नारायण राणेंना मोदी सरकारचा दणका; चिवला बीचवरील निलरत्न बंगल्यावर पडणार हातोडा? कारवाईचा आदेश

बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार

राज्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असताना भाजपाकडून किरीट सोमय्यांसोबत नारायण राणेही आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. दरम्यान एकीकडे मुंबईत नारायण राणेंच्या घरावर मुंबई महापालिका कारवाई करण्याची तयारी करत असल्याने भाजपा नेत्यांकडून टीका केली जात असताना आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. नारायण राणेंना थेट केंद्र सरकारने दणका दिला असून कोकणातील निलरत्न बंगल्यावर हातोडा पडण्याची शक्यता आहे.

Action against Rane’s bungalow Live : नारायण राणेंच्या बंगल्यावर कारवाईसाठी महापालिकेच्या हालचालींना सुरुवात

राणे कुटुंबीयांचा मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर निलरत्न बंगला आहे. केंद्र सरकारने या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार करण्यात आली असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने ऑगस्ट २०२१ मध्ये ही तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई महापालिकेने बंगल्यावर कारववाईची तयारी केल्याने आक्रमक झालेले राणे कुटुंबीय या प्रकरणात काय भूमिका घेतात हे पहावं लागणार आहे.

मुंबईतील बंगल्यावर कारवाईची तयारी

नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याबाबत कारवाई करण्याबाबत मुंबई महापालिकेची हालचाल सुरू झाली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी राणेंच्या बंगल्याची पाहणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राणेंच्या बंगल्याबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोसबस्त तैनात करण्यात आला होता.

माहिती अधिकार कार्यकर्त्यांने अनधिकृत बांधकामप्रकरणी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन मुंबई महापालिकेच्या पथकाने शुक्रवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्याची तपासणी केली होती. तसंच पथकाने बंगल्यातील बांधकामांचे मोजमाप घेऊन संबंधित कागदपत्रांची तपासणीही केल्याची माहिती समोर आली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …