लता मंगेशकर यांचे स्मारक जयप्रभा स्टुडिओत करण्यावरून कोल्हापुरातील वातावरण तापले!

शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांकडून स्टुडिओची खरेदी ; चित्रपट महामंडळाच्यावतीने उद्यापासून साखळी उपोषण

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओमध्ये भारतरत्न लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याच्या मागणीला जोर चढला असताना, या स्टुडिओची खरेदी स्थानिक शिवसेना नेत्याच्या मुलांसह काही बड्या व्यापाऱ्यांनी केल्याने आता प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. तर जयप्रभा स्टुडिओ वाचवण्याच्या मागणीसाठी उद्या(रविवार)पासून स्टुडिओच्या दारात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्यावतीने बेमुदत उपोषण सुरू केले जाणार आहे. तसेच, कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीनेही स्टुडिओ ताब्यात घेऊन कोल्हापूरचे वैभव जतन करण्याची मागणीही केली आहे.

कोल्हापुरातील जयप्रभा स्टुडिओची उभारणी चित्रमहर्षी भालजी पेंढारकर यांनी केली. पुढे हा स्टुडिओ लता मंगेशकर यांनी विकत घेतला होता. त्यातील काही जागेची विक्री अगोदरच झालेली आहे. तर उर्वरित जागेची विक्री दोन वर्षांपूर्वी करण्यात आली आहे. खरेदीदारात शिवसेनेचे माजी आमदार आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. ही माहिती समजल्यानंतर कोल्हापुरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

हेही वाचा :  “सत्तेच्या खुर्च्या उबवून ज्यांच्या शरीरात…”; दिशा सालियन प्रकरणावरुन शिवसेनेचा राणे-पाटलांवर हल्लाबोल

स्मारकाच्या मागणीला जोर –

जयप्रभा स्टुडिओच्या जागेवर लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याची मागणीही होत आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी स्टुडिओत लता मंगेशकर यांचे स्मारक करण्याचा मनोदय व्यक्त केला आहे. याशिवाय आणखीही काही संस्थांनी ही अशी मागणी केली आहे. तर, मला वाचवा…, असा आशय व्यक्त करून जयप्रभा स्टुडिओ वाचण्यासाठी कोल्हापूरकरांनी, कलाकारांनी एकजूट राखावी, असे संदेश सोशल मीडियामध्ये झपाट्याने व्हायरल होत आहेत.

चित्रकर्मी एकवटले –

दरम्यान जयप्रभा स्टुडिओ चित्रीकरणासाठी तत्काळ उपलब्ध करावा, चित्रीकरण व्यतिरिक्त कोणत्याही व्यवसायिक वापर होऊ नये, स्टुडिओचे जतन होण्यासाठी शासनाने लक्ष घालावे या मागणीसाठी स्टुडिओच्या दारात बेमुदत उपोषण करणार असल्याचे, शनिवारी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जयप्रभा स्टुडिओचा ठेवा जपला पाहिजे, अशी मागणी केली आहे.

राजकीय षडयंत्र –

“कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राजकीय बदनामीसाठी हे षडयंत्र रचले आहे. स्टुडिओ शासनाने ताब्यात घ्यावा. स्थापत्य अभियंता असलेला मुलगा ऋुतुराज याला खासगी जागा विकत घेण्याचे अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे. या खरेदीशी आपला संबंध नाही.”, असे शिवसेनेचे माजी आमदार आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक महामंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा :  कोल्हापूरच्या अनुष्का पाटीलला महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …