकात मोठा बदल, विद्यार्थ्यांच्या पाठिवरचं ओझं कमी होणार

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे :  महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तिक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने येत्या शैक्षणिक वर्षापासून (New academic year) इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची रचना बदलली आहे. इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले असून तीन ते चार विषयांसाठी एकच पुस्तक राहणार आहे. तसंच प्रत्येक पुस्तकामध्ये एक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आलं आहे. त्या पानाच्या वर माझी …

Read More »

संजय राऊत म्हणाले, ’40 आमदारांनी मोदींचा फोटो लावावा आणि जिंकून दाखवा, जिंकल्यास राजकारण सोडेन…’

Sanjay Raut On Shinde Group And Narendra Modi : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांना आव्हान दिले आहे. तुम्ही जर मोदींचा फोटो लावून जिंकून दाखवलं तर मी राजकारण सोडून देईन, असे थेट आणि जाहीर आव्हान दिले आहे. बीड येथील महाप्रबोधन यात्रेत राऊत यांनी शिंदे सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही कडाडून टीका केली.  शिवसेना फोडण्यासाठी …

Read More »

गौतमी पाटीलच्या ‘कातिल अदा’ आता पडणार भारी, आयोजकांना खिसा करावा लागणार रिकामा

सांगोला : सबसे कातिल गौतमी पाटीलने (Gautami Patil) संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गौतमी पाटीलचं नाव पोहोचलं आहे. राज्यातल्या कोणत्याही भागात गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम असू दे, लोकांची तुफान गर्दी पाहिला मिळते. लोकं झाडावर चढून, घराच्या-दुकानाच्या छतावर चढून गौतमीचा डान्स पाहताना दिसतायत. पण गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की राडा झालाच पाहिजे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि राडा असं जणून समीकरणंच …

Read More »

भारतीय संस्कृतीचं भान ठेवा! तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांना आता ड्रेसकोड? नियम व अटी लागू

तुळजाभवानी : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिर (Shri Tuljabhavani Temple) व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे मंदिरात वेस्टर्न कपडे (Western Dress) घालणाऱ्यांना नो एन्ट्री अर्थात प्रवेश बंदी असणार आहे. आई तुळजाभवानी मंदिरात यापुढे हाफ पॅन्ट, बर्मुडा असे वेस्टर्न कपडे घालणाऱ्या भाविकांना बंदी घालण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिर संस्थांचेवतीने अशा सूचनांचे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आहेत. याबाबत कोणतीही अधिकृत अधिसूचना …

Read More »

राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा, सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

Bailgada sharyat : आता राज्यात बैलगाडा शर्यत घेता येणार आहे. (Bullock Cart Race) बैलगाडा शर्यतीसाठी सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे राज्यातील बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील बैलगाडा शर्यत कायदा वैध ठरवला आहे.   राज्यात बैलगाडा शर्यतीवर बंदी होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने अंतिम निर्णय दिला आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी नाही …

Read More »

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर, 20 मेपासून अर्ज भरण्यासाठी सराव

Junior Colleges Online Admission 2023 : विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी. 2023-2024 या शैक्षणिक वर्षातील अकरावीच्या ऑनलाईन प्रवेशाचं वेळापत्रक शिक्षण संचालनालयाने जाहीर केले आहे. वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना 20 मेपासून अर्ज भरण्यासाठीचा सराव अकरावी ऑनलाईन प्रवेशाच्या साईटवर करता येणार आहे. 25 मेपासून विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या भागासाठी नोंदणी करता येईल. दुसरीकडे प्रवेश प्रक्रिया ऑगस्टपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा …

Read More »

त्र्यंबकचा वाद पेटला! मंदिरात इतर धर्मियांना प्रवेशबंदी, पायऱ्यांवर हिंदू समाजाकडून शुद्धीकरण…

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : आद्य ज्योतिर्लिंग असलेली त्र्यंबकेश्वर नगरी. सध्या इथलं वातावरण चांगलंच तापलंय. कारण काही मुस्लीम तरुणांनी धूप दाखवण्याच्या प्रथेच्या नावाखाली त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा (Trimbakeshwar Mandir) प्रयत्न केला. त्यावरून नवा वाद सुरू झालाय. मंदिरात मुस्लीम तरुण घुसल्याच्या घटनेनंतर सकल हिंदू समाजानं या वादात उडी घेतली… बुधवारी मंदिराच्या पायऱ्यांवर गोमूत्र शिंपडून संघटनेनं शुद्धीकरणाची (Purification) मोहीम हाती घेतली. सकल …

Read More »

पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुणे जिल्ह्याचं विभाजन होणार? ‘या’ नावाने असणार नवीन जिल्हा?

पुणे :  राज्यातील सर्वात मोठी महापालिका म्हणून पुणे महापालिकेची (Pune Municipal Corporation) ओळख आहे.  पुणे महापालिकेत 34 गावांचा समावेश करण्यात आल्यानंतर भौगोलिकदृष्ट्या देशातील सर्वात मोठी महापालिका अशी पुण्याची ओळख निर्माण झाली. वाढती लोकसंख्या लक्षात घेता पुणे जिल्ह्याचे विभाजन करा अशी मागणी भाजप आमदार महेश लांडगेंनी (MLA Mahesh Landage) केलीय. यासाठी आमदार लांडगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना एक …

Read More »

7 मुलांच्या आईचं 3 मुलांच्या बापाशी सूत जुळलं, प्रेमप्रकरणाचा धक्कादायक शेवट… 10 मुलं उघड्यावर

नितेश महाजन, झी मीडिया, जालना : अनैतिक प्रेमसंबंधाचा ( Love Affair) धक्कादायक शेवट झाल्याची एक घटना जालना (Jalna) जिल्ह्यात घडली आहे. सात मुलांच्या आईचं तीन मुलांच्या बापाशी सूत जुळलं. पण या प्रेमप्रकरणाचा धक्कादायक शेवट झाला. यात निर्दोश सात मुलं उघड्यावर आली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींनी अटक केली असून अधिक तपास सुरु आहे. जालना शहरातील टीव्ही सेंटर भागात असलेल्या म्हाडा कॉलनीत ही …

Read More »

Cyclone Mocha Latest Updates: ‘मोचा’चे तीव्र चक्रीवादळात रुपांतर, काही राज्यात जोरदार पावसाची शक्यता

India Weather Forecast : अंदमान समुद्रात सुरु झालेल्या मोचा चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रुपांतर झाले आहे. हे वादळ सध्या कॉक्स बाजारच्या दक्षिण-नैऋत्येस सुमारे 700 किमी अंतरावर आहे. गेल्या 6 तासात हे चक्रीवादळ 10 किमी प्रतितास वेगाने ईशान्येकडे हळूहळू सरकत आहे. हे वादळ आज दुपारच्या सुमारास कॉक्स बाजार (बांग्लादेश) आणि क्यवप्यूमधील (म्यानमार)  किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. दरम्यान, हे वादळ अतिशय वेगाने किनारपट्टीवर …

Read More »

Maharashtra Political News : SC निकालानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच विस्तार, कोणाची लागणार वर्णी?

 Maharashtra Political News : राज्यातील सत्तासंघर्षाचा 11 महिन्यांचा सस्पेन्स संपला आहे. अनेक निर्णय योग्य नसले तरी राज्यात शिंदे सरकार कायम राहणार आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच विस्तार होण्याची चर्चा सुरु झाली आहे. ( Shinde-Fadnavis Government Cabinet Expansion ) राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला नव्हता. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहण्यात येत होती. राज्यात सद्या 20 मंत्र्यांवरच सरकारच्या अतिरिक्त खात्यांचा कार्यभार सुरु …

Read More »

Maharashtra Politics case : 16 आमदार अपात्र ठरले तर कोणाची झोप उडणार? बदलणार विधानसभेतील गणित…

SC Hearing on Maharashtra MLA Disqualification : महाराष्ट्रातील शिंदे सरकारसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. राज्याच्या सत्तासंघर्षाच्या निकालाकडे देशाचं लक्ष लागलेलं असताना तर्कवितर्क लावले जात आहेत. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्री पद जाणार की राहणार? 16 आमदार अपत्रा ठरले तर काय होईल. याचा सरकारवर किती परिणाम होणार? 2022 च्या महाराष्ट्रातील राजकीय संकटाबाबत शिवसेनेचे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालय …

Read More »

Supreme Court : सर्वोच्च न्यायालयात आज आणखी एक महत्त्वाचा निर्णय, दिल्लीतील ‘या’ प्रकरणाचा निकाल

Supreme Court verdict on Delhi : सत्तासंघर्षाबाबात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाचा निकाल लागणार आहे. त्यामुळे दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंतचे राजकारणात नवा ट्विस्ट येणार आहे. दिल्ली आणि महाराष्ट्रातील राजकारण पूर्णपणे बदलण्याची शक्यता आहे. देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने 18 जानेवारी रोजी दिल्लीतील सेवा हक्काच्या मुद्द्यावर सुनावणी पूर्ण केली आणि आपला निर्णय राखून ठेवला आहे. याचा निकाल आज येणार आहे.  घटनात्मक खंडपीठाची स्थापना   सर्वोच्च न्यायालयाचे …

Read More »

Gautami Patil : गौतमीचा नाद करेल जीवाचा घात, कुठे लाठीमार तर कुठे गोंधळ

Gautami Patil : सबसे कातील, गौतमी पाटील…असं म्हणत आपल्या अदाकारीनं महाराष्ट्रातल्या (Maharashtra) तरूणाईला घायाळ करणाऱ्या गौतमीचा नाद आता जीवावर बेततो की काय, असच वाटू लागलंय. गौतमीचा कार्यक्रम म्हंटला की राडा, हुल्लडबाजी, गोंधळ हे नित्याचच झालं. मात्र वैजापूरच्या (Vaijapur) महालगावातील चित्र धक्कादायक होतं. इथं गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी लोकं एका दुकानातील पत्र्यांच्या शेडवर चढले होते. गर्दी इतकी वाढली की ही शेडच कोसळली. …

Read More »

पालकांनो आपल्या मुलांवर लक्ष ठेवा! विरारमधली धक्कादायक घटना सीसीटीव्ही कैद…

प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : मुलांच्या शालेय परीक्षा संपल्यात आणि सुट्टी (Holiday) सुरु झाली आहे. सकाळपासूनच मुलं घराबाहेर पडून खेळण्यात दंग होतात. तहानभूक विसरून मुलं वेगवेगळे खेळ खेळत असतात. इमारतीच्या आवारातच खेळत असल्याने पालकही निर्धास्त असतात. पण मुलांना खेळण्यासाठी पाठवताना त्यांच्यावर लक्ष ठेवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विरारमध्ये (Virar) अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  काय आहे नेमकी घटना?विरार …

Read More »

उद्धव ठाकरे कडाडले… ‘बारसूत हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू’

Uddhav Thackeray on Barsu Refinery Project : हुकूमशाही लादू नका, अन्यथा महाराष्ट्र पेटवून टाकू, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. रिफायनरी विरोधकांची भेट घेण्यासाठी उद्धव ठाकरे बारसू दौऱ्यावर आहेत. सर्वात आधी त्यांनी सोलगावमधल्या ग्रामस्थांसोबत संवाद साधला. राख आम्हाला आणि रांगोळी तुम्हाला, असं चालणार नाही. प्रदूषणकारी रिफायनरी प्रकल्प कोकणात नको, असा इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला …

Read More »