शिक्षणाला वयाची वट नसते! ८९ वर्षांच्या आजीने मिळविली मास्टर डिग्री

Success Story:शिक्षणाला वयाची वट नसते असे म्हणतात. ही गोष्ट फक्त सांगण्यापुरती नसते तर काही लोक ते गांभीर्याने देखील घेतात आणि आवडीने पूर्ण करतात. अमेरिकेतील एका महिलेने वयाच्या ८९ व्या वर्षी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून करुन हे सिद्ध केले आहे. ती जगातील लोकांसाठी एक उदाहरण बनली आहे. जोन डोनोव्हन असे पदव्युत्तर पदवी पूर्ण केलेल्या महिलेचे

जोन डोनोव्हन यांनी दक्षिणी न्यू हॅम्पशायर विद्यापीठातून मास्टर डिग्री पूर्ण केल्यानंतर पेहराव आणि टोपीमध्ये पोझ दिली. हा फोटो आता अनेक तरुणांना प्रेरणा देणारा ठरणार आहे.डोनोवनने इंग्रजी आणि क्रिएटिव्ह रायटिंगमध्ये मास्टर ऑफ आर्ट्स पूर्ण केले आहेत. त्यांचे अभिनंदन करण्यासाठी विद्यापीठाकडून फुगे, कपकेकसह एक पुष्पगुच्छ आणि भेटवस्तूंनी टेबल सजवले होते. ‘मी खूप आनंदी आहे, माझा सन्मान झाला आहे. मी भारावून गेलेय, अशी प्रतिक्रिया पदवीदान समारंभादरम्यान डोनोवन यांनी दिली.

लग्नानंतर अभ्यास चुकला

डोनोव्हनचा शैक्षणिक प्रवास खूपच खडतर होता. साडेचार वर्षाच्या असताना त्यांनी पहिल्या इयत्तेला सुरुवात केली. वयाच्या १६ व्या वर्षी हायस्कूलचे शिक्षण पूर्ण केले. हायस्कूलमधून पदवी प्राप्त केली तेव्हा त्यांना कॉलेजमध्ये पाठवण्यासाठी कुटुंबाकडे पैसे नव्हते. आपल्या मुलीकडे अलौकिक बुद्धिमत्ता आहे पण तिने शाळेत जाण्यात वेळ घालवू नये असे त्यांच्या आईला वाटत होते. पदव्युत्तर अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी डोनोव्ह हायस्कूलमध्ये गेल्या होत्या. पण लग्न झाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारी वाढली. त्यांची सहा मुले हळुहळू लहानाची मोठी झाली तेव्हा डोनोव्हनने कॉलेजमध्ये जाण्याची आपली महत्त्वाकांक्षा पुन्हा जागृत केली. वयाच्या ८४ व्या वर्षी त्यांनी कम्युनिटी कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. नंतर त्यांनी क्रिएटिव्ह लेखन अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सदर्न न्यू हॅम्पशायर विद्यापीठात प्रवेश घेतला.

हेही वाचा :  NEET PG Counselling: सर्वोच्च न्यायालयाचा दृष्टिहीन डॉक्टरांना दिलासा

Success Story: पाचवेळा अपयशी पण खचला नाही; सहाव्या प्रयत्नात IES क्रॅक करुन गौरव आला देशात ४४ वा

डोनोव्हन हा सर्वात वयस्कर SNHU पदवीधर

संपूर्ण परीक्षेदरम्यान, जोआनने बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि सर्वात जास्त विनोदाचे प्रदर्शन करणारे धडे तयार केल्याची माहिती डोनोव्हनचे कॅपस्टोन प्रशिक्षक डॉ. विल नेपियर यांनी दिली. डोनोव्ह नेहमी अभ्यासासाठी तयार असतं. डोनोव्हन या SNHU च्या पदवीधरांपैकी सर्वात वयस्कर आहेत.

त्यांच्या महाविद्यालयीन अनुभवाला सरासरीपेक्षा थोडा जास्त वेळ लागला हे खरे असले तरी शिक्षण सुरु करण्याचे कोणते वय नसते हे त्यांनी सिद्ध केले आहे. ‘नेहमी गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न करा. आपण अयशस्वी झाल्यास, पुन्हा प्रयत्न करा पण प्रयत्नांमध्ये सातत्य ठेवा. अभ्यास सुरू ठेवण्यासाठी कधीही उशीर झालेला नसतो असे डोनोव्ह सांगतात.

‘बिग बॉस’च्या घरातपण ‘शेवंता’चीच चर्चा; रोखठोक, बिंधास्त अपूर्वा नेमळेकर कितवी शिकलीय? जाणून घ्या

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …