Tag Archives: maharashtra news

युक्रेनमधील महाराष्ट्रीयन विद्यार्थ्यांना सुरक्षित परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून हालचालींना वेग

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांना दिली माहिती ; अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचं देखील सांगितलं आहे. रशिया-युक्रेन युद्धाची भीती अखेर खरी ठरली असून, रशियाने गुरुवारी युक्रेनवर चौफेर हल्ले केल़े त्यात ७४ लष्करी तळ उद्ध्वस्त झाले असून, ४० सैनिकांसह १० नागरिक ठार झाल़े. या युद्धखोरीचा निषेध करत पाश्चात्य देशांनी रशियावर आणखी निर्बंध लागू करण्याची घोषणा केली़. या घडामोडींमुळे युद्धाचा झाकोळ …

Read More »

रशिया-युक्रेन युद्धासंबंधी विचारताच उदयनराजे मोदी सरकारचा उल्लेख करत म्हणाले, “काही गोष्टी सांगाव्या…”

केंद्राने संपूर्ण पणाला लावलं पाहिजे, उदयनराजेंचं आवाहन रशियाने युक्रेनविरोधात युद्ध पुकारल्यामुळे सध्या संपूर्ण जगामध्ये चिंतेचं वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला तणाव चर्चेच्या माध्यमातून कमी करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी युद्धाची घोषणा केली आणि सर्वांनाच धक्का बसला. रशियाच्या निर्णयाविरोधात अमेरिकेसह अनेक देश एकटवले असून निर्बंध लावले आहेत. भारतातूनही यासंबंधी प्रतिक्रिया उमटत असून भाजपाचे …

Read More »

बीडमध्ये परळीत बहिण-भावाची हत्या, तर माजलगावमध्ये शिक्षकासह तिघांची आत्महत्या

बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात जिरेवाडी येथे वयोवृद्ध बहीण-भावाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यात गुरुवारी (२४ फेब्रुवारी) जिरेवाडी येथे वयोवृद्ध बहीण-भावाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. सटवा ग्यानबा मुंडे (६८), सुबाबाई ग्यानबा मुंडे (७०) अशी मृतांची नावे आहेत. दगडाने ठेचून ही हत्या करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली. परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती. माजलगावमध्ये एकाच दिवशी …

Read More »

करोना र्निबंधातून लोकप्रतिनिधींना सूट?; सोलापुरात राजकीय नेत्यांकडून वारंवार उल्लंघन, पण कारवाई नाही

|| एजाज हुसेन मुजावर सोलापुरात राजकीय नेत्यांकडून वारंवार उल्लंघन, पण कारवाई नाही सोलापूर : करोनाविषयक लागू असलेले निर्बंध बडे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांनी पाळायचे नसतात, नियम असतील तर ते पायाखाली तुडवायचे असतात, त्याची जणू मुभाच अशा प्रस्थापित लोकप्रतिनिधींसह मंत्री आणि राजकीय पुढाऱ्यांना मिळाली की काय, असे सोलापुरात करोनाकाळात वाटू लागले आहे. कायदा, नियम सर्वाना सारखाच असतो, असे म्हटले जात असले तरीही …

Read More »

“आता १० रुपयांच्या गोळ्या घेतानाही विचार करावा लागेल”, जितेंद्र आव्हाडांचा ईडीवर निशाणा; म्हणाले, “जेव्हा नितीन गडकरींवर…!”

नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी नितीन गडकरींबद्दल घडलेला ‘तो’ प्रसंग सांगितला आहे. नवाब मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीकडून या प्रकाराचा निषेध केला जात असताना भाजपाकडून मात्र ईडीच्या कारवाईचं समर्थन केलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नवाब मलिक यांच्या कन्या निलोफर मलिक खान …

Read More »

३०० कोटींची ‘ती’ जमीन, दाऊद, क्रिकेट सट्टा, हसिना पारकरसोबतची बैठक अन् अटक… मलिकांवर नेमका आरोप काय आहे?

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना बुधवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आर्थिक गैरव्यवहार (मनी लॉन्डिरग) प्रकरणी अटक केली. न्यायालयाने त्यांना ३ मार्चपर्यंत ‘ईडी’ कोठडी सुनावली आहे. मात्र नवाब मलिक यांच्याविरोधात अटकेची कारवाई झालेलं हे नेमकं काय आहे हेच अनेकांना ठाऊक नाही. त्यावरच टाकलेली नजर… आधी दाऊदच्या भावाला अटक…दाऊद इब्राहीम टोळी क्रिकेटवरील सट्टेबाजी आणि बांधकाम व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक …

Read More »

कोल्हापूर : महावितरणाचं कार्यालय शेतकरी संघटनेनं पेटवलं; सरकारला इशारा देत म्हणाले, “शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष…”

आज दिवसभरात राज्यामध्ये महावितरणाविरोधातील आंदोलनाचा भडका उडण्याची शक्यता शेतकरी संघटनेने व्यक्त केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरमध्ये महावितरण कार्यालयासमोर मागील दोन दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याच्या भावनेतून अज्ञात शेतकऱ्यांनी महावितरणाच्या कार्यालयाला आग लावल्याची घटना घडलीय. मध्यरात्रीच्या सुमारास संतप्त अज्ञात शेतक-यांनी कागल येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवले. कार्यकारी …

Read More »

“सत्तेच्या खुर्च्या उबवून ज्यांच्या शरीरात…”; दिशा सालियन प्रकरणावरुन शिवसेनेचा राणे-पाटलांवर हल्लाबोल

अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर राहिलेल्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणाची मागील काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरु असतानाच दिशाच्या आई वडिलांनी बुधवारी राज्य महिला आयोगाच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमासमोर येऊन त्यांनी आपल्या मुलीची बदनामी राजकारण्यांनी थांबवावी अशी मागणी केली. दिशा सालियन प्रकरणावरुन सध्या राज्यात भाजपा आणि शिवसेना आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष …

Read More »

“…तर महाविकास आघाडीच्या मंत्र्यांनाही तुडवू”, राजू शेट्टींकडून कोल्हापुरात नितीन राऊतांचा पुतळा जाळत इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना तुडवू, असा इशारा दिला आहे. तसेच जनतेला लुबाडायचे आणि त्यांच्या घरावर दरोडे घालायचे बंद करा, असंही मत व्यक्त केलं. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीला सलग १० तास दिवसा वीज पुरवठा करावा या मागणीसाठी बुधवारी (२३ फेब्रुवारी) दुसऱ्या दिवशीही कोल्हापूरमधील महावितरणच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. राजू शेट्टींसह स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी …

Read More »

नवाब मलिकांच्या अटकेची बातमी कळताच ममता बॅनर्जींचा शरद पवारांना फोन; पाच मिनिटांच्या चर्चेत म्हणाल्या….

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आज अटक केली आहे. त्यामुळे आता राज्यातलं वातावरण चांगलंच तापलं आहे. दरम्यान, राज्याबाहेरही हे प्रकरण पोहोचल्याचं दिसून येत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही या प्रकरणात उडी घेतली असून त्यांनी शरद पवार यांना फोन करत राष्ट्रवादीला पाठिंबा दर्शवला आहे. नवाब मलिक यांच्या अटकेमुळे राज्याच्या राजकारणात मोठी …

Read More »

“ज्या ज्या मंत्र्यांना अटक होईल, त्यांना…”, नवाब मलिक यांच्या अटकेनंतर चंद्रकांत पाटील यांचा सूचक इशारा!

नवाब मलिक यांना अटक झाल्यानंतर भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. जवळपास ८ तास चौकशी केल्यानंतर ईडीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. त्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. महाराष्ट्रातील सत्ताधारी पक्षांकडून या अटकेचा तीव्र शब्दांत निषेध केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाकडून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील …

Read More »

“२०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले, पण…”, नवाब मलिकांच्या अटकेनंतर जयंत पाटलांचा गंभीर आरोप

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपावर गंभीर आरोप केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजपावर गंभीर आरोप केला आहे. २०१९ मध्ये माझ्यावरही भाजपामध्ये जाण्यासाठी दबावतंत्र वापरले गेले, असा आरोप …

Read More »

“आता ईडीसमोर बोला, तुमच्या हातात…”; नवाब मलिकांवरील कारवाईनंतर नारायण राणेंची प्रतिक्रया

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. बुधवारी सकाळी ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले होते. त्यानंतर काही कागदपत्रे घेऊन अधिकाऱ्यांनी मलिक यांनी ईडीच्या कार्यालयात नेले. त्यांनर नवाब मलिक यांची चौकशी करण्यात आली. हे प्रकरण अंडरवर्डशीही संबंधित असल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यानंतर नवाब मलिक यांनी ईडीने अटक केली आहे. यावर केंद्रीय मंत्री …

Read More »

“नवाब मलिक यांना झालेली अटक हा पुरावा आहे की सरकारविरोधात जो बोलेल त्याला…”; अभिनेत्याचा टोला

सकाळी सात ते दुपारी पावणे तीनपर्यंत अशी जवळजवळ आठ तास चौकशी केल्यानंतर नवाब मलिक यांना अटक करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर दाऊद इब्राहिमसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून आठ तास चौकशी केल्यानंतर ईडीने ही अटकेची कारवाई केलीय. या अटकेनंतर अनेक प्रतिक्रिया समोर …

Read More »

Video : भंगारवाला ते महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील मंत्री… असा आहे नवाब मलिक यांचा राजकीय प्रवास

राज्याच्या कॅबिनेटमध्ये अल्पसंख्यांक मंत्री असणाऱ्या नवाब मलिक यांना ईडीने अटक केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना आठ तासांच्या चौकशीनंतर अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केली आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केल्यानंतर ईडीने ही कारवाई केलीय. पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजल्यापासून नवाब मलिक यांची मुंबईतील …

Read More »

Navab mailk : मुख्यमंत्र्याच्या चर्चेनंतर गृहमंत्र्यांनी दिली ही प्रतिक्रिया…

मुंबई : नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे दिसत आहे. तर, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.  आंबेगाव तालुक्यातील निघोटवाडी येथील बैलगाडा शर्यतीला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी हजेरी लावली होती. मात्र, नवाब मलिक यांची बातमी येऊन धडकताच गृहमंत्री वळसे पाटील यांनी तालुक्यातील सर्व दौरे रद्द करुन तातडीने …

Read More »

ED च्या अधिकाऱ्याला स्वेच्छानिवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी BJP ची उमेदवारी; रोहित पवार म्हणतात, “आम्ही सांगेल ती कामं…”

ईडीचे सहनिर्देशक राजेश्वर सिंह यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केल्याच्या दुसऱ्या दिवशीच निवडणुकीचं तिकीट दिलं आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) म्हणजेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ईडी कार्यालयात नेलं आहे. जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीच पथक नवाब …

Read More »

“सत्तेच्या माडीसाठी ईडीची शिडी…”; अमोल कोल्हेंनी कविता शेअर करत दिला नवाब मलिकांना पाठिंबा

या कवितेतून अमोल कोल्हेंनी भाजपावर टीका केली आहे. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची आज ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. सकाळी सहा वाजता ईडीचे अधिकारी नवाब मलिक यांच्या घरी पोहोचले होते. तिथे त्यांची सुमारे तासभर चौकशी करण्यात आली. त्यानंतर अधिकारी नवाब मलिक यांना सकाळी साडेसातच्या सुमारास ईडी कार्यालयात घेऊन गेले. सकाळी साडेआठ वाजल्यापासून ईडी कार्यालयात मलिकांची …

Read More »

“समलैंगिकता हा एक आजार आहे”, मानसोपचार तज्ज्ञाचा वादग्रस्त दावा, चौकशीचे आदेश!

समानतेच्या तत्वावर गेल्या काही वर्षांमध्ये वारंवार चर्चा होताना पाहायला मिळाल्या आहेत. स्त्री-पुरुष समानतेसोबतच LGBTQ व्यक्तींना देखील समान वागणूक आणि व्यक्ती म्हणून सन्मान मिळावा, यासाठी अनेक सामाजिक संघटना देखील काम करत आहेत. समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांना सामावून घेण्यासाठी प्रयत्न होताना दिसत असताना आता एका मानसोपचार तज्ज्ञानंच केलेल्या वादग्रस्त विधानामुळे खळबळ उडाली आहे. “समलैंगिकता हा एक आजार आहे, मी त्यावर उपचार करून …

Read More »

आणखी तीन वाघांना पकडण्यासाठी पथक तैनात

ऊर्जानगर, दुर्गापुरात कडकडीत बंद, मोर्चा; भटारकर यांच्या उपोषणाची सांगता चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातील एका वाघाला बेशुद्धीकरणाचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्यात सोमवारी रात्री उशिरा वन खात्याला यश आले. जेरबंद वाघाला गोरेवाडा नागपूर येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. दरम्यान, वीज केंद्र परिसरात भ्रमण करणाऱ्या एक मादी व दोन नर अशा ३ वाघांना पकडण्याची मोहीम वन खात्याच्या वतीने सुरू आहे. तर एक …

Read More »