Sanjay Chouhan : संजय चौहान यांचे वयाच्या 62 व्या वर्षी निधन

Sanjay Chouhan Passed Away : ‘पान सिंह तोमर’ (Paan Singh Tomar) या सिनेमाचे लेखक संजय चौहान (Sanjay Chouhan) यांचे निधन झाले आहे. मुंबईतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी वयाच्या 62 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.  

संजय चौहान यांच्या पश्चात पत्नी सरिता आणि मुलगी सारा आहे. गेल्या काही दिवसांपासून संजय यांची प्रकृती खालावली होती. लिव्हर संबंधी आजाराने त्यांना ग्रासलं होतं. ‘पान सिंह तोमर’ (Paan Singh Tomar), ‘आय एम कलाम’ (I Am Kalam), ‘साहेब बीवी गैंगस्टर’ (Saheb Biwi Gangster) अशा अनेक सिनेमांचं लेखन संजय चौहान यांनी केलं आहे. 

‘आय एक कलाम’ (I am Kalam) या सिनेमासाठी संजय चौहान यांना 2011 साली फिल्मफेअर पुरस्काराने (Filmfare Awards) सन्मानित करण्यात आले होते. संजय यांचे ‘मैंने गांधी कौ नहीं मारा’ (Maine Gandhi Ko Nahin Mara) आणि ‘धूप’ (Dhoop) सारखे सिनेमेदेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय चौहान यांचा जन्म मध्यप्रदेशात झाला आहे. त्यांचे वडील रेल्वेत कामाला होते. तर आई एका शाळेत शिक्षिकेचे काम करायची. संजय यांनी पत्रकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. पण 1990 साली सोनी टीव्हीवरील एका मालिकेच्या माध्यमातून त्यांनी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं. 

हेही वाचा :  दीपिका चिखलिया यांना नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; म्हणाले...

news reels

आज दुपारी गोणार अंत्यसंस्कार 

संजय चौहान यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12.30 वाजता मुंबईतील ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या निधनाने मनोरंजनसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ते बॉलिवूडमधील एक लोकप्रिय लेखक होते. अनेक सेलिब्रिटी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत. 

संबंधित बातम्या

Anushka Sharma : अभिनेत्री अनुष्का शर्माची हायकोर्टात याचिका, विक्री कर विभागाने बजावलेल्या नोटीसीला आव्हान



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …