World Braille Day 2023: जागतिक ब्रेल दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या

Authored by Pravin Dabholkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 4 Jan 2023, 11:59 am

World Braille Day 2023: युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने ६ नोव्हेंबर २०१८ रोजी एक ठराव मंजूर केला. ज्यामध्ये ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्मदिन दरवर्षी ४ जानेवारी हा ‘जागतिक ब्रेल दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ४ जानेवारी २०१९ रोजी प्रथमच जागतिक ब्रेल दिन साजरा करण्यात आला.

 

World Braille Day 2023
जागतिक ब्रेल दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या
World Braille Day 2023: दरवर्षी ४ जानेवारी हा दिवस जगभरात जागतिक ब्रेल दिन म्हणून साजरा केला जातो. अंध बांधवांसाठी हा दिवस खूप खास आहे. कारण या दिवशी अंधांच्या आयुष्यात प्रकाश आणणाऱ्या लुई ब्रेल यांचा जन्म झाला. लुई ब्रेल यांनीच ब्रेल लिपीला जन्म दिला, त्यामुळे आज अंध व्यक्तीही लिहिता-वाचू शकतात आणि पुढे जात आहेत.

हेही वाचा :  राष्ट्रीय बियाणे महामंडळ अंतर्गत विविध पदांची भरती

जागतिक ब्रेल दिनाचा इतिहास

युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने ६ नोव्हेंबर २०१८ रोजी एक ठराव मंजूर केला. ज्यामध्ये ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्मदिन दरवर्षी ४ जानेवारी हा ‘जागतिक ब्रेल दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर ४ जानेवारी २०१९ रोजी प्रथमच जागतिक ब्रेल दिन साजरा करण्यात आला.

युनायटेड नेशन्सच्या वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार, जगातील सुमारे ३९ दशलक्ष लोक अंध आहेत तर साधारण २५३ दशलक्ष लोक डोळ्यांच्या कोणत्या ना कोणत्या समस्येने त्रस्त आहेत. अशा लोकांसाठी ब्रेल लिपी खूप उपयुक्त आहे.

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात शाळांना ‘इतके’ दिवस सुट्ट्या

लुईस ब्रेल कोण होते?

ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांचा जन्म ४ जानेवारी १८०९ रोजी फ्रान्समधील कुपर येथे झाला. लहानपणी एका अपघातामुळे लुई ब्रेल यांची दृष्टी गेली. वास्तविक त्याच्या एका डोळ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. योग्य वेळी उपचार न मिळाल्याने हळूहळू त्यांचा दुसरा डोळाही पूर्णपणे निकामी झाला. त्यानंतर लुई ब्रेल यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. पण त्यांनी कधीही हार न मानता त्यांच्यासारख्या लोकांच्या समस्या समजून घेत वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी ब्रेल लिपीचा शोध लावला, जे आज अंधांसाठी मोठे वरदान आहे.

हेही वाचा :  अरेरे! महापालिकेच्या निम्म्या विद्यार्थ्यांवर स्वेटरविना कुडकुडण्याची वेळ

ब्रेल लिपी म्हणजे काय?

ब्रेल लिपी ही दृष्टिहीन लोकांना शिकवण्यासाठी वापरली जाणारी लिपी आहे. या लिपीमध्ये अंध व्यक्ती स्पर्शाने वाचू आणि लिहू शकतात. या लिपीमध्ये अंध व्यक्तींना कागदावर उठलेल्या बिंदूंच्या स्पर्शाने शिकवले जाते. या लिपीचा वापर करून वाचनाशिवाय पुस्तकेही लिहिता येतात. ज्याप्रमाणे टंकलेखन यंत्राद्वारे पुस्तके लिहिली जातात, त्याचप्रमाणे ब्रेल लिपीत लिहिण्यासाठी ब्रेलरायटरचा वापर केला जातो.

मुलींसाठी पहिली भारतीय शाळा उघडली, समाजव्यवस्थेविरुद्ध आवाज उठविला; सावित्रीबाई फुलेंचे आपल्यावर अनंत उपकार

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …