TCS Recruitment 2022: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये विविध पदांची भरती

TCS Recruitment 2022: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (Tata Consultancy Services) विविध पदांची भरती केली जाणार आहे. या रिक्त जागेवर उमेदवारांची निवड मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे. याअंतर्गत उमेदवारांची थेट भरती केली जाणार आहे.टीसीएसद्वारे कॅम्पस डिजिटल हायरिंग सुरू करण्यात आली आहे. यामध्ये अर्ज करू इच्छिणारे उमेदवार ilp.supp[email protected] वर भेट देऊन रिक्त जागेची संपूर्ण माहिती मिळवू शकतात.

टीसीएस कंपनी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, सतत बदलणाऱ्या जगात शिकले पाहिजे. आम्ही आमच्या प्रत्येक कर्मचार्‍यांना एक संधी देतो जेणेकरुन ते त्यांचे कौशल्य अपग्रेड करू शकतील आणि सुधारू शकतील. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर रिक्त पदांचे संपूर्ण तपशील (TCS Recruitment 2022) अपलोड केले आहेत.

अर्ज प्रक्रिया
नोंदणी करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम TCS NextStep पोर्टलवर जा.
येथे तुम्हाला ‘Application Received’ च्या लिंकवर जावे लागेल.
तुमचा सीटी/डीटी आयडी हातात ठेवून स्टेप २ मध्ये दिलेल्या लिंकवर अपडेट करा.
नवीन युजर असल्यास टीसीएस नेक्स्ट स्टेप पोर्टलवर लॉग इन करा.
‘आता नोंदणी करा’ वर क्लिक करा, ‘IT’ कॅटेगरी निवडा.
तुमचे तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा. नोटीफिकेशनमध्ये याचा अधिक तपशील देण्यात आला आहे.
बातमीखाली याची थेट लिंक देण्यात आली आहे.

हेही वाचा :  नोकरीची सुवर्णसंधी! आरोग्य विभागात वरिष्ठांची भरती; 'एमपीएससी'कडून प्रक्रियेला सुरुवात

नवी मुंबई टपाल विभागमध्ये भरती, जाणून घ्या तपशील
कोण अर्ज करू शकतो अर्ज?
या पदासाठी अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवाराकडे B.E. / B.Tech / M.E. / M.Tech / MCA / M.Sc हे २०१९, २०२०, २०२१ मध्ये उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासोबतच उमेदवाराकडे ६ ते १२ महिन्यांचा आयटी कामाचा अनुभव असावा.

Government Job: IREL मध्ये विविध पदांची भरती
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार
महत्वाच्या बाबी
सर्व मूळ शैक्षणिक आणि रोजगाराची कागदपत्रे जवळ ठेवा. निवड प्रक्रियेच्या वेळी कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.
TCS ऑफ कॅम्पस डिजिटल हायरिंग ड्राइव्हसाठी पात्र होण्यासाठी, तुमच्याकडे ६ ते १२ महिन्यांचा आयटी कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
चाचणीशी संबंधित माहिती TCS iON द्वारे दिली जाईल.
रिमोट माध्यमातून चाचणी होईल.
TCS ऑफ कॅम्पस डिजिटल ड्राइव्हसाठी अर्ज करण्यासाठी करियर फोल्डरमध्ये जाऊन TCS (CT/DT) आयडी तयार करावा लागेल.
TCS तर्फे gmail, rediff mail, yahoo mail, hotmail इत्यादी सारख्या गैर-अधिकृत ईमेल आयडीवरून नोकरीच्या ऑफर/कोणत्याही भरती संबंधित ईमेल पाठवत नाही.
TCS उमेदवारांना नोकरीच्या ऑफरसाठी कोणतेही पैसे जमा करण्यास सांगत नाही.
टीसीएस मुलाखत घेण्यासाठी किंवा त्यांच्या वतीने नोकरी ऑफर करेल अशा कोणत्याही बाहेरील एजन्सी/कंपनीशी संबंधित नाही.
कोणत्याही मदतीसाठी, TCS हेल्पडेस्क टीमशी संपर्क साधा. यासाठी ईमेल आयडी: [email protected] आणि टोल-फ्री हेल्पलाइन क्रमांक: १८०० २०९ ३१११ द्वारे मदत घेऊ शकता.

हेही वाचा :  मुंबईत महारोजगार मेळावा, ७ हजार नोकऱ्या होणार उपलब्ध

नोटिफिकेशन पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Army ADG Recruitment: अतिरिक्त डायरेक्टोरेट जनरल अंतर्गत विविध पदांची भरती
इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत अप्रेंटिस पदांची भरती

Electronics Corporation of India Limited Invites Application From 484 Eligible Candidates For Apprentice Posts. Eligible …

वाहन संशोधन आणि विकास आस्थापना अंतर्गत जुनिअर रिसर्च फेलो पदांची भरती

Vehicle Research and Development Establishment Invites Application From 09 Eligible Candidates For Junior Research Fellow …