लोकसभा लढवणार का? निलेश लंके म्हणतात, माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा पण….

Nilesh Lanke: राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटातील नेते निलेश लंके हे शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा सुरु आहे. नुकत्याच झालेल्या त्यांच्या वाढदिवशी कार्यकर्त्यांनी लावलेल्या बॅनरवर शरद पवारांचे फोटो दिसले. यातच त्यांनी खासदरा अमोल कोल्हे यांची भेट घेतल्याने चर्चा आणखी जोरात होऊ लागल्या. यावर निलेश लंके यांनी आपली भूमिका मांडली आहे. मी महानाट्यासंदर्भात अमोल कोल्हे यांची भेट घेतली. मी प्रवेश करणार अशा बातम्या आल्या पण मलाच याबद्दल माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.

लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असे आवाहन अमोल कोल्हेंनी केले होते. यावरही ते म्हणाले. आपला पक्ष वाढावा, असे प्रत्येकाला वाटत असते. पण अजून काही ठरलं नाहीय. राजकारणात माहिती नसत आता काय होणारेय. पुढच्या वेळेस काय होणार? हे माहिती नसतं. 

लोकसभा मतदार संघामध्ये मी संपर्क वाढलाय. माझ्या सहकारींची तशी इच्छा आहे. पण मी अद्याप निर्णय घेतला नाही. 

लोकसंपर्क वाढवण्याचा, मित्रपरिवार जपण्याचा मला छंद आहे. याचा अर्थ मला निवडणुका लढवायच्या आहेत, असा अर्थ नाही. मी जिल्ह्याच्या बाहेरही जातो. 

निवडणुका लढवण्याच्या चर्चेला तुम्ही पूर्णविराम देताय का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी राजकारणात काही सांगता येत नाही. 

हेही वाचा :  फॉर्मल ब्लेझर घ्यायला गेल्यावर लठ्ठपणामुळे दुकानदाराने उडवली खिल्ली, दारू सोडून केले 50 Kg Weight Loss

महायुतीच्या जागावाटपात जागा भाजपकडे गेली. त्यावर तुम्ही अजित दादांकडे मागणी कराल का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावेळी मी शेवटच्या स्तरातील कार्यकर्ता आहे. जागावाटप हा मोठ्या नेत्यांचा विषय आहे. 

माझा काल वाढदिवस होता. तेव्हा मला अजित दादांचा फोन आला. प्रत्येक पक्षाचा नेता हा कार्यकर्त्याच्या संपर्कात असतो, असे ते म्हणाले. 
आपला नेता मोठा झाला पाहिजे ही कार्यकर्त्यांची स्वच्छ भावना असते. पक्षाने जबाबदारी दिली तर आपण खेळाडू आहे. तो नेहमी मैदानात असतो. 

वाढदिवसाच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो होता, यावरही त्यांनी भाष्य केले. कार्यकर्ते प्रेमाने बॅनर लावतात. त्यांना प्रोटोकॉल नसतो. मला प्रोटोकॉल आहे. माझ्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन असे काही होणार नाही. 

इतर पक्षात कोण काय करतं? कोणाचं काय काम आहे? हे बघण्यापेक्षा आपल्या कामाची रेष वाढवावी, असे मानणारा मी कार्यकर्ता असल्याचे लंके म्हणाले.



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …