MPSC : सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्याच्या निर्णयाची आयोगाकडून अंमलबजावणी सुरू

उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय नोंदवण्यासाठी २० फेब्रुवारीची मुदत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने पद भरती परीक्षांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला होता. त्यानंतर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९ साठी पहिल्यांदाच सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच उमेदवारांना भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय (ऑप्टिंग आऊट) नोंदवण्यासाठी २० फेब्रुवारीची मुदत देण्यात आली आहे.

मुलाखतीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसांतच सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. शक्य तितक्या वेगाने आणि संपूर्ण पारदर्शी पद्धतीने पदभरती प्रक्रिया राबवण्यास प्राधान्य देण्यात येत असल्याचे एमपीएससीचे सहसचिव सुनील अवताडे यांनी सांगितले आहे.

या संदर्भात आयोगाकडून काढण्यात आलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा -२०१९ करीता सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर सर्वसाधारण यादी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपाची असून, उमेदवारांच्या अर्जामधील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी प्रमाणपत्रे/कागदपत्रे यांची पुर्नपडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊ शकतो. प्रस्तुत सर्वसाधारण गुणवत्ता यादी न्यायालयात, न्यायाधिकरणामध्ये दाखल विविध न्यायिक प्रकरणांमधील अंतिम न्यायनिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात येत आहे.

हेही वाचा :  हृदयद्रावक! विजेची वायर तुटून गोठ्यावर पडली; करंट लागून ३२ शेळ्या-मेढ्यांचा मृत्यू

तसेच, विषयांकित परीक्षेच्या मुलाखतीपूर्वी उमेदवारांकडून संवर्ग/ पदांचे पसंतीक्रमांक मागविण्यात आले होते. तथापि, अंतिम निकालासंबंधीच्या कार्यवाहीकरीता आयोगाकडून सुधारित कार्य पद्धतीचा स्वीकार केलेला असल्याने सर्व उमेदवारांनी संवर्ग/पदांचे पसंतीक्रम पुन्हा नव्याने सादर करणे अनिवार्य आहे. संवर्ग / पदांचे पसंतीक्रम अथवा भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प सादर करण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरील ONLINE FACILITIES या मेनूमध्ये Post Preference/Opting out वेबलिंक उपलब्ध करून देण्यात येत आहे. सदर वेबलिंक १२ फेब्रुवारी २०२२ रोजी ३ वाजेपासून २० फेब्रुवारी २०२२ रोजी ११.५९ वाजेपर्यंत सुरू राहील.

पसंतीक्रम अथवा भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प यांच्या आधारे अंतिम निकाल/शिफारशी संदर्भातील पुढील प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.-

१.पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग/पदांकरिता पसंतीक्रम सादर करतील, केवळ त्याच संवर्ग/ पदांवरील निवडीकरीता त्यांचा विचार करण्यात येईल.
२. विहित कालावधीनंतर संवर्ग/पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची अथवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही.
३. भरतीप्रक्रियेमधून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांचा अंतिम शिफारशीकरीता विचार करण्यात येणार नाही.
संवर्ग/पदांचे पसंतीक्रम/ बाहेर पडण्याचा विकल्प सादर करण्यात कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी उद्भवल्यास आयोगाच्या १८००-१२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोलफ्री क्रमांकावर अथवा [email protected] या ईमेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल. असे कळवण्यात आले आहे.

हेही वाचा :  India vs Sri Lanka: वेस्ट इंडीजनंतर आता श्रीलंका मोहीम..! जाणून घ्या पूर्ण वेळापत्रक

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.



Source link

About Admin

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

“मराठी कलाकार स्वत: सेटवर हिंदीत बोलतात”, अजय-अतुलच्या जोडीतील अतुलने केली तक्रार

मराठी राजभाषा दिनाच्या निमित्तानं दिलेल्या मुलाखतती अतुलने ही तक्रार केली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि …

Russia – Ukraine War : ठाणे जिल्ह्यातील ३१ विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले

हे सर्व विद्यार्थी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांमधील ३१ विद्यार्थी …