शाळेतील निकृष्ट जेवणामुळे विद्यार्थ्यांचे अन्नत्याग

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पेठरोडवरील एकलव्य वसतिगृहाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना भोजनाचा पुरवठा करणाऱ्यांकडून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी (दि. ६) अन्नत्याग आंदोलन केले. येत्या चार-पाच दिवसांत होणाऱ्या अन्न पुरवठ्यात सुधारणा होईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

पेठरोड येथील आदिवासी विभागाच्या वसतिगृहाच्या एकलव्य या शाळेत सध्या सहावी ते बारावीपर्यंतच्या वर्गातील ३९४ विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था येथेच आहे. या विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी आदिवासी विभागाने काही वर्षांपूर्वी सेंट्रल किचन संस्थेकडे काम दिले. मात्र, त्यांच्याकडून पुरवठा होत असलेले अन्न निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार विद्यार्थी वारंवार करीत होते. मात्र त्याची दखल न घेतल्याने शुक्रवारी विद्यार्थी आक्रमक झाले.

विद्यार्थ्यांना शुक्रवारी दुपारचे जेवण घ्यायचे नाही असे ठरवून आंदोलन सुरू केले. शुक्रवारी निकृष्ट दर्जाचे जेवण आल्याने विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक सुरेश देवरे व गृहपाल महेश दामले यांच्याकडे तक्रार करीत अन्नत्याग केला.

विद्यार्थ्यांच्या तक्रारी

– संबंधित ठेकेदार कंपनीकडे वारंवार तोंडी व लेखी तक्रार, तरी जेवणाचा दर्जा सुधारला नाही.

– मशीनवर तयार केलेल्या पोळ्या कच्च्या असतात.

हेही वाचा :  India Skills Report: २२ ते २५ वयातील तरुणांना रोजगारसंधी

– भाजीत केवळ पाणी असल्याने, ती बेचव लागते.

– निकृष्ट अन्नामुळे विद्यार्थ्यांना मळमळणे व पोटदुखी यासारखे त्रास होतात

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी, नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात शाळांना ‘इतके’ दिवस सुट्ट्या

विद्यार्थ्यांची मागणी

– हाताने तयार केलेल्या पोळ्या मिळाव्यात.

– भाज्या चवदार असाव्यात.

– ठरवून दिलेल्या मेनूप्रमाणे जेवण मिळावे.

– अन्नाच्या दर्जात सुधारणा करावी.

भाजीत केवळ पाणी असल्याने तिला चव लागत नाही. मशीनने तयार केलेल्या पोळ्या कच्च्या असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास होतो. चवदार भाजी आणि हाताने तयार केलेल्या पोळ्या मिळाव्यात, अशी आमची मागणी आहे.
– मुकेश पावरा, विद्यार्थी

चांगल्या दर्जाचे जेवण मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्यात आला आहे. घडलेल्या प्रकाराची त्यांना माहिती दिली आहे. विद्यार्थ्यांची समस्या सोडविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.
– सुरेश देवरे, मुख्याध्यापक

मुंडेगाव येथील सेंट्रल किचन येथून नाशिक जिल्ह्यातील अनेक आश्रम शाळांना अन्न पुरविले जाते. हे बंद करून आश्रमाच्या ठिकाणीच किचन करावे. आदिवासी विद्यार्थ्यांवर होणार अन्याय थांबवावा.
– लकी जाधव, प्रदेशाध्यक्ष, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद

हेही वाचा :  फीबाबत केली विचारणा; पालकांना शाळेच्या महिला बाऊन्सरकडून मारहाण

… तर मंत्रालयावर मोर्चा काढू

विद्यार्थ्यांच्या अन्नत्याग आंदोलनाची दखल घेत आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त संदीप गोलाईत व उपायुक्त सुदर्शन नगरे यांनी भेट देत पाहणी केली. आंदोलनकर्ते विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या तक्रारी जाणून घेतल्या. येत्या चार-पाच दिवसांत होणाऱ्या अन्न पुरवठ्यात सुधारणा होईल, असे आश्वासन दिले. त्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, सुधारणा झाली नाही, तर आम्ही सर्व विद्यार्थी मंत्रालयावर धडक मोर्चा घेऊन जाऊ, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला.

शालेय पोषण आहाराचा पुरवठा महिनाभरापासून बंद
खिचडी केव्हा मिळणार?; लाखों विद्यार्थ्यांचा सवाल, महिनाभरापासून पोषण आहाराचा पुरवठा बंद

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

देहू रोड कॅन्टोनमेंट बोर्ड अंतर्गत विविध पदांची भरती

Dehu Road Cantonment Board Invites Application From 11 Eligible Candidates For Balwadi Teacher & Balwadi …

भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु पदांची भरती

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2024 – Indian Air Force Invites Application From Eligible Candidates …