‘शेरशाह’ सिद्धार्थ मल्होत्राला पाहताच कियारा अडवाणीने मारली मिठी! ‘लव्ह बर्ड्स’चा व्हिडीओ चर्चे

Sidharth Malhotra-Kiara Advani : बॉलिवूड अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा (Sidharth Malhotra) ​​आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांचा एक क्यूट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स 2022’मधील (Dadasaheb Phalke International Film Festival Awards2022) या व्हिडीओमुळे सिड आणि कियारा यांची जोडी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अवॉर्ड शोमध्ये सिद्धार्थ मल्होत्राला ‘शेरशाह’ या चित्रपटासाठी ‘क्रिटिक्स सर्वोत्कृष्ट अभिनेत्या’चा पुरस्कार देण्यात आला आहे.

चर्चित व्हिडीओमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा ​​रेड कार्पेट एरियामध्ये पापाराझींसमोर या पुरस्कारासह फोटो पोज देत आहे. इतक्यात, कियारा अडवाणी तिथे आली आणि तिने थेट सिद्धार्थला मिठी मारून त्याचे अभिनंदन केले. सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या अफेअरच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून समोर येत आहेत आणि हा व्हिडीओ समोर आल्यानंतर या चर्चेला हवा मिळाली आहे.

पहा व्हिडीओ :

कॅमेरा पाहून लाजली कियारा!

‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्स’मधून समोर आलेल्या या व्हिडीओमध्ये कियारा अडवाणी खूपच सुंदर दिसत आहे. पिवळ्या रंगाच्या या साडीत तिचे सौंदर्य आणखीनच खुलून आले आहे. सिद्धार्थ मल्होत्राला मिठी मारल्यानंतर, ती पापाराझींचे कॅमेरे पाहून चक्क लाजली.

‘शेरशाह’ने पटकावले अनेक पुरस्कार!

करण जोहरच्या ‘धर्मा प्रॉडक्शन’ अंतर्गत बनलेला ‘शेरशाह’ हा चित्रपट 2021 साली थेट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. हा चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांना खूप आवडला होता. कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याशी लढताना शहीद झालेले कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्राने मुख्य भूमिका साकारली आहे. या चित्रपटात अभिनेत्री कियारा अडवाणीने कॅप्टन विक्रम बत्रांची मैत्रीण ‘डिंपल चीमा’ची भूमिका साकारली होती. दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव पुरस्कार 2022मध्ये ‘शेरशाह’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. दुसरीकडे, कियारा अडवाणीला देखील या चित्रपटासाठी पुरस्कार मिळाला आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Ashok Patki : ‘श्यामची आई’च्या गीतांना अशोक पत्कींच्या संगीताचा साज

Ashok Patki : मागील बऱ्याच दिवसांपासून ‘श्यामची आई’ (Shyamchi Aai) या आगामी सिनेमाची सर्वत्र जोरदार …

Ayushyavar Bolu Kahi : ठाण्यात रंगणार ‘आयुष्यावर बोलू काही’चा विनामूल्य कार्यक्रम

Ayushyavar Bolu Kahi : ठाण्यात लवकरच ‘आयुष्यावर बोलू काही’ (Ayushyavar Bolu Kahi) बहुचर्चित कार्यक्रम होणार …