तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? रोज गंगेत स्नान करुन पाप करतात; संजय राऊत भाजपावर संतापले


डर्टी पॉलिटिक्स…आणि हे करणारे भाजपाचे डर्टी १२ आहेत, संजय राऊतांची टीका

शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशात प्रचारसभा घेताना देशात सध्या घाणेरडं राजकारण सुरु असल्याची टीका केली. आदित्य ठाकरेंच्या या विधानावर सहमती दर्शवताना संजय राऊत यांनी राज्यातील भाजपा नेते आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप करतात. त्याच्यामुळे गंगा जास्त खराब झाली आहे अशा शब्दांत त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना संताप व्यक्त केला.

“पालिकेच्या शिपायांवरही धाड टाकतील,” शिवसेना नेत्याच्या घरावर IT ने धाड टाकल्यानंतर राऊतांची प्रतिक्रिया

“आपल्या विचारांचं सरकार आलं नाही म्हणून त्या पक्षाच्या लोकांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या आधारे चिरडून टाकायचं, बदनाम करायचं सुरु आहे. तुमचे लोक धुतळ्या तांदळासारखे आहेत का? तुमचे लोक रोज गंगेत स्नान करतात आणि पाप करतात. त्याच्यामुळे गंगा जास्त खराब झाली आहे. आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे ते देशातील सध्याचं सत्य आहे. आम्ही पाहून घेऊ,” असा इशारा संजय राऊतांनी यावेळी दिला.

मोदी, शहा व त्यांच्या ‘नाझी’ फौजांचे पतन व्हावे ही श्रीरामाचीच इच्छा, सामना अग्रलेखात उल्लेख; राऊत म्हणाले…

हेही वाचा :  जुन्नरच्या हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार; अजित पवार

“डर्टी पॉलिटिक्स…आणि हे करणारे भाजपाचे डर्टी १२ आहेत. आदित्य ठाकरेंनी उत्तर प्रदेशात झंझावत निर्माण केला. त्यांच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यांना भेटण्यासाठी, पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोक उभे होते. भाषण ऐकण्यासाठी लोक जमले होते,” असं संजय राऊतांनी यावेळी सांगितलं.

“आम्ही निर्भय आणि बेडर”

“आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करा, सुरक्षा दल आमच्या दारात उभं करा, तपास यंत्रणांच्या माध्यमातून गळे आवळण्याचा प्रयत्न करा पण तरी आमच्या तोंडून सत्यच बाहेर पडेल आणि ते जळजळीत असेल. कितीही घोषणा दिल्या तरी फरक पडत नाही. आम्ही निर्भय आणि बेडर आहोत,” असं संजय राऊत म्हणाले.

“निवडणुकीचं राजकारण सुरु आहे, पण हे खूपच गलिच्छ राजकारण सुरु आहे. निवडणूक हारल्यानंतर किंवा सत्ता आली नाही किंवा तिथपर्यंत पोहोचू शकले नाही यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा तसंच राज्यपाल भवनाचा गैरवापर केला जात आहे,” अशी टीका यावेळी त्यांनी केली. २०२४ पर्यंत हे आम्हाला सहन करायचं आहे. महाराष्ट्रालाही सहन करायचं आहे. पश्चिम बंगाल, झारखंड. पंजाबलाही सहन करायचं आहे. २०२४ नंतर पाहूयात असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

हेही वाचा :  बाजार समित्यांमध्ये मविआची सरशी, कोणाला किती जागा मिळाल्या जाणून घ्या एका क्लिकवर



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …