Dhanush : रजनीकांतच्या लेकीशी फारकत, आता ‘या’ खास व्यक्तीसोबत वेळ घालवतोय साऊथ स्टार धनुष!

Dhanush Aishwarya Rajinikanth Divorce: ‘अतरंगी रे’ अभिनेता धनुष (Dhanush) पत्नी ऐश्वर्या रजनीकांत (Aishwarya Rajinikanth) हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर आगामी चित्रपटाच्या कामात व्यस्त झाला आहे. धनुष सध्या निसर्गरम्य उटीमध्ये ‘Naane Varuven’ या चित्रपटाची शूटिंग करत आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणातून मोकळा वेळ काढत अभिनेता इथल्या निसर्गसौंदर्याचा देखील आनंद लुटत आहे. ऐश्वर्यापासून वेगळं झाल्यावर आता धनुष त्याचा मुलगा याथ्रासोबत (Yathra Dhanush) वेळ घालवत आहे. घटस्फोटाच्या अधिकृत घोषणेनंतर आज धनुषने पहिली सोशल मीडिया पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेता धनुषच्या या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटोत धनुष आपल्या मुलाच्या केसांसोबत मस्ती करताना दिसत आहे. धनुषने या फोटोसोबत छान कॅप्शनही दिले आहे. अभिनेत्याने लिहिले, ‘आता, मी हे आधी कुठे पाहिले आहे का?’

पाहा पोस्ट :

धनुषच्या मुलाचा यथ्रा त्याच्या वडिलांच्या कार्बन कॉपीसारखा दिसतो. धनुषचे चाहते त्याच्या नवीन फोटोवर हार्ट इमोजी बनवून कमेंट करत आहेत. धनुष त्याच्या नवीन चित्रपटासाठी तिरंदाजी देखील शिकत आहे. नव्या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, धनुष त्याच्या भावासोबत या चित्रपटात काम करत आहे.   

हेही वाचा :  सिनेप्रेमींना 94 वा 'ऑस्कर पुरस्कार'सोहळा कधी आणि कुठे पाहता येईल? जाणून घ्या..

धनुषची सोशल मीडियावर वापसी!

घटस्फोटाची अधिकृत घोषणा केल्यानंतर धनुष अचानक सोशल मीडियावरून गायब झाला होता. रिपोर्ट्सनुसार, तो त्याच्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. आता धनुष त्याच्या जुन्या शैलीत परतला आहे, जे पाहून अभिनेत्याच्या चाहत्यांना सर्वाधिक आनंद होत आहे. धनुषने महिनाभरापूर्वी 17 जानेवारी 2022 रोजी ऐश्वर्या रजनीकांतपासून घटस्फोटाची घोषणा केली. अभिनेत्याने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले होते की, तो आणि ऐश्वर्या आता वेगळे झाले आहेत आणि चाहत्यांना विनंती केली की, त्यांनी त्यांच्या निर्णयाचा आदर करावा आणि त्यांना त्यातून बाहेर येण्यासाठी वेळ द्यावा.  

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …