Vaccination Drive: ‘या’ विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लसीकरण मोहीम

Vaccination Drive: ‘या’ विद्यापीठात विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी लसीकरण मोहीम


Vaccination Drive: दिल्ली विद्यापीठामध्ये शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी करोना लसीकरण मोहीम राबविली जात आहे. दिल्ली विद्यापीठाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘६० वर्षांवरील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यात येत आहे. तसेच दिल्ली विद्यापीठाअंतर्गत येणाऱ्या कॉलेजांना लसीकरण करण्याची विनंती करण्यात आली आहे. नॉर्थ कॅम्पसच्या डब्ल्यूयूएस आरोग्य केंद्र आणि पश्चिम दिल्लीमध्ये लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेमध्ये विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. यामुळे लसीकरण झालेल्यांची संख्या वाढताना दिसत आहे.

नॉर्थ कॅम्पसच्या डब्ल्यूयूएस आरोग्य केंद्र आणि पश्चिम दिल्लीमध्ये लसीकरण मोहीम चालवली जात आहे. लसीचा डोस सोमवार ते शनिवार पश्चिम दिल्ली आरोग्य केंद्रात मिळू शकणार आहे. तर सोमवार, मंगळवार आणि बुधवारी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत उत्तर कॅम्पस सेंटरमध्ये लस उपलब्ध असेल. यामुळे विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या कॉलेजांमधील विद्यार्थीसंख्या वाढण्यास मदत होणार आहे.

IAF Recruitment 2022: इंडियन एअर फोर्समध्ये विविध पदांची भरती
दीर्घकाळ बंद असलेल्या दिल्ली विद्यापीठातील ऑफलाइन वर्ग १७ फेब्रुवारीपासून सुरू झाले आहेत. कॅम्पस पुन्हा उघडल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये खूप उत्सुकता दिसत आहेत. ‘करोना काळात ऑनलाइन अभ्यास नीरस होता. आता मित्रांना भेटण्यास आणि परत कॉलेजमध्ये येण्यास मी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया एका विद्यार्थ्याने दिली आहे. अनेक दिवसांपासून विद्यार्थी दिल्ली विद्यापीठ सुरू होण्याची वाट पाहत आहेत. स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाने (SFI) ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी ‘सडक पर क्लासेस’ मोहीम सुरू केली होती.

हेही वाचा :  चीनमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकार अलर्ट, केंद्रीय आरोग्य सचिवांच्या सर्व राज्यांना सूचना

भारतीय नौदलात १५०० हून अधिक पदांची भरती, जाणून घ्या तपशील
इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार
अंडरग्रेजुएट कोर्स फ्रेमवर्कवर चर्चा
अलीकडेच अॅकेडमिक काऊन्सिलमध्ये २१ जानेवारी २०२२ रोजी सादर केलेल्या अंडरग्रेजुएट कोर्स फ्रेमवर्क (UGCF) वर चर्चा करणयात आली. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० मध्ये सुचविलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी यूजीसीएफ (UGCF) ची निर्मिती करण्यात आली. दिल्ली विद्यापीठाच्या UGCF-२०२२ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुख्य विषयाव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयातून किमान चार पर्यायी पेपर निवडण्याची परवानगी देतो.

कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या प्रशासकीय विभागात भरती, २५ हजार ते १ लाखापर्यंत मिळेल पगार
Bank Job 2022: बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या डिटेल्स

Source link