“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार


मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे.

दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि त्यांचं भाषेवर असलेलं हे प्रेम तर सगळ्यांना माहित आहे. ते बऱ्याच वेळा मराठी भाषेविषयी आपण तिला किती कमी लेखतो यावर बोलताना दिसतात. आता मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं नागराज मुलाखतीत मराठी भाषेला किती दुय्यम स्थान दिलं जातं याविषयी बोलताना अनेक गोष्टी सांगिल्या. तर अजय-अतुल जोडीतील अतुलने मराठी कलाकार सुद्धा सेटवर मराठी नाही तर हिंदीत संवाद साधतात अशी तक्रार केली आहे.

“आपण शहरात गेल्यानंतर प्रमाण भाषा बोलायचा प्रयत्न करतो आणि घरी आल्यावर आपल्या बोलीभाषेत बोलतो. त्यावेळी आपल्या बोलीभाषेबद्दल आपल्याच मनात न्यूनगंड निर्माण होतो आणि मग आपण त्याचा वापर करणे थांबवतो. हे असं न करता प्रत्येकाने आपली बोलीभाषा जपली पाहिजे”, असे नागराज म्हणाले.

आणखी वाचा : रितेशचा ‘श्रीवल्ली’ गाण्यावर डान्स पाहताच जिनिलियाने दिला धक्का अन्…

आणखी वाचा : एवढे पैसे कुठून आले? गाडी घेतल्यानंतर धमक्यांचे फोन; व्हिडीओ शेअर करत युट्यूबरने दिले स्पष्टीकरण

पुढे नागराज म्हणाले, “गावातले मुंबईत आले की त्यांना मराठी बोलायला लाज वाटते कारण त्यांना ती भाषा येत नाही. मी बऱ्याचवेळा प्रयत्न करतो की हॉटेलमध्ये ऑडर द्यायची तर मराठीत बोलतो. पण तिथून काही उत्तरच येत नाही. तर तिसऱ्यांदा बोलल्यानंतर कळतं की समोरची व्यक्ती ही मराठीच आहे.”

हेही वाचा :  नितेश राणेंच्या आरोपावर पूजा भटने मौन सोडले..

आणखी वाचा : युक्रेनच्या ‘या’ महिलेला घाबरत होते रशियाचे राष्ट्रपती पुतिन

यावर अतुल बोलतो “एवढचं काय आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये काही मराठी कलाकार आहेत, ते स्वत: सेटवर मराठीत नाही तर हिंदीत बोलतात. मी नाव घेतलं असतं पण नको. ते सरळ बोलतात ‘क्या चल रहा है? कैसा है आज कल?’ आमचं असं होतं तू काय हिंदीत बोलतोयस.” यावर नागराज बोलतात, “हिंदी कलाकार तसे बोलतात म्हणून ते ही तसेच बोलायला जातात.” तर अतुल बोलतो, “मी आणि अजय कुठेही गेलो. निर्माता हिंदी असला आणि त्याला मराठी भाषा कळत नसली तरी आम्ही मराठीत बोलतो. मराठी गायक जरी गात असेल तरी आम्ही चर्चा करताना मराठीतच करतो.”Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …

Video: …अन् रशियन रणगाड्याने भररस्त्यात धावत्या कारला चिरडलं; अंगावर काटा आणणारा घटनाक्रम कॅमेरात कैद

रशियन सैन्याने युक्रेनमध्ये शिरुन हल्ला करण्यास सुरुवात केल्यानंतरचा हा व्हिडीओ एका रहिवाशी इमारतीच्या खिडकीतून काढण्यात …