विशाल करोळे, झी मीडिया, छत्रपती संभाजीनगर : जालन्यात (Jalna) 17 दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी उपोषण सोडलं होतं. मराठा आरक्षणासंदर्भात निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगेंनी राज्य सरकारला महिन्याभराचा कालावधी दिला होता. ज्यांच्या वंशावळीत कुणबी उल्लेख आहे, त्यांना कुणबी प्रमाणपत्र (kunbi cast certificate) देण्याचंही सरकारने मान्य केलं आहे. मात्र आता समोर आलेल्या आकडेवारीनुसार …
Read More »Tag Archives: maharashtra news
तीन वर्षांचे प्रेम सहा महिन्यांतच संपलं; पतीने सासू अन् मेव्हण्याला जिवंत जाळून स्वतःला संपवले
अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : जावयाने सासू आणि मेव्हण्याला जिवंत पेटवून हत्या केल्याची धक्कादायक घटना अमरावतीमध्ये (Amravati Crime) घडली आहे. यानंतर आरोपी जावयाने स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला परत पाठवत नसल्याने जावयाने हे धक्कादायत कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Amravati Police) घटनास्थळी धाव घेऊन …
Read More »तुळजापूर-सोलापूर महामार्ग उद्यापासून बंद; जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय
Dharashiv News : तुळजापूर-सोलापूर महामार्गाबाबत (Solapur-Tuljapur Highway) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. धाराशिव (Dharashiv) येथील कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या (tuljapur temple) शारदीय नवरात्र महोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. त्यामुळे सोलापूरहून पायी येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड असते. यामुळे तुळजापूर – सोलापूर महामार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे आता 27 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत म्हणजे तीन दिवस तुळजापूर-सोलापूर महामार्ग …
Read More »भंडाऱ्यात अंत्ययात्रेवर मधमाशांचा हल्ला, प्रेत सोडून नातेवाइकांनी काढला पळ; शेकडो जखमी
प्रविण तांडेकर, झी मीडिया, भंडारा : भंडारा (Bhandara) जिल्हाच्या तुमसर तालुक्यात अंत्ययात्रेवर मधमाशांनी हल्ला (Bee Attack) केल्याचा प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात अंत्ययात्रेसाठी आलेल्या लोकांवर मधमाशांनी हल्ला केला आहे. या घटनेमुळे तब्बल 200 लोक जखमी झाले आहेत. मधमाशांच्या हल्ल्यानंतर नातेवाईकांना मृतदेह रस्त्यावर सोडून पळ काढावा लागला आहे. आधीच मुलाच्या मृत्यूमुळे दुःखात असलेल्या कुटुंबावर या हल्ल्यानंतर आणखी एक मोठा आघात …
Read More »फ्लिपकार्टची सर्वात मोठी ऑफर, आयफोनपासून लॅपटॉप सर्वकाही कमी किंमतीत
Flipkart Big Billion Days 2023: सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. अनेक कंपन्या मोठ मोठ्या ऑफर्स देऊन ग्राहकांना आकर्षित करत आहेत. यात आता फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 2023 सज्ज झाला आहे. या सेलमध्ये सर्व ब्रँडच्या उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. तसेच बँक कार्ड वापरल्यास किंवा ईएमआयमध्ये पैसे भरल्यास तुम्हाला मोठ्या सवलती मिळू शकतात. आयफोनपासून लॅपटॉपपर्यंत सर्व वस्तू येथे …
Read More »पंतप्रधान मोदींच्या ताफ्यात मोठी त्रुटी, इसम अचानक समोर आला आणि…पाहा व्हिडीओ
PM Modis security major lapse: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षा ताफ्यात मोठी चूक समोर आली आहे. पंतप्रधान मोदी शनिवारी संध्याकाळी सिग्रा येथील रुद्राक्ष कन्व्हेन्शन सेंटर येथून विमानतळाकडे निघाले असताना एका तरुणाने त्यांच्या ताफ्यासमोर उडी मारली. पंतप्रधानांच्या गाडीला नेहमीप्रमाणे सुरक्षा रक्षकांचा गराडा होता. धक्कादायक म्हणजे असे असतानादेखील हा तरुण पीएम मोदींच्या गाडीपासून अवघ्या 10 फूट अंतरावर पोहोचला होता. पंतप्रधान मोदींच्या संसदीय …
Read More »रविवारच्या सुट्टीत घराबाहेर पडताय? हवामान विभागाची पावसाबद्दल महत्वाची अपडेट
Heavy Rain in Maharashtra: रविवारची सुट्टी आणि गणेशोत्सव सुरु असताना आज सर्वजण घराबाहेर पडतील. पण घराबाहेर पडण्याआधी हवामान विभागाने दिलेली महत्वाची अपडेट जाणून घ्या. हवामान विभागाने यलो अलर्ट जाहीर केला आहे. असे असले तरी विदर्भ वगळता उर्वरित राज्यात पावसाचा जोर तुलनेत कमी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार विदर्भ (यवतमाळ, वाशिम, वर्धा, नागपूर, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, …
Read More »Maharashtra Rain : नागपुरमध्ये ढगफुटीसदृश पाऊस; राज्यात पुढील 48 तास पावसाचे, हवामान विभागाचा इशारा
Maharashtra Rain : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुसळधार बरसणाऱ्या पावसानं पुन्हा एकदा जोर धरला असून, आता कोकण, विदर्भासह राज्यातील बहुतांश भागात तो बरसताना दिसत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 48 तासांत राज्यात पाऊस सक्रिय राहणार आहे. ज्यामुळं रायगड, भंडारा, गोंदिया, नागपूरात पावसाच्या तुरळक ते मुसळधार सरींची वर्तवली जात आहे. राज्यातल्या इतर भागांतही मेघगर्जेनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. 25 आणि 26 सप्टेंबरला …
Read More »पुण्यात ‘अरेबियन नाईट्स’; परदेशी तरुणींचा विनापरवाना डान्स अन्…, सांस्कृतिक पुण्यात काय चाललंय?
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातील (Pune News) काही हॉटेल, पब चालकांनी ‘अरेबियन नाईट्स’ च्या (arabian nights) नावे विदेशी तरुणींच्या नृत्याचे कार्यक्रम सुरू केले आहेत. नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर नृत्याचे हे कार्यक्रम मद्यधुंद रात्र जागवत पहाटेपर्यंत होत आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावर अशा कार्यक्रमांची जाहिरात करून ऑफर्सची खैरात केली जात असल्याचे समोर आलं आहे. तरुण-तरुणींना आकर्षित करून रात्रीच्या मैफिली …
Read More »‘संजय राऊत सर्वात मोठा दलाल, एका महिलेचं प्रकरण…’; राधाकृष्ण विखे पाटील यांची बोचरी टीका
Maharashtra Politics : राज्याचे महसूलमंत्री आणि अहमदननगर जिल्ह्यातील प्रवरा साखर कारखान्याचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या संस्थेत झाकीर नाईक कडून पैसे आल्याचा गंभीर आरोप प्रवरा शेतकरी मंडळाच्या अध्यक्षांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही त्यांच्यावर निशाणा साधला आहे. घोटाळ्यामधून सुटका व्हावी म्हणूनच हे लोक भाजपामध्ये गेले आहेत अशी टीका संजय राऊत यांनी केली होती. …
Read More »Maharashtra Rain : कुठे दमट वातावरण तर, कुठे मुसळधार; कसं आहे राज्यातील आजचं हवामान? पाहा…
Maharashtra Rain : मुंबईत पावसाची रिपरिप सुरु असून, मध्येच लख्ख सूर्यप्रकाश आणि मध्येच दाटून येणाऱ्या काळ्या ढगांची गर्दी हे असं चित्र सध्या शहरात पाहायला मिळत आहे. तिथं नवी मुंबई, ठाणे आणि पालघर पट्ट्यामध्येही परिस्थिती वेगळी नाही. अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरींमुळं गणेशोत्सवाच्या निमित्तानं घराबाहेर पडणाऱ्यांची चांगलीच त्रेधातिरपीट उडताना दिसत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार आणखी काही दिवसांसाठी राज्यात पावसाचं असंच काहीसं …
Read More »रेल्वेचे देवदर्शन करु इच्छिणाऱ्यांना खास गिफ्ट, 7 ज्योतिर्लिंग यात्रा फक्त ‘इतक्या’ रुपयात
IRCTC Tour Package: तुम्हाला देवाधर्माची आवड असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांसाठी नेहमीच काहीतरी स्पेशल गिफ्ट घेऊन येत असते. रेल्वेकडून अनेक टूर पॅकेजेस सुरू करण्यात येत आहेत. यावेळी तुम्हीही धार्मिक सहलीची योजना आखत असाल किंवा ज्योतिर्लिंगाला भेट देण्याचा विचार करत असाल तर रेल्वेने तुमच्यासाठी खास पॅकेज आणले आहे. विशेष म्हणजे हे पॅकेज सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे …
Read More »गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर मुकेश अंबानींची मोठी घोषणा, मोबाईलनंतर आता इंटरनेट जगात क्रांतिकारी पाऊल
Jio AirFiber launched: आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर विविध टेक,ऑटो क्षेत्रातील कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी विशेष ऑफर्स आणत आहेत. यात अंबनींची जिओदेखील मागे नाही. मोबाईल क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केल्यानंतर आता मुकेश अंबानी यांनी देशातील 8 मेट्रो शहरांमध्ये Jio AirFiber लाँच केले आहे. जिओ एअर फायबर होम एंटरटेनमेंट, स्मार्ट होम सर्व्हिस आणि हाय-स्पीड ब्रॉडबँड यांसारख्या सेवा प्रदान करेल. कंपनीने दिल्ली, मुंबई, हैदराबाद, …
Read More »गणेश चतुर्थीला यामाहाची बाईक फक्त 8 हजारात आणा घरी
Yamaha bike Offer: महाराष्ट्रासह देशभरात सकाळपासून गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे.या शुभ मुहूर्तावर नवीन बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी, तुम्ही केवळ सवलतींद्वारेच नव्हे तर कमी डाउन पेमेंट आणि व्याजदरांद्वारे देखील बचत करू शकणार आहात. तुम्ही गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आणि बाप्पाचे स्वागत करण्यासाठी, …
Read More »बाप्पा 10 दिवस करणार रेल्वेप्रवास; मनमाड – सीएसएमटी एक्सप्रेसमध्ये 27 वर्षांपासून गणपतीची प्रतिष्ठापना
निलेश वाघ, झी मीडिया, नाशिक : राज्यात गणरायाचे (Ganeshotsav 2023) उत्साहात आगमन होत असताना नाशिकच्या (Nashik News) मनमाडमध्ये धावत्या रेल्वेत आगळ्या वेगळ्या पद्धतीने श्री गणेशाची स्थापना करण्यात आली आहे. मनमाड- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्पेशल एक्सप्रेसमध्ये (manmad chhatrapati shivaji maharaj special express) गेल्या 27 वर्षांपासून प्रवासी संघटना व गोदावरीचा राजा ट्रस्टतर्फे गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. शिंदे गटाचे (Shinde Group) …
Read More »उपाययोजना आखा! गणेशोत्सवाच्या धामधुमीत निपाहमुळे महाराष्ट्र सतर्क; राज्याच्या साथरोग विभागाचे निर्देश
Nipah Virus Updates: केरळमध्ये निपाह विषाणूचा (Nipah Virus) उद्रेक झालेला असतानाच महाराष्ट्रसुद्धा (Maharashtra) हायअलर्टवर आहे. केरळमध्ये निपाहच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढत चालली आहे. कर्नाटकनेही निपाहचं संकट पाहून कर्नाटक (Karnataka) सरकारने अलर्ट जारी केला होता. अशातच आता महाराष्ट्र राज्य सरकारनेही यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. केरळच्या कोझिकोडे जिल्ह्यामध्ये निपाह विषाणूमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. अशातच राज्याच्या …
Read More »Maharastra Politics : ‘गोप्याला आवर घाला नाहीतर…’, अमोल मिटकरींचा थेट फडणवीसांना इशारा!
Maharastra Political News : धनगर आरक्षण (Dhangar Reservation) आणि समाजाच्या विविध प्रश्नांवरून गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र देखील लिहिलंय. मात्र, त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांना पत्र लिहिलं नाही. यावर उत्तर देताना पडळकरांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही, …
Read More »‘गणेशोत्सवात तरुणांची श्रमशक्ती वाया जाते’; लेखक सुरज एंगडेंचे मत
Ganeshotsav 2023 : देशभरात गणेशोत्सवाची धूम उडाली आहे. अवघ्या एका दिवसावर गणेशोत्सव ठेपला आहे. अशातच तरुण लेखक, विचारवंत सुरज एंगडे (Suraj yengde) यांनी केलेल्या वक्तव्याने नव्या चर्चा सुरु झाल्या आहेत. गणेशोत्सव काळात दहा दिवस तरुणांची श्रमशक्ती वाया जाते. एक दिवस उत्सव साजरा करून नऊ दिवस तरुणांनी सरकार, प्रशासन पोहचलेले नाही अशा ठिकाणी जाऊन विधायक कामे केली पाहिजेत, असे मत सुरज …
Read More »वाघिणीच्या बछड्याचे ‘आदित्य’ नाव ठेणवण्यास मुनगंटीवारांचा विरोध; दानवे म्हणाले, ‘तरीही आदित्य जास्त तळपत राहील’
Tigress calf Name Politics: राज्याचे राजकारण प्रचंड वेगाने बदलत असल्याचे आपण पाहत आहोत. त्यामुळे राजकारणा कोणत्या क्षणी काय होईल सांगता येत नाही. असाच एक प्रकार संभाजीनगरमध्ये पाहायला मिळाला. वाघिणीच्या बछड्याचे नाव आदित्य ठेवण्यावरुन राज्याचे राजकारण तापलेले दिसत आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील वाघिणीने पिल्लांना जन्म दिल्यानंतर राजकारण सुरु झाले आहे. वाघिणीच्या पिल्लांचा नामकरण सोहळा नुकताच पार पडला. यावेळी बछड्यांच्या नावासाठी …
Read More »तुमच्यावर ही वेळ आणणाऱ्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या- राज ठाकरे
Marathwada Muktisangram: तुम्ही रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणि आणली त्या ‘सजा’कारांना शिक्षा द्या, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त त्यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या. दिवसेंदिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा; कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असे ते म्हणाले. फक्त …
Read More »