केंद्र सरकारकडून महिलांना 15000 आणि ड्रोन, वाचा काय आहे नमो ड्रोन दीदी योजना?

Namo Drone Didi Yojana : केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी विविध योजना राबवल्या जातात. वेगवेगळ्या वर्गातील लोकांसाठी या वेगवेगळ्या योजना असतात. काही योजना दारीद्र्य रेषेखालील लोकांसाठी, काही योजना शेतकऱ्यांसाठी, तर काही योजना केवळ महिलांसाठी असतात. अशीच एक योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महिलांसाठी सुरु केली आहे. या योजनेचं नाव आह ‘नमो ड्रोन दीदी योजना’.(Namo Drone Didi Yojana) खरंतर या योनजेची सुरुवात 2023 मध्ये करण्यात आली होती. या योजनेमुळे महिलांचा कृषी क्षेत्रात (Agriculture Sector) सहभाग वाढावा आणि त्यांना नवनव्या तंत्रज्ञानाची (Technology)ओळख व्हावी हा या योजनेमागचा उद्देश आहे. जाणून घेऊया या योजनेतंर्गत महिलांना कोणते लाभ मिळतात आणि या योजनेत कसं नाव नोंदवायचं. 

काय आहे नमो ड्रोन दीदी योजना?
पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने 2023 मध्ये नमो ड्रोन दीदी योजना सुरुवात केली. या योजनेतंर्गत महिलांना कृषी क्षेत्राशी संबंधीत आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करुन दिली जाते. या योजनेअंतर्गत बचत गटांशी संबंधित महिलांना 15,000 ड्रोन देण्याचं लक्ष्य आहे. नमो ड्रोन योजनेअंतर्गत महिलांना ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासोबतच प्रशिक्षणादरम्यान दरमहा 15 हजार रुपयेही दिले जाणार आहेत.

हेही वाचा :  सतीश उकेवरील कारवाईचं फडणवीसांनी उलगडलं रहस्य, म्हणाले...

या योजनेंतर्गत ड्रोनसोबतच महिलांना याबाबत तांत्रिक माहितीही दिली जाणार आहे. ड्रोनचा वापर विविध शेतीच्या कामांसाठी कसा करायचा याचे प्रशिक्षणही त्यांना दिलं जाणार आहे. ज्यामध्ये पिकांच्या देखरेखीपासून ते कीटकनाशके फवारणी, खते आणि बियाणे पेरण्यापर्यंत सर्व काही शिकवलं जाणार आहे. 

कसा कराल अर्ज?
या योजनेचा लाभ बचत गटाशी जोडल्या गेलेल्या महिलांना होणार आहे. या योजनेसाठी  बचत गटांशी संबंधित 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सर्व महिला अर्ज करु शकतात. योजनेचा लाभ घेण्यासाठी काही कागदपत्रे असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, सेल्फ हेल्प ग्रुप आयडी कार्ड आणि पासपोर्ट आकाराचा फोटो समाविष्ट आहे. यासोबतच फोन नंबर आणि ईमेल आयडी असणंही आवश्यक आहे. सध्या या योजनेची अधिकृत वेबसाइट सुरू झालेली नाही.

महाराष्ट्रात महिलांसाठी कोणत्या योजना आहेत?
1) महिला समृद्धी कर्ज योजना 
2) सुकन्या समृद्धी योजना 
3) जननी सुरक्षा योजना 
4) माझी कन्या भाग्यश्री योजना 
5) प्रधानमंत्री मातृ वंदना योजना
6) लेक लाडकी योजना
7) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद …

पतीसोबत झालेल्या भांडणाचा राग पोटच्या लेकावर काढला; 6 वर्षांच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Woman Tossed Her Son: कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेने पतीसोबत झालेल्या …