Anshula Kapoor : अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरचा फिट टू फॅट अवतार

Anshula Kapoor : अभिनेता अर्जुन कपूरची बहीण अंशुला कपूरने नुकतेच सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमुळे सध्या ती चांगलीच चर्चेत आहे. याच कार म्हणजे अंशुलाचा फिट टू फॅट अवतार. अर्जुनच्या बहिणीचे हे बदलेल रुप पाहून अनेकांना आश्चर्यचा धक्का बसला आहे. अंशुला कपूरचे असे रूप तुम्ही कुठेही पाहिले नसेल. भाऊ अर्जुन कपूरप्रमाणे अंशुला कपूरनेही हा फॅट टू फिट प्रवास केला आहे.

अंशुला या फोटोंमध्ये खूपच ग्लॅमरस दिसत आहे. अंशुला कपूरचा हा आत्मविश्वास पाहण्यासारखा आहे. मोकळे केस आणि सैल टी-शर्ट घातलेली अंशुला एकदम फिट दिसत आहे. तिच्या फोटोवर काका संजय कपूरसह कतरिना कैफसारख्या अनेक कलाकारांनी कमेंट करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.


अंशुला कपूरचा हा नवा अवतार पाहून चाहते मलायका अरोरालाही याच श्रेय देत आहेत. चाहत्यांनी म्हटले आहे की, मलायका लाइफमध्ये आल्यानंतर नंदनेही तिच्या वहिनीला पाहून फिटनेसवर लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. भाऊ अर्जुन कपूरसोबत नेहमी हेवी वेटमध्ये दिसणार्‍या अंशुला कपूरचा हा नवा अवतार तिच्या सावत्र बहिणी जान्हवी कपूर आणि खुशी कपूरला टक्कर देणारा आहे.
तुम्ही तिच्या या फोटोंची तुलना आधीच्या फोटोशी केल्यास, अंशुलाने तिच्या फिटनेससाठी किती मेहनत घेतली आहे, याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

हेही वाचा :  'यांच्याकडून शिकावं लागेल'; विराट आणि जाडेजाचा डान्स पाहून शाहरुख झाला इम्प्रेस

अंशुला नेहमीच तिच्या भावाची आणि वडिलांची लाडकी राहिली आहे, त्यामुळे अंशुलाचे हे परिवर्तन पाहून तिच्या कुटुंबीयांना खूप अभिमान वाटत आहे.

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …