विमानतळ प्राधिकरण ज्युनियर एक्झिक्युटिव्ह भरती परीक्षेचा निकाल जाहीर

AAI Junior Executive Result 2020: भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर पदाच्या भरतीचा निकाल जाहीर केला आहे. रिक्त पदांची भरती परीक्षा २०२० साठी बसलेले उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल (AAI Result 2020) तपासू शकतात. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या या रिक्त पद भरती अंतर्गत एकूण ३६८ पदांची भरती केली जाणार आहे. व्यवस्थापक आणि कनिष्ठ कार्यकारी पदांच्या भरतीसाठी १५ डिसेंबर २०२० रोजी अर्ज प्रक्रिया सुरू झाली. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी २९ जानेवारी २०२१ पर्यंत मुदत देण्यात आली होती.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI) जाहीर केलेल्या माहितीनुसार, या रिक्त पदांसाठी परीक्षा मार्च २०२१ मध्ये आयोजित करण्यात आली होती. यासाठी १२ मार्च २०२१ रोजी प्रवेशपत्र जारी करण्यात आले होते. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, या रिक्त पदांसाठी अर्ज करणारे उमेदवार अधिकृत वेबसाइटला भेट देऊन निकाल तपासू शकतात.

AAI Junior Executive Result 2020: असा तपासा निकाल
निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट aai.aero वर जा.
वेबसाइटच्या होम पेजवर दिलेल्या रिक्रूटमेंट डॅशबोर्ड विभागात जा.
यानंतर Result of DIRECT RECRUITMENT FOR THE POSTS OF MANAGERS AND JUNIOR EXECUTIVES IN VARIOUS DISCIPLINES – ADVERTISEMENT लिंकवर क्लिक करा.
डाउनलोड लिंकवर क्लिक करा.
संबंधित पोस्टच्या लिंकवर जा.
निकालाची पीडीएफ उघडेल.
तुम्ही रोल नंबरच्या मदतीने निकाल तपासा.

हेही वाचा :  Twitter layoffs: 'ऑफिसला येत असाल तर घरी परता', ट्विटरमध्ये कपात सुरु; एलोन मस्कचा मोठा निर्णय

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार
रिक्त जागांचा तपशील
भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) ने ज्युनियर एक्झिक्युटिव्ह आणि मॅनेजर पदासाठी भरती करताना पुढीलप्रमाणे शैक्षणिक पात्रता मागविण्यात आली होती.

मॅनेजर (अग्निशमन सेवा) – ११ जागा- फायर इंजिनीअरिंग/ मॅकेनिकल इंजिनीअरिंग/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंगमध्ये बीई/ बीटेक आणि पाच वर्षांचा अनुभव

मॅनेजर (टेक्निकल)-२ जागा- मॅकेनिकल इंजिनीअरिंग/ ऑटोमोबाईल इंजिनीरिंगमध्ये बीई/बीटेक आणि पाच वर्षांचा अनुभव

MPSC अंतर्गत पशुधन विकास अधिकारी पदांची भरती, जाणून घ्या तपशील
ज्युनिअर एक्झिक्युटीव्ह(एअर ट्रॅफिक कंट्रोल) – २६४ जागा- बीएससी (भौतिकशास्त्र आणि गणितासह) किंवा कोणत्याही क्षेत्रात इंजिनीअरिंग (सेमिस्टरमध्ये भौतिकशास्त्र आणि गणिताचा अभ्यास असावा).

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (एअर ऑपरेशन्स) – ८३ जागा- विज्ञान विषयात पदवी आणि २ वर्षे एमबीए. किंवा इंजिनीअरिंगची पदवी

ज्युनियर एक्झिक्युटिव्ह (टेक्निकल) – ८ जागा- मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलमधील बीई/बीटेक

निकालाच्या लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Indian Navy मध्ये दहावी पास असणाऱ्यांना नोकरीची संधी
Government Job: ओएनजीसीमध्ये विविध पदांची भरती, ‘येथे’ करा अर्ज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …