Rajesh Khanna : बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना!

Rajesh Khanna : बॉलिवूड अभिनेते राजेश खन्ना (Rajesh Khanna) यांचा जन्म 29 डिसेंबर 1942 मध्ये पंजाबमधील अमृतसर येथे झाला. त्यांचं मूळ नाव जतीन खन्ना असलं तरी बॉलिवूडकर त्यांना ‘काका’ म्हणून हाक मारायचे. त्यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात एका पेक्षा एक सिनेमांत काम केलं आहे. 

राजेश खन्ना यांनी त्यांच्या सिनेसृष्टीतील प्रवासात 180 सिनेमांत काम केलं आहे. यातील 128 सिनेमांत ते मुख्य भूमिकेत झळकले आहेत. त्यांचे सलग 15 सिनेमे गाजले आहेत. 15 सिनेमे गाजवल्यानंतर त्यांना ‘बॉलिवूडचा सुपरस्टार’ हा किताब मिळाला. सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना तीन वेळा फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 

‘आनंद’ सिनेमाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन वेळेआधी सेटवर हजर राहायचे. तर राजेश खन्ना मात्र उशीरा सेटवर पोहोचायचे. शूटिंगच्या सेटवर वेळेत येत नसल्याने त्यांच्यावर अनेक आरोप लावण्यात आले होते. यावर ते म्हणायचे,”क्लार्क कामावर वेळेवर येतात. पण मी क्लार्क नसून कलाकार आहे”. 

राजेश खन्ना यांनी मनोरंजनसृष्टीसह राजकारणातही आपलं नशीब आजमावलं आहे. कॉंग्रेसकडून त्यांनी 1991 ते 1996 या काळात दिल्ली लोकसभेसाठी खासदार म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेतला. 

हेही वाचा :  Urmilla Kothare : उर्मिला कोठारे सायबर क्राइमची शिकार होता होता वाचली

live reels News Reels

एकीसोबत रिलेशन अन् दुसरीसोबतच लग्न

राजेश खन्ना 1966-72 या काळात फॅशन डिझायनर आणि अभिनेत्री अंजू महेंद्रूसोबत रिलेशनमध्ये होते. पाच वर्ष ते अंजूसोबत रिलेशनमध्ये होते. राजेश यांनी लग्नासाठी त्यांना अंजू यांना लग्नासाठी विचारलं होतं. पण आधी करिअर मग लग्न असं कारण अंजू यांनी दिलं. त्यामुळे त्या दोघांत प्रचंड वाद झाले. याच कारणाने त्यांचं नातं पुढे जाऊ शकलं नाही. त्यानंतर राजेश खन्ना 1973 साली डिंपल कपाडीयासोबत लग्नबंधनात अडकले. राजेश खन्ना यांच्या लेकीचे नाव ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) आहे. राजेश खन्ना आणि त्यांची लेक ट्विंकल दोघांचाही वाढदिवस 29 डिसेंबरलाच असतो. 

राजेश खन्नाचे सुपरहिट 10 सिनेमे ( Rajesh Khanna Polular Films) : 

आराधना (1969) (Aradhana)
दो रास्ते (1969)  (Do Raste)
कटी पतंग (1970) (Kati Patang)
सच्चा झूठा (1970) (Sachaa Jhutha)
हाथी मेरे साथी (1971) (Haathi Mere Saathi)
आनंद (1971) (Anand)
अमर प्रेम (1972) (Amar Prem)
बावर्ची (1972) (Bawarchi)
अजनबी (1974) (Ajanabee)
अवतार (1983) (Avtaar)

राजेश खन्ना यांचा बायोपिक येणार!

दिवंगत अभिनेते राजेश खन्ना यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फराह खान (Farah Khan) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहेत. या सिनेमात राजेश खन्ना यांच्या भूमिकेत कोण झळकणार हे अद्याप समोर आलेलं नाही. 

हेही वाचा :  राम गोपाल वर्माचं ट्वीट चर्चेत म्हणाला, 'तिच्या आत्म्यानं परत यावं अन् त्याचे 70 तुकडे करावेत..

संबंधित बातम्या

सुपरस्टार राजेश खन्ना यांच्या जीवनावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस; फराह खान करणार दिग्दर्शन

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …