दिल्लीच्या कॉलेजांमध्ये हळूहळू ऑफलाइन क्लासेस सुरू होत आहेत. बऱ्याच कालावधीनंतर महाविद्यालये सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. गुरुगोविंद सिंग इंद्रप्रस्थ विद्यापीठ आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातही ७ फेब्रुवारीपासून ऑफलाइन वर्ग सुरू झाले आहेत.
कॅम्पस सुरू करण्याची विद्यार्थ्यांची मागणी
दिल्ली विद्यापीठामध्ये प्रथम वर्ष वगळता इतर सर्व वर्ग सुरु होत आहेत. १० मार्चपासून प्रथम वर्षाच्या परीक्षा सुरू होत असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्यांचे ऑफलाइन वर्ग सुरू करण्याबाबत नंतर निर्णय घेतला जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर निराशा दिसत असल्याची प्रतिक्रिया हिंदू कॉलेजचे सचिव आणि एसएफआय नेते अंकित बिरपाली यांनी दिली. यूजी अभ्यासक्रमावर चर्चा करण्यासाठी दिल्ली विद्यापीठाने २०२२-२३ सत्रात शैक्षणिक परिषदेची (Academic Council) बैठक आयोजित केली होती.
अलीकडेच अॅकेडमिक काऊन्सिलमध्ये २१ जानेवारी २०२२ रोजी सादर केलेल्या अंडरग्रेजुएट कोर्स फ्रेमवर्क (UGCF) वर चर्चा करणयात आली. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी २०२० मध्ये सुचविलेल्या सुधारणांची अंमलबजावणी करण्यासाठी यूजीसीएफ (UGCF) ची निर्मिती करण्यात आली. दिल्ली विद्यापीठाच्या UGCF-२०२२ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मुख्य विषयाव्यतिरिक्त इतर कोणत्याही विषयातून किमान चार पर्यायी पेपर निवडण्याची परवानगी देतो.