Tag Archives: maharashtra news

ही दोस्ती तुटायची नाय! सोलापुरात एकाचवेळी निघाली तीन मित्रांची अंत्ययात्रा; निरोप देण्यासाठी जमली हजारोंची गर्दी

मुंबई-पुणे हायवेवरील अपघातात मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला सोलापुरातील तीन मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मुंबई-पुणे हायवेवरील खोपोलीजवळ झालेल्या अपघातात या तरुणांनी आपला जीव गमावला. त्यांच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर शहरात शोककळा पसरली होती. दरम्यान त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. मुंबई-पुणे महामार्गावर झालेल्या अपघातात गौरव खरात, सौरव तुळसे आणि सिद्धार्थ …

Read More »

ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा ५७० कोटींचा ड्रीम प्रोजेक्ट चंद्रपुरात; राज्यातला पहिलाच फ्लोटिंग सोलर

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रालगत इरई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १०५ मेगावॅट क्षमतेचा फ्लोटिंग सौर प्रकल्प व भद्रावती तालुक्यातील कचराळा व गुंजाळा येथे ५६९.६८ कोटी खर्च करून १४५ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. येत्या एक ते दिड वर्षात हे दोन्ही प्रकल्प उभे राहणार आहेत. राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. चंद्रपूर वीज केंद्रालगत इरई …

Read More »

मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमाला १२ वर्षे सक्तमजुरी; एक लाखाचा दंड

सार्वजनिक शौचालयात एका मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल नरेश जनार्दन कोंडा (२१) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी दोषी धरून १२ वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख रूपये दंडाची शिक्षा सुनावली. आरोपी नरेश कोंडा याच्या घराजवळ राहणारी आणि त्याच्या ओळखीची असलेली पीडित मतिमंद मुलगी २० जानेवारी २०२१ रोजी घराजवळील सार्वजनिक शौचालयात शौचासाठी गेली होती. ती मंतिमंद असल्याचे माहीत …

Read More »

संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया ; प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले…

“…पण आता महाराष्ट्रात कोणी घाबरणार नाही ; पाच वर्षच काय २५ वर्ष हे सरकार चालणार” असंही मलिक यांनी सांगितलं आहे. राज्यभर चर्चेचा विषय ठरलेली खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद अखेर आज दुपारी झाली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी अपेक्षेप्रमाणे भाजपा, केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला. शिवाय, शिवसेना कोणत्याही दबावाला झुकणार नाही, ठाकरे सरकार राज्यात कायम राहणार असल्याचे सांगितले. …

Read More »

भाजपाचे ‘ते’ साडेतीन लोक कोण? संजय राऊत म्हणतात, “कुणी अर्धा आहे, कुणी पाव आहे, कुणी चाराणेवाला…”!

“भाजपाचे साडेतीन लोक लवकरच अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील”, असं संजय राऊत म्हणाले होते. शिवसेना खासदार संजय राऊत हे जाहीर पत्रकार परिषदेतून भाजपाच्या साडेतीन लोकांचा भांडाफोड करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. सोमवारी संजय राऊत यांनी “भाजपाचे साडेतीन लोक काही दिवसांत अनिल देशमुखांच्याच कोठडीत असतील”, असं देखील विधान केलं होतं. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत या साडेतीन लोकांविषयी खुलासा …

Read More »

शिवजयंती निर्बंध: “शिवरायांच्या मावळ्याला माहितीय करोनासोबत कसं जगायचं, जीवाची काळजी कशी घ्यायची; या तीन पक्षांनी…”

“हिंदूचे सण किंवा उत्सव आले की महाराष्ट्रातील ठाकरे सरकार खडबडून जागं होतं, जाचक अटी घालतं करोनाच्या नावाखाली.” येत्या शनिवारी म्हणजेच १९ फेब्रुवारी रोजी शिवजंयीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येणार असल्याचं राज्य शासनाने सोमवारी जारी केलेल्या नियमांमध्ये म्हटलंय. यासंबंधीच्या गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. मात्र …

Read More »

“केवळ हिंदूंना टार्गेट केलं जातंय असं म्हणणं…”; शिवजयंतीबद्दलच्या आक्षेपावर गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया

शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येणार आहे. आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच या निमित्ताने होणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण तर जन्मोत्सव सोहळ्यासाठी ५०० जणांना परवानगी देण्यात आली आहे. त्यावरून भाजपाने सरकारवर टीका केली …

Read More »

…तर धनंजय मुंडे आज जेलमध्ये असते; करुणा शर्मा यांचं मोठं विधान

करुणा शर्मा यांनी आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे. सोमवारी कोल्हापुरात बोलताना करुणा शर्मा यांनी आपला शिवशक्ती पक्ष आता कोल्हापूर उत्तर मतदार संघाची पोटनिवडणूक लढणवार असल्याचं जाहीर केलं. तसंच लोकसभा, विधानसभा ते नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पोटनिवडणुका अशा सर्व प्रकारच्या निवडणुकांमध्ये पक्षाचे उमेदवार असतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं. अपेक्षित उमेदवार न मिळाल्यास स्वत: निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं करुणा …

Read More »

“…त्याशिवाय राज्यात सत्ता बदलाची शक्यता नाही” ; हसन मुश्रीफ यांचं चंद्रकांत पाटील यांना प्रत्युत्तर!

“१० मार्चनंतर महाविकास आघाडीवर सत्ता सोडण्याची वेळ येईल” असं चंद्रकांत पाटील यांनी राजकीय भाकीत केलेलं आहे; जाणून घ्या मुश्रीफ नेमकं काय म्हणाले आहेत. “पाच राज्यांतील निकालानंतर महाराष्ट्रात सत्ता बदल होईल, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. तथापि भाजपाकडे १४५ आमदारांचे संख्याबळ होत नाही तोपर्यंत सत्ताबदलाची शक्यता नाही. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे सत्तेवर राहणार.” असे प्रत्युत्तर ग्रामविकास …

Read More »

Covid 19 : राज्यातील दैनंदिन करोनाबाधितांची संख्या आली दोन हजारांपेक्षा खाली ; रिकव्हरी रेट ९७.६६ टक्के

आज राज्यात ८ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. राज्यातील करोना संसर्गाची तिसरी लाट आता ओसरली आहे. दररोज आढळणारी नवीन करोनाबाधितांची संख्या आता कमी झाली आहे. आज (सोमवार) दिवसभरात राज्यात १ हजार ९६६ नवीन करोनाबाधित आढळून आले आहेत. तर, राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.६६ टक्के एवढे झाले आहे. आज ११ हजार ४०८ रुग्ण बरे होऊन घरी …

Read More »

“ दापोलीतील ‘ते’ रिसॉर्ट ९० दिवसांत पाडण्याचे भारत सरकारचे आदेश ; महाराष्ट्र सरकारकडून फौजदारी कारवाईत गोंधळ ”

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा आरोप ; राज्य सरकार आणि मंत्री अनिल परब यांच्यावर केली आहे टीका भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आज (सोमवार) पत्रकारपरिषद घेत दोपोलीमधील साई रिसॉर्टवरून मंत्री अनिल परब आणि राज्य सरकारवर टीका केली. तसेच, रिसॉर्ट बांधणाऱ्याविरोधात फौजदारी कारवाई करण्यासाठी राज्य सरकारकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.पत्रकार परिषदेत बोलताना किरीट सोमय्या म्हणाले की, “भारत सरकारने …

Read More »

“महाविकास आघाडी सरकार पाडलं तरी…”; राष्ट्रवादीच्या नेत्याचं मोठं वक्तव्य

राज्यातील माहविकास आघाडी सरकारची सत्ता १० मार्चपर्यंत जाईल असं वक्तव्य करणारे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंनी उत्तर दिलं आहे. चंद्रकांत पाटील हे सत्तेतून बाहेर पडल्याने अस्वस्थ झाले असल्याने ते अशी टीका करत असल्याचा टोला खडसेंनी लगावलाय. इतकच नाही तर त्यांनी हे सरकार पडल्यास पुन्हा हेच सरकार येईल असंही म्हटलंय. चंद्रकांत पाटील नक्की काय म्हणाले होते?“राज्यातील सत्ताधारी …

Read More »

दशकपूर्तीत पोलीस ‘कँटीन’ची उलाढाल दोन कोटींवर; पोलीस कुटुंबीयांच्या प्रतिसादाने उपक्रम झाला स्वभांडवली

|| मोहनीराज लहाडे पोलीस कुटुंबीयांच्या प्रतिसादाने उपक्रम झाला स्वभांडवली नगर : पोलीस कर्मचाऱ्यांच्या पैशाची बचत व्हावी, बाजारभावाच्या तुलनेत त्यांना सवलतीच्या दरात ग्राहकोपयोगी वस्तू मिळाव्यात या उद्देशाने पोलीस कल्याण विभागाकडून उसने पैसे घेऊन सुरू करण्यात आलेल्या पोलीस कल्याण भांडार (पोलीस कँटीन) विभागाच्या उपक्रमाने दहा वर्षांतच स्वभांडवली होण्याची वाटचाल केली आहे. या उपक्रमाची वार्षिक उलाढाल आता २ कोटींवर जाऊन पोहोचली आहे तर …

Read More »

“ सत्ता नसल्यामुळे देवेंद्र फडणवीसांना वैफल्य आले आहे”; आदित्य ठाकरेंनी साधला निशाणा!

“डोळे बंद करुन फिरणाऱ्यांना सरकार दिसेल कसं?” असा सवाल देखील केला आहे. राज्यात डोळे बंद करून फिरणाऱ्यांना सरकार दिसेल कसं? असा प्रश्न उपस्थित करत, शिवसेना नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. “सत्ता नसल्याने त्यांना वैफल्य आलं आहे.” असं म्हणत टोलाही लगावला आहे.शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज(रविवार) चंद्रपूर दौऱ्यावर होते. यावेळी …

Read More »

Jayaprabha Studio : “…तर मी राजकीय संन्यास घेईन ; आमचं चुकलं असेल तर आम्हाला फासावर द्या ”

शिवसेना नेते व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केली भूमिका ; मुलांनी केलेल्या व्यवहाराची मला अजिबात कल्पना नव्हती असंही म्हणाले आहेत. कोल्हापुरमधील जयप्रभा स्टुडिओ आणि भारतरत्न लता मंगेशकर यांच्या स्मारकाची मागणीवरून सध्या कोल्हापुरातील वातावरण चांगलच तापलं आहे. एकीकडे जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याच्या मागणी वाढत असताना, दुसरीकडे या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेते राजेश क्षीरसागर मुलांसह …

Read More »

हृदयद्रावक! विजेची वायर तुटून गोठ्यावर पडली; करंट लागून ३२ शेळ्या-मेढ्यांचा मृत्यू

विद्युत प्रवाहाची केबल तुटून गोठ्यावर पडल्याने ३२ शेळ्यांचा मृत्यू झाल्याची घटना सोलापूरमधल्या केतूर २ येथे घडली आहे. शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. केतूर २ येथील येथील तात्याराम कोकणे यांच्या शेळ्या या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडल्या आहेत. त्या गोठ्यावरुन महावितरण कंपनीच्या खांबावरुन घरगुती वीज जोडणी दिलेली केबल जात आहे. पहाटे ही केबल तुटून गोठ्यावर पडली. त्याचा करंट या शेळ्यांना …

Read More »

लता मंगेशकर यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओत करण्यावरून कोल्हापुरातील वातावरण तापले!

शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांकडून स्टुडिओची खरेदी ; चित्रपट महामंडळाच्यावतीने उद्यापासून साखळी उपोषण कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याच्या मागणीला जोर चढला असताना, या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केल्याने आता प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. तर जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी उद्या(रविवार)पासून स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू केले …

Read More »

बीड जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार ; कारवाईत सात लाखांचा तांदूळ जप्त

तिघांवर गुन्हा दाखल ; ३१ लाख ९८ हजार रुपयांचा मुद्देमालही हस्तगत स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना वाटप करण्यासाठी देण्यात आलेल्या धान्याचा साठा करुन त्याची काळ्या बाजारात विक्री करण्याचे प्रकार वाढले आहेत. ब्रह्मगाव (ता.माजलगाव) येथे पत्र्याच्या गोदामावर छापा टाकून पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा ५५८ पोते तांदूळ शनिवारी पहाटे पकडला. यावेळी सात लाखाच्या तांदळासह मालवाहू मोटार असा एकूण ३१ लाख ९८ …

Read More »

ज्या स्टुडिओसाठी कोल्हापूरकरांनी मोर्चा काढला तो 2 वर्षांपूर्वीच विकला

प्रताप नाईक, झी २४ तास, कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जयप्रभा स्टुडिओचं जतन होण्यासाठी कोल्हापूरकर आग्रही आहेत. मात्र लता मंगेशकरांनी 2 वर्षांपूर्वीच स्टुडिओची जमीन विकून टाकल्याचं उघड झालं आहे.   मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा साक्षीदार असलेला कोल्हापूरचा जयप्रभा स्टुडिओ. या स्टुडिओची जमीन बिल्डरच्या घशात जाऊ नये, यासाठी कोल्हापूरकरांनी मोठा संघर्ष उभारला. मात्र आता लता मंगेशकरांनी 2 वर्षांपूर्वीच स्टुडिओची जमीन विकल्याचं …

Read More »

१०० वर्षांच्या झाडासोबत सयाजी शिंदे साजरा करणार Valentines Day; कसा? जाणून घ्या…

सुमारे शंभर वर्ष वयाच्या पण नकोशा झाल्याने कुऱ्हाड कोसळलेल्या हडपसरच्या वडाला साताऱ्यात पुनर्रोपणाद्वारे जीवदान देण्यात ‘सह्याद्री देवराई’ संस्थेला यश आले आहे. वृक्षांचे मानवतेशी असलेले श्वासाचे नाते चिरंतन राहावे म्हणून सोमवारी (दि १४) दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत म्हसवे (ता. सातारा) येथे या वटवृक्षासोबत अनोखा व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती अभिनेते व संस्थेचे संस्थापक सयाजी शिंदे …

Read More »