महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात भरती, ‘येथे’ पाठवा अर्ज

Maharashtra State Security Corporation Bharti 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची अपडेट आहे. मुंबईतील महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात चांगल्या पगाराची संधी उपलब्ध झाली आहे.यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळात सिनीअर ग्रेड स्टेनोग्राफर/सेल्फ असिस्टंटचे १ पद भरले जाणार आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असावे. यासोबतच उमेदवाराकडे स्टेनो कम पर्सनल म्हणून राज्य/केंद्र सरकारच्या सेवेतून निवृत्त सहाय्यक म्हणून कामाचा अनुभव असावा. यासोबतच एमएससीआयटी पूर्ण असणे गरजेचे आहे.

उमेदवाराचे वय ३१ जानेवारी २०२३ रोजी ६५ वर्षापर्यंत असावे. तसेच त्यांच्याकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही. या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा ३५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा
थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तसेच उमेदवारांना संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करावे लागणार आहे. ही भरती १ वर्षाच्या कंत्राटी तत्वावर असणार आहे.

हेही वाचा :  शिवाजी विद्यापीठाच्या वनस्पतीशास्त्रांना ऑस्ट्रेलियन सरकारकडून औषधनिर्मिती पेटंट मंजूर

Fire Brigade Job: बारावी उत्तीर्णांना अग्निशमन विभागात नोकरी, ६९ हजारपर्यंत मिळेल पगार
१४ जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांनी पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई. सेंटर – १, ३२ मजला, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुंबई -४०००५ या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे. महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाची अधिकृत वेबसाइट www.mahasecurity.gov.in वर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

NCDC: राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळात नोकरीची संधी, ५० हजारपर्यंत मिळेल पगार
इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी इंडियामध्ये नोकरीची संधी, ‘येथे’ पाठवा अर्ज

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …