Tag Archives: Marathi News

अरे देवा! IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता 14 तास काम करावं लागणार?

अरे देवा! IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आता 14 तास काम करावं लागणार?

IT Jobs : माहिती आणि तंत्रज्ञान अर्थात आयटी क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या, त्यांना कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा या आणि अशा अनेक कारणांनी IT मध्ये काम करणाऱ्यांचा अनेकांनाच हेवा वाटत असतो. पण, आता हेच कर्मचारी एका दुविधेमध्ये सापडले असून, आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कर्नाटकामध्ये कैक कर्मचाऱ्यांनी नाराजीचा तीव्र सूर आळवला आहे.  कर्नाटकस्थित आयटी कंपन्यांकडून राज्य शासनाकडे एक प्रस्ताव पाठवण्यात …

Read More »

काहीतरी मोठं घडणार? जम्मू काश्मीरमध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात; अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग

काहीतरी मोठं घडणार? जम्मू काश्मीरमध्ये रातोरात लष्कराची मोठी कुमक तैनात; अमित शाह यांच्या बैठकीनंतर हालचालींना वेग

Jammu Kashmir News : जम्मू काश्मीर भागामध्ये कमी झालेल्या दहशतवादानं मागील काही महिन्यांपासून पुन्हा एकदा डोकं वर काढण्यास सुरुवात केली. ज्या भागाला दहशतवादमुक्त म्हणून घोषित करण्यात आलं होतं त्याच भागानं सध्या असे काही दहशतवादी हल्ले पाहिले, की इथं स्थानिकांवर जीव मुठीत घेऊन वावरण्याची वेळ आली आहे.  देशातील वाढत्या दहशतवादी कारवायांचं हे सावट गडद होत असल्याचं पाहता केंद्र सरकारनं काही कठोर …

Read More »

Maharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको

Maharashtra Weather News : कोकणासह मुंबई, उपनगरात मुसळधार; ‘या’ इशाऱ्याकडे अजिबात दुर्लक्ष नको

Maharashtra Weather News : राज्यात आठवड्याभरापासून सुरू असणाऱ्या पावसानं अद्याप उसंत दिलेली नसतानाच आता पावसाचा जोर आठवड्याच्या शेवटी चांगलाच वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सध्याच्या घडीला बंगालच्या उपसागर क्षेत्रामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळं येत्या काळात पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं वर्तवला आहे. परिणामी कोकणासह मुंबईचं किनारा क्षेत्र, उपनगरीय भाग आणि कोकणातील संपूर्ण किनारपट्टी भागामध्ये वादळी …

Read More »

TATA चा हा शेअर म्हणजे पैशांचा पाऊस; 5000 टक्क्यांहून अधिक परतावा देतोय स्टॉक; ही कंपनी करते तरी काय?

TATA चा हा शेअर म्हणजे पैशांचा पाऊस; 5000 टक्क्यांहून अधिक परतावा देतोय स्टॉक; ही कंपनी करते तरी काय?

TATA Share Price : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्यांचा आकडा मोठा असून, दिवसागणिक या क्षेत्रामध्ये सक्रियरित्या गुंतवणूक करणाऱ्यांचा हा आकडा वाढतानाच दिसत आहे. त्यातही अनेक गुंतवणूकदार काही ठराविक कंपन्यांना, शेअर्सना प्राधान्य देताना दिसतात. कारण असतं ते म्हणजे विश्वासार्हता.  जेव्हाजेव्हा विश्वासार्हतेचा मुद्दा येतो तेव्हातेव्हा या शर्यतीत टाटा उद्योग समूह कायमच अग्रस्थानी असल्याचं पाहायला मिळतं. एखादं नवं उत्पादन असो किंवा मग गुंतवणुकीसाठीची आखणी. …

Read More »

Ladka Bhau Yojana : ‘लाडका भाऊ’ होण्यासाठी काम तर करावंच लागेल, फुकट काहीच नाही!

Ladka Bhau Yojana : ‘लाडका भाऊ’ होण्यासाठी काम तर करावंच लागेल, फुकट काहीच नाही!

Mukhyamantri Yuva Karya Prashikshan Yojana : राज्यात सध्या चर्चा होतीये ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेची… मात्र, लाडक्या बहिणीनंतर आता राज्य सरकारनं लाडका भाऊ योजना आणून राज्यातील तरुणांना खूश करण्याचा प्रयत्न केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंढरपुरात ही घोषणा केलीय. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं या योजनेचे नाव आहे. या योजनेनुसार, बारावी पास तरुणांना दरमहा 6 हजार रुपये, आयटीआय आणि डिप्लोमा केलेल्या …

Read More »

Maharastra Politics : विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार? भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीची वेगळी खेळी?

Maharastra Politics : विधानसभेला नवाब मलिक अपक्ष लढणार? भाजपच्या विरोधामुळं राष्ट्रवादीची वेगळी खेळी?

Nawab Malik Will contest as an independent : नवाब मलिक… राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आणि मुंबईतील अणुशक्तीनगर मतदारसंघाचे आमदार… मात्र आगामी विधानसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवण्याची तयारी मलिकांनी सुरू केल्याचं समजतंय. झी २४ तासला खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली.केवळ नवाब मलिकच नाहीत, तर त्यांची कन्या देखील विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी करत असल्याचं समजतंय. सना आणि निलोफर या दोघींपैकी एकीला निवडणुकीत …

Read More »

ऑगस्टमध्ये 1 सुट्टी घेऊन पूर्ण 5 दिवस फिरा, लाँग विकेंडचं शेड्युल जाणून घ्या

ऑगस्टमध्ये 1 सुट्टी घेऊन पूर्ण 5 दिवस फिरा, लाँग विकेंडचं शेड्युल जाणून घ्या

पावसाळा म्हटलं की, अनेकांना फिरण्याचे वेध लागतात. पण अशावेळी आड येतं ते ऑफिसचं काम. सुट्टी नसताना पावसात भिजण्याचा आनंद कसा घ्यायचा असा प्रश्न अनेकांना पडतो. आवडीच्या जागी फिरण्यासाठी आता ऑफिसला किंवा मुलांच्या शाळांना सुट्टी घ्यावी लागणार नाही.  ऑगस्ट महिना हा लाँग विकेंडने भरलेला आहे. अवघी 1 सुट्टी घेऊन तुम्ही पाच दिवसाच्या लाँग विकेंडचा प्लान करु शकता. हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात कुटुंबासोबत …

Read More »

संभाजीराजे छत्रपती आज विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार, म्हणाले, माझ्यावर गुन्हा…

संभाजीराजे छत्रपती आज विशाळगडाच्या दिशेने रवाना होणार, म्हणाले, माझ्यावर गुन्हा…

SambhajiRaje Chhatrapati: विशाळगड अतिक्रमण मुक्त होण्यासाठी माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर त्याचा मला आनंद आहे, असं वक्तव्य संभाजी राजे छत्रपती यांनी केलं आहे. आज संभाजीराजे विशाळगडच्या दिशेने रवाना होणार आहेत. कोल्हापुरातील भवानी मंडप इथ असणाऱ्या जुना राजवाडामधील कुलस्वामिनी तुळजा भवानी मातेचे दर्शन घेवून संभाजीराजे विशाळगडच्या दिशेने रवाना होणार आहेत.  राज्य सरकार हे स्थानिक आमदाराच्या दबावाखाली विशाळगडला अतिक्रमण मुक्त होवू …

Read More »

नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हान,मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावल्याचा आरोप

नारायण राणेंच्या खासदारकीला आव्हान,मते विकत घेऊन आणि मतदारांना धमकावल्याचा आरोप

MP Narayan Rane: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात लोकसभा निवडणूक खूप रंजक झाली. महायुतीचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते विनायक राऊत अशी लढत येथे पाहायला मिळाली. दोघेही तुल्यबळ नेते असल्याने कोण निवडून येणार? याबद्दल साशंकता होती. पण नारायण राणेंनी येथे विजय मिळवला. राणे खासदार म्हणून निवडून आले खरे पण आता खासदारकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.  मते विकत घेऊन, मतदारांना …

Read More »

…तर ओबीसींसोबत आंबेडकरी जनतादेखील मुंबईत धडकेल – लक्ष्मण हाके

…तर ओबीसींसोबत आंबेडकरी जनतादेखील मुंबईत धडकेल – लक्ष्मण हाके

Maratha OBC Reservation:  मराठा आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे उपोषण केलं होतं. यानंतर राज्य सरकारने त्यांच्या काही मागण्यांवर सहमती दर्शवली. सगेसोयरे, सरसकट आरक्षणावर मनोज जरांगे ठाम आहेत. आगामी निवडणूकीत सरकारला इंगा दाखवण्याचा इशारा त्यांनी दिलीया. दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेदेखील आक्रमक झाले आहेत. जरांगेंच्या भूमिकेनंतर त्यांनीदेखील आंदोलनाचा इशारा दिलाय. काय सुरुयं वाद? सविस्तर जाणून घेऊया.   सगेसोयऱ्यांचा अध्यादेशाबाबत …

Read More »

पंढरपूरच्या शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात सापडला मृत बेडूक

पंढरपूरच्या शाळेत मुलांच्या जीवाशी खेळ, पोषण आहारात सापडला मृत बेडूक

Pandharpur Shaley Poshan Aahar: शालेय विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा, यासाठी शासन विविध योजना राबवत असते. पण या योजना तळागाळापर्यंत पोहोचेपर्यंत त्याच्या चिंधड्या उडालेल्या असतात. योग्य नियोजन, शिस्तबद्धता, स्वच्छता न पाळल्याने विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. पंढरपूरच्या शाळेत एक किळसवाणा आणि संतापजनक प्रकार समोर आलाय. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  पंढरपुरात पोषण आहाराच्या मध्ये बेडकाचे पिल्लू सापडले …

Read More »

बॅक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती; चांगले पद, पगाराच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

बॅक ऑफ महाराष्ट्रमध्ये बंपर भरती; चांगले पद, पगाराच्या नोकरीसाठी ‘येथे’ पाठवा अर्ज

BOM Recruitment 2024: बॅंक भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. बॅंक ऑफ महाराष्ट्रमध्ये इंटिग्रेटेड रिस्क मॅनेजमेंट, फॉरेक्स अ‍ॅण्ड ट्रेझरी, आयटी, डिजिटल बॅंकिंग/सीएसएसओ/सीडीओ आणि …

Read More »

कॉर्पोरेट कल्चरचा सर्वात क्रूर प्रकार : राजीनामा द्यावा म्हणून 4 दिवस अंधाऱ्या खोलीत डांबलं!

कॉर्पोरेट कल्चरचा सर्वात क्रूर प्रकार : राजीनामा द्यावा म्हणून 4 दिवस अंधाऱ्या खोलीत डांबलं!

Job News : कामाचे तास, कामाचं स्वरुप, मिळणारा पगार आणि न संपणारा तणाव… हीच परिस्थिती सध्याच्या कॉर्पोरेट किंवा खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढं कैक आव्हानं उभी करत आहे. सुरुवातीला चांगली वाटणारी नोकरी अनेक अपेक्षांच्या दबावाखाली  कशा पद्धतीनं या कर्मचाऱ्यांना चिरडतेय या साऱ्याची प्रचिती अनेकदा अनेक माध्यमांतून सध्या पाहायला मिळत आहे. याच कॉर्पोरेट क्षेत्राचा एक भीतीदायक चेहरा नुकताच जगासमोर आला आहे. …

Read More »

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक, कुणाचा गेम होणार? घोडेबाजाराची शक्यता

Vidhanparishad Election : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक, कुणाचा गेम होणार? घोडेबाजाराची शक्यता

VidhanParishad Election 2024 : विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी शुक्रवारी होणारी निवडणूक चुरशीची ठरणार आहे. कारण 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असून, सर्वच राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार निवडून आणण्यासाठी कंबर कसलीय… भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर असे 5 उमेदवार, शिवसेना शिंदे गटाकडून कृपात तुमाने आणि भावना गवळी असे 2 उमेदवार, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून शिवाजीराव …

Read More »

NASA मध्ये नोकरीसाठी काय लागत शिक्षण? किती मिळतो पगार? कुठे करायचा अर्ज? A टू Z माहिती

NASA मध्ये नोकरीसाठी काय लागत शिक्षण? किती मिळतो पगार? कुठे करायचा अर्ज? A टू Z माहिती

NASA Job Details: नॅशनल अ‍ॅरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन म्हणजेच नासा ही एक अमेरिका सरकारची स्पेस एजन्सी आहे. अंतराळासंबंधी विषयांवर ही संस्था संशोधन करते तसेच अंतराळात होणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवून असते. अमेरिकाच नव्हे तर जगभरातील देशांकडे अंतराळातील रहस्य माहिती करुन घेण्यासाठी स्वत:ची यंत्रणा आहे. भारताकडे इस्रो ही संस्था हे काम करते. पण या सर्वात नासाचे नाव सर्वात वर घेतले जाते. अंतराळाची आवड …

Read More »

बापरे! 22 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला गिर्यारोहक त्याच ठिकाणी अचानक समोर आला आणि… ; पाहणारा प्रत्येकजण दचकला

बापरे! 22 वर्षांपूर्वी बेपत्ता झालेला गिर्यारोहक त्याच ठिकाणी अचानक समोर आला आणि… ; पाहणारा प्रत्येकजण दचकला

Mountain climbing trekking news : उंचच उंच डोंगर पाहिले, की त्यांच्या शिखरापर्यंत पोहोचण्याची अनेकांचीच इच्छा होते. या डोंगराच्या शिखरावरून आजुबाजूचा परिसर नेमका कसा दिसत असेल, या एका प्रश्चाचं उत्तर शोधण्यासाठी मग धडपड सुरु होते. याच उत्सुकता आणि कुतूहलापोटी अनेक मंडळी गिर्यारोहणाच्या क्षेत्राकडे वळतात आणि मजल दरमजल करत अनेक पर्वतशिखरं, सुळके सर करतात. मागील काही वर्षांमध्ये ट्रेकिंग आणि माऊंटन क्लायंबिंग अर्थात …

Read More »

मोठी घोषणा! येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात 10 नवीन मेडिकल कॉलेज

मोठी घोषणा! येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात 10 नवीन मेडिकल कॉलेज

New Medical Colleges: दरवर्षी वैद्यकीय प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चढाओढ पाहायला मिळते. कॉलेजेसची असलेली कमी संख्या आणि तुलनेत वैद्यकीयसाठी इच्छुक विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या यामुळे मोठी तारांबळ उडते. पण आता अत्यंत महत्वाची अपडेट समोर आली आहे. राज्यात नवे मेडिकल कॉलेज येणार आहेत. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. राज्यात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय या शैक्षणिक वर्षापासून सुरु करण्याचे शासनाचे  प्रयत्न असून मुंबई येथील शासकीय …

Read More »

खासगी ऑडीवर लाल दिवा, ‘महाराष्ट्र शासन’ची पाटी; कोण आहेत पूजा खेडकर?

खासगी ऑडीवर लाल दिवा, ‘महाराष्ट्र शासन’ची पाटी; कोण आहेत पूजा खेडकर?

IAS Pooja Khedkar: सध्या पुण्यात एका ट्रेनी IAS अधिकारी ‘मॅडम’ची चर्चा आहे. कारण जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा ट्रेनी IAS अधिकारी मॅडमच मोठ्या आणि VVIP असल्याप्रमाणे वागत आहेत . त्यांनी आपल्या  खासगी आलीशान गाडीला अंबर दिवा लावलाय. त्यावर महाराष्ट्र शासन लिहिलेली पाटीदेखील लावलीय.  IAS अधिकारी पूजा खेडकर असे यांचे नाव आहे. सध्या पूजा यांची बदली करण्यात आली आहे. काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊया. …

Read More »

‘लाडकी बहीण’ योजना राबवणं होणार अवघड? तहसीलदारांच्या भूमिकेमुळे सरकारची डोकेदुखी वाढली

‘लाडकी बहीण’ योजना राबवणं होणार अवघड? तहसीलदारांच्या भूमिकेमुळे सरकारची डोकेदुखी वाढली

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील महिलांसाठी लाडकी बहीण योजनेची घोषणा करण्यात आली. विधानसभा निवडणुकीच्या आधी जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा लाभ पोहोचला जावा यासाठी सरकार प्रयत्नशिल आहे. सरकारकडून याची मोठ्या प्रमाणात जाहिरातदेखील करण्यात येतेय. पण खालच्या पातळीवर ही योजना राबवणे येणाऱ्या काळात सरकारला कठीण जाणार असल्याचे दिसत आहे. कारण या योजनेत मुख्य भूमिका असलेले तहसिलदार मात्र त्यांना मिळालेल्या जबाबदारीवर खूष …

Read More »

सलग दुसऱ्या दिवशी ‘मुसळधार’; लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

सलग दुसऱ्या दिवशी ‘मुसळधार’; लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले

Konkan Railway Timetable Affected: मुंबई, ठाणेसह कोकणात सलग 2 दिवस पाऊस पडतोय. यामुळे लोकल प्रवासावर परिणाम झालाय, रस्ते वाहूतक कोलमडलीय. यात प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्यांवरही याचा परिणाम झालाय. त्यामुळे दूरच्या प्रवासासाठी तुम्ही आधीच नियोजन करुन ठेवला असाल तर तुमच्यासाठी महत्वाची अपडेट आहे. मागील दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसाचा फटका …

Read More »