‘बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं’ सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : ‘काँग्रेस नेते विजय वड्डेटीवार यांनी मुंबई 26/11 हल्ल्यातील (Mumbai 26/11) शहिद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का?’ अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknash Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर केली. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ‘काँग्रेस का हाथ पाकिस्तान के साथ’ असा घणाघात केला. 

विजय वड्डेटीवारांनी  26/11 हल्ल्यातील शहिद पोलिस आणि मृत्यूमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेले वक्तव्य प्रचंज चीड आणि संताप आणणारे आहे. ‘भारत जोडो नाही भारत तोडो यात्रा’ करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वड्डेटीवार वेडे झाले आहेत, अशी टीका त्यांनी केली.  आरएसएस ही नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय.. वकिल उज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फासावर लटकले, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कॉंग्रेसचं धोरण पाकिस्तान धार्जिणे आहे. पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारे वक्तव्य काँग्रेसच्या नेत्याकडून होणे हे दुर्देवी आहे. मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसने असेच आरोप केले होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना जनाची नाही तर किमान मनाची लाज बाळगायला हवी होती, असा टोला मुख्यमंत्र्यांनी उबाठाला लगवला. 

हेही वाचा :  मराठी भाषा दिवस दररोज का साजरा करू नये? राज ठाकरे यांचा परखड सवाल

नकली हिंदुत्व, मी हिंदू आहे, मी मर्द आहे असे बोलून कोणी हिंदू होत नाही. आज हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर यांना चांगलेच धुतले असते, असे मुख्यमंत्री म्हणाले. या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही.

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी बदला घेतला जाईल, अशी अपेक्षा होती, मात्र केंद्रात आणि राज्यात कॉंग्रेसचे सरकार होते. त्यामुळे ही अपेक्षा फोल ठरली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करुन भारत मजबूर नाही तर मजबूत देश आहे, असे दाखवून दिले. घुस के मारेंगे हे बोलणारे पंतप्रधान देशाला भेटले आहेत. गुळगुळीत बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. निवडणुकीतील प्रचाराबाबत केलेल्या जाहिरातीवर कॉंग्रेसने आक्षेप घेण्याचे कारण काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

‘काँग्रेसचा हाथ पाकिस्तान के साथ’ असे म्हणणे वावगे ठरणार नाही. जेव्हा काँग्रेस निवडणुकीत जिंकतो तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. जेव्हा भारत मॅच हरतो तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात. काँग्रेस इतकी वर्ष सत्तेत असताना देखील काश्मिरबाबत बोटचेपी धोरण ठेवले. आपल्या जवानांची मुंडकी छाटून पाकिस्ताना नेत असताना काँग्रेस सरकार मूग गिळून गप्प बसले होते. आता नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानाला इशारा दिला आहे.

हेही वाचा :  क्लस्टर योजना सत्यात उतरणार! आशियातील सर्वात मोठ्या योजनेचा मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते होणार शुभारंभ



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Pre Wedding Cruise Party : बालपणाची मैत्री अन् आयुष्याचे साथीदार, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटची लव्हस्टोरी माहितीये का?

Anant and Radhika celebrated pre wedding cruise party : मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा …

बीडमध्ये दुहीचं बीज, दोन समाजांचा एकमेकांवर बहिष्कार…सामाजिक सलोख्याची ऐशीतैशी

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : बीडमधल्या मुंढेवाडी गावातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल …