Tag Archives: maharashtra news

Covid 19 : राज्यातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या आली दोन हजारांपेक्षा खाली ; रिकव्हरी रेट ९७.६६ टक्के

आज राज्यात ८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. राज्यातील करोना संसर्गाची तिसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांची संख्या आता कमी झाली आहे. आज (सोमवार) दिवसभरात राज्यात १ हजार ९६६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६६ टक्के एवढे झाले आहे. आज ११ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी …

Read More »

“ दापोलीतील ‘ते’ रिसॉर्ट ९० दिवसांत पाडण्याचे भारत सरकारचे आदेश ; महाराष्ट्र सरकारकडून फौजदारी कारवाईत गोंधळ ”

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप ; राज्य सरकार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर केली आहे टीका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज (सोमवार) पत्रकारपरिषद घेत दोपोलीमधील साई रिसॉर्टवरून मंत्री अनिल परब आणि राज्य सरकारवर टीका केली. तसेच, रिसॉर्ट बांधणाऱ्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यासाठी राज्य सरकारकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, “भारत सरकारने …

Read More »

“महाविकास आघाडी सरकार पाडलं तरी…”; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

राज्यातील माहविकास आघाडी सरकारची सत्ता १० मार्चपर्यंत जाईल असं वक्तव्य करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील हे सत्तेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाले असल्याने ते अशी टीका करत असल्याचा टोला खडसेंनी लगावलाय. इतकच नाही तर त्यांनी हे सरकार पडल्यास पुन्हा हेच सरकार येईल असंही म्हटलंय. चंद्रकांत पाटील नक्की काय म्हणाले होते?“राज्यातील सत्ताधारी …

Read More »

दशकपूर्तीत पोलीस ‘कँटीन’ची उलाढाल दोन कोटींवर; पोलीस कुटुंबीयांच्या प्रतिसादाने उपक्रम झाला स्वभांडवली

|| मोहनीराज लहाडे पोलीस कुटुंबीयांच्या प्रतिसादाने उपक्रम झाला स्वभांडवली नगर : पोलीस कर्मचाऱ्यांच्या पैशाची बचत व्हावी, बाजारभावाच्या तुलनेत त्यांना सवलतीच्या दरात ग्राहकोपयोगी वस्तू मिळाव्यात या उद्देशाने पोलीस कल्याण विभागाकडून उसने पैसे घेऊन सुरू करण्यात आलेल्या पोलीस कल्याण भांडार (पोलीस कँटीन) विभागाच्या उपक्रमाने दहा वर्षांतच स्वभांडवली होण्याची वाटचाल केली आहे. या उपक्रमाची वार्षिक उलाढाल आता २ कोटींवर जाऊन पोहोचली आहे तर …

Read More »

“ सत्ता नसल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना वैफल्य आले आहे”; आदित्य ठाकरेंनी साधला निशाणा!

“डोळे बंद करुन फिरणाऱ्यांना सरकार दिसेल कसं?” असा सवाल देखील केला आहे. राज्यात डोळे बंद करून फिरणाऱ्यांना सरकार दिसेल कसं? असा प्रश्न उपस्थित करत, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “सत्ता नसल्याने त्यांना वैफल्य आलं आहे.” असं म्हणत टोलाही लगावला आहे.शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज(रविवार) चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी …

Read More »

Jayaprabha Studio : “…तर मी राजकीय संन्यास घेईन ; आमचं चुकलं असेल तर आम्हाला फासावर द्या ”

शिवसेना नेते व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केली भूमिका ; मुलांनी केलेल्या व्यवहाराची मला अजिबात कल्पना नव्हती असंही म्हणाले आहेत. कोल्हापुरमधील जयप्रभा स्टुडिओ आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकाची मागणीवरून सध्या कोल्हापुरातील वातावरण चांगलच तापलं आहे. एकीकडे जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याच्या मागणी वाढत असताना, दुसरीकडे या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेते राजेश क्षीरसागर मुलांसह …

Read More »

हृदयद्रावक! विजेची वायर तुटून गोठ्यावर पडली; करंट लागून ३२ शेळ्या-मेढ्यांचा मृत्यू

विद्युत प्रवाहाची केबल तुटून गोठ्यावर पडल्याने ३२ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमधल्या केतूर २ येथे घडली आहे. शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. केतूर २ येथील येथील तात्याराम कोकणे यांच्या शेळ्या या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्या गोठ्यावरुन महावितरण कंपनीच्या खांबावरुन घरगुती वीज जोडणी दिलेली केबल जात आहे. पहाटे ही केबल तुटून गोठ्यावर पडली. त्याचा करंट या शेळ्यांना …

Read More »

लता मंगेशकर यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओत करण्यावरून कोल्हापुरातील वातावरण तापले!

शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांकडून स्टुडिओची खरेदी ; चित्रपट महामंडळाच्यावतीने उद्यापासून साखळी उपोषण कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याच्या मागणीला जोर चढला असताना, या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केल्याने आता प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. तर जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी उद्या(रविवार)पासून स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू केले …

Read More »

बीड जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार ; कारवाईत सात लाखांचा तांदूळ जप्त

तिघांवर गुन्हा दाखल ; ३१ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यासाठी देण्यात आलेल्या धान्याचा साठा करुन त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. ब्रह्मगाव (ता.माजलगाव) येथे पत्र्याच्या गोदामावर छापा टाकून पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा ५५८ पोते तांदूळ शनिवारी पहाटे पकडला. यावेळी सात लाखाच्या तांदळासह मालवाहू मोटार असा एकूण ३१ लाख ९८ …

Read More »

ज्या स्टुडिओसाठी कोल्हापूरकरांनी मोर्चा काढला तो 2 वर्षांपूर्वीच विकला

प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जयप्रभा स्टुडिओचं जतन होण्यासाठी कोल्हापूरकर आग्रही आहेत. मात्र लता मंगेशकरांनी 2 वर्षांपूर्वीच स्टुडिओची जमीन विकून टाकल्याचं उघड झालं आहे.   मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ. या स्टुडिओची जमीन बिल्डरच्या घशात जाऊ नये, यासाठी कोल्हापूरकरांनी मोठा संघर्ष उभारला. मात्र आता लता मंगेशकरांनी 2 वर्षांपूर्वीच स्टुडिओची जमीन विकल्याचं …

Read More »

१०० वर्षांच्या झाडासोबत सयाजी शिंदे साजरा करणार Valentines Day; कसा? जाणून घ्या…

सुमारे शंभर वर्ष वयाच्या पण नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात ‘सह्याद्री देवराई’ संस्थेला यश आले आहे. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन राहावे म्हणून सोमवारी (दि १४) दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत म्हसवे (ता. सातारा) येथे या वटवृक्षासोबत अनोखा व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती अभिनेते व संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे …

Read More »

“देशाभिमानी उद्योजक…”; राहुल बजाज यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं दुःख

राहुल बजाज यांच्या निधनाने भारतीय उद्योगाच्या विकासात केवळ भरीव योगदान देणारा ज्येष्ठ उद्योजकच आपण गमावला नाही तर सामाजिक भान असलेला, आणि देशासमोरील समस्यांवर निर्भिडपणे आपली मते मांडणारा, तरुण उद्योजकांचा प्रेरक असा देशाभिमानी उद्योजक आपल्यातून गेला आहे अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांचे आज (शनिवार) पुण्यात निधन झाले आहे. वयाच्या ८३ …

Read More »

MPSC : सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या निर्णयाची आयोगाकडून अंमलबजावणी सुरू

उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय नोंदवण्यासाठी २० फेब्रुवारीची मुदत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पद भरती परीक्षांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला होता. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ साठी पहिल्यांदाच सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (ऑप्टिंग आऊट) नोंदवण्यासाठी २० फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे. मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण …

Read More »

“मुख्यमंत्री मानसिक रुग्ण, त्यांना उपचाराची गरज आहे”; राहुल गांधींबद्दलच्या वक्तव्यामुळे नाना पटोले संतापले!

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा यांनी एका प्रचारसभेत काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात. बिस्वा शर्मा यांचे वक्तव्य पाहता त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्याचे दिसत असून त्यांनी चांगल्या रुग्णालयात उपचार घेण्याची गरज आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. …

Read More »

“डॉक्टर आम्हाला सगळं मांसाहाराचंच सांगायचे”, अजित पवारांनी सांगितली करोना काळातली आठवण!

करोनासंदर्भातली आपली आठवण सांगताना अजित पवार यांनी मांसाहारी आहाराविषयी मिश्किल टिप्पणी केली आहे. गेल्या दोन वर्षांहून अधिक काळ जगभरात करोना ठाण मांडून बसला आहे. करोनाचा सामना करण्यासाठी आता प्रभावी लसी देखील उपलब्ध झाल्या असून जगभरात वेगाने लसीकरण केलं जात आहे. मात्र, करोनाच्या सुरुवातीच्या काळात डॉक्टरांकडून बाधितांना वेगवेगळ्या प्रकारचे उपचार सुचवले जात असत. यासंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बोलताना …

Read More »

माघी एकादशी निमित्त पंढरपूरात तीन लाखाहून अधिक भाविक; विठ्ठल मंदिरात आकर्षक फुलांची आरास

वारकरी संप्रदायात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या माघी एकादशीला  राज्यातून जवळपास तीन लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. करोनाच्या पार्शवभूमीवर या वारीला प्रशासनाने आरोग्याच्या सोयी सुविधांसह व्यवस्था केली आहे. एकादशी निमित्त हरी विठ्ठलाची नित्यपूजा मंदिर समितीचे सदस्य अतुलशास्त्री भगरे गुरुजी यांनी तर रुक्मिणीमातेची पूजा प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली.  गेल्या दोन वर्षात करोनामुळे  सहा वारीवर निर्बंध लागू …

Read More »

“अनिल देशमुखांच्या बाजूची तुरुंगातील खोली सॅनिटाइज करण्याची व्यवस्था उद्धव ठाकरेंनी करावी कारण…”; सोमय्यांचा इशारा

भाजपाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. शुक्रवारी पुणे महापालिकेमध्ये सोमय्या यांचं भाजपा कार्यकर्त्यांनी जंगी स्वागत केलं. तसेच पुणे महानगरपालिकेच्या ज्या पायरीवर त्यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली, तिथेच भाजपाच्या वतीने सोमय्यांचा सत्कार करण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सोमय्या यांनी अनिल देखमुखांबरोबरच आता अनिल परब आणि संजय …

Read More »

पैठण : शेतकऱ्याच्या खात्यावर अचानक जमा झाले १५ लाख; मोदींनी पैसे पाठवल्याचं समजून ९ लाखांचं घर बांधलं पण…

महाराष्ट्रामधील औरंगाबाद जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे. या ठिकाणी बँकेचे अधिकारी आता एका शेतकऱ्याकडे १५ लाख परत करण्याची मागणी करत असून आपण चुकून या शेतकऱ्याच्या खात्यावर १५ लाख पाठवल्याचं बँक अधिकाऱ्यांनी म्हटलंय. तर दुसरीकडे काही महिन्यांपूर्वी आलेला हा निधी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवल्याचं समजून या शेतकऱ्याने तो वापरल्याची माहिती समोर आलीय. औरंगाबादमधील पैठणमधील शेतकरी ज्ञानेश्वर ओटे यांच्या खात्यावर ऑगस्ट …

Read More »

…असा सुनियोजित कट पद्धतशीपरणे महाविकासआघाडी सरकारकडून रचला जातोय – गोपीचंद पडळकरांचा आरोप!

एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केली आहे टीका “एसटी संप मिटविण्यापेक्षा तो चिघळला पाहिजे आणि संपामध्ये वाढ झाली पाहिजे असा सुनियोजित कट पद्धतशीपरणे महाविकास आघाडी सरकारकडून रचला जात आहे.” असा गंभीर आरोप भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे. आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, “महाराष्ट्रातील एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रूजू व्हा, असं एका बाजूला आवाहन करायचं आणि तो कर्मचारी जेव्हा कामावर रुजू …

Read More »

कोर्टाने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावल्यानंतर बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे राज्याचे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना कोर्टाने दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील प्रतिज्ञापत्रात बच्चू कडू यांनी मुंबईतील फ्लॅटची माहिती लपवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. चांदूरबाजार प्रथमवर्ग कोर्टाने हा निर्णय़ दिला असून जामीनही मंजूर कऱण्यात आला आहे. भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे …

Read More »