Tag Archives: ipl

विजय मल्ल्या आणि ख्रिस गेल यांची भेट, फोटो शेअर करताच झाला ट्रोल

Vijay Mallya meets Chris Gayle: टी-20 क्रिकेटमध्ये भल्याभल्या गोलंदाजांना दिवसात चांदणी दाखवणारा वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेल गेल्या काही दिवसांपासून आतंरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. तो सध्या काही फ्रँचायझी लीगमध्ये खेळताना दिसतोय. अलीकडेच उद्योगपती विजय मल्ल्या आणि ख्रिस गेल यांच्यात भेट झाली. या भेटीचा फोटो विजय मल्ल्यानं त्याच्या ट्वीटर हँडलवरुन शेअर केलाय. ज्यानंतर नेटकऱ्यांकडून त्याला प्रचंड ट्रोल केलं जातंय.  विजय …

Read More »

Rahul Dravid: भारतीय वेगवान गोलंदाजांबाबत राहुल द्रविडचं मत काय?

ENG vs IND: भारतीय क्रिकेट संघात वेगवान गोलंदाजांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे, ही भारतीय संघासाठी चांगली वेळ आहे, असं भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण (Irfan Pathan) यांना वाटतंय. आयपीएलमध्ये अनेक युवा गोलंदाजानं प्रभावित केलं आहे. यातील काहींना आगामी टी-20 विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते, असंही मत त्यांनी व्यक्त केलंय.  …

Read More »

आयपीएलला जगातील प्रत्येक क्रीडा प्रेमीपर्यंत पोहचवण्याचं मिशन – नीता अंबानी

IPL Media Rights 2023-27 : आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलाव प्रक्रिया (IPL Media Rights Auction 2022) नुकतीच पार पडली. यामध्ये वायकॉम18 ग्रुपने तीन गटाचे अधिकार जिंकले आहेत. या लिलाव प्रक्रियेनंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक नीता अंबानी (Nita Ambani) यांनी आयपीएल जगभरातील प्रत्येक क्रिकेट प्रेमीपर्यंत पोहचवण्याचं मिशन असल्याचे सांगितले.  आयपीएलच्या 2023 ते 2027 या कालावधीसाठी सर्व कॅटेगरीची लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. …

Read More »

IPL: आयपीएलचे सामने पाहण्यासाठी हॉटस्टार नव्हेतर आता ‘या’ ॲपचं घ्यावा लागेल सब्सक्रिप्शन

<p style="text-align: justify;"><strong>IPL:</strong> आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलावप्रक्रिया (IPL Media Rights Auction 2022) नुकतीच पार पडली असून यातून भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने (BCCI) तब्बल 48 हजार कोटी 390 रुपये मिळवले आहेत. यावेळी बीसीसीआयनं चार गटांमध्ये मीडिया हक्क विकण्याचा निर्णय घेतला होता. पहिला गट भारतातील टीव्ही मीडिया अधिकारांचा होता आणि यासाठी 23,575 कोटी रुपयांची बोली लावण्यात आली आहे. दुसरा …

Read More »

IPL सामन्यात फेकलेल्या एका बॉलमधून बीसीसीआयला मिळणार 49 लाख;एका सामन्यातून मिळणार 118 कोटी

IPL Media Rights : इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेच्या 2023 ते 2027 या पाच वर्षांसठीचे मीडिया राईट्स (IPL Media Rights) 48,390 कोटी रुपयांना विकले गेले आहेत. ज्यामुळे आता पुढील पाच वर्षांसाठी आयपीएलच्या प्रत्येक हंगामातील प्रत्येक सामन्यात फेकलेल्या एका चेंडूतून बीसीसीआयला 49 लाख रुपये इतका फायदा होणार आहे. तर एका षटकातून 2.95 कोटी आणि आयपीएल 2023 मधील प्रत्येक सामन्यातून 118 कोटींचा फायदा …

Read More »

डिजीटल प्लॅटफॉर्मच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब, डिजीटल मीडिया राईट्सच्या किंमतीत विक्रमी वाढ

IPL Media Rights Auction : क्रिकेटवेड्या भारतीयांसाठी आयपीएल म्हणजे एखाद्या उत्सवाप्रमाणे असते. त्यामुळे हे सामने पाहण्यासाठी कोट्यवधी प्रेक्षकांची उत्सुक असतात. ज्यामुळे या सामन्यांचे प्रक्षेपण हक्क तब्बल 48 हजार 390 कोटींना विकले गेले. पण यावेळी एक खास गोष्ट पाहायला मिळाली, ती म्हणजे यंदा डिजीटल राईट्स आणि टीव्ही राईट्सच्या विक्रीमध्ये फार फरक दिसून आला नाही. 23 हजार 575 कोटींना टीव्ही राईट्स विकले …

Read More »

IPL : परदेशातील प्रसारण हक्क वायकॉम 18 सह टाईम्स इंटरनेटकडे; 1 हजार 58 कोटींना झाली विक्री

IPL Media Rights: जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL). भारतात कोट्यवधी चाहते असणाऱ्या आयपीएलचे सामने देशाबाहेर परदेशातही पाहिले जातात. त्यामुळे परदेशात क्रिकेट सामने प्रक्षेपित करण्यासाठीचे हक्क कोणत्या कंपनीला मिळणार यासाठीही देखील लिलाव पार पडला. आयपीएलच्या मीडिया राईट्ससाठी पार पडलेल्या लिलावातील पॅकेज डीमध्ये परदेशात आयपीएल सामन्यांचे प्रसारण करण्यासाठीचे राईट्स होते. हे राईट्स वायकॉम 18 आणि …

Read More »

आयपीएल मीडिया राईट्सची विक्री पूर्ण, लिलावातून बीसीसीआयला 43 हजार कोटी 390 रुपयांचा फायदा

IPL Media Rights: इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामने म्हणजे क्रिकेट रसिकांसाठी एक पर्वणीच असते. क्रिकेटवेड्या भारतात आयपीएल सामने बघणाऱ्यांची संख्या कोटींमध्ये आहे. त्यामुळे हे सामने प्रक्षेपण (IPL Media Rights) करण्याची संधी कोणत्या कंपनीला मिळणार, यासाठी देखील लिलाव घेण्यात येतो. दरम्यान 2023 ते 2027 पर्यंतच्या आयपीएल सामन्यांच्या प्रसारण हक्कांसाठी लिलावप्रक्रिया (IPL Media Rights Auction 2022) नुकतीच पार पडली असून यातून भारतीय …

Read More »

Watch Video : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा मुंबईच्या रस्त्यांवर खेळतोय ‘गल्ली क्रिकेट’

Rohit Sharma Video : मुंबई नगरीने जागतिक क्रिकेटला मोठमोठे दिग्गज दिले आहेत. यात गावस्कर, तेंडुलकरांपासून अनेकांचं नाव आहे. सध्या भारतीय संघाचा कर्णधार हिटमॅन रोहित शर्मा (Rohit Sharma) हा देखील मुंबईचाच असून बोरीवलीच्या गल्ल्यांमध्येच त्याने क्रिकेटचे धडे गिरवले. तर हाच रोहित आता पुन्हा एकदा गल्ली क्रिकेटचा आनंद घेताना दिसून आला आहे. मुंबईत वरळीच्या एका गल्लीमध्ये रोहित शर्मा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर …

Read More »

IPL Media Rights : आयपीएलचे टीव्ही मीडिया राईट्स डिजनी स्टारकडे; तर डिजीटल हक्क वायकॉम 18 कडे

IPL Media Rights: क्रिकेटचा महासंग्राम असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचे (IPL) सामने कोणत्या कंपनीला प्रसारित करण्याचे हक्क मिळणार यासाठी देखील लिलाव पार पडला. यामध्ये टीव्ही मीडिया राईट्सच्या शर्यतीत डिजनी स्टारने (Disney Star) तर डिजीटल हक्कांसाठी वायकॉम 18 ने (Viacom18) बाजी मारली आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठीचे मीडिया राइट्ससाठी लिलाव प्रक्रिया (IPL Media Rights 2023-27 …

Read More »

BCCI ची चांदीच-चांदी; 44 हजार कोटीना विकले मीडिया राईट्स,एका सामन्यातील कमाई 100 कोटींच्या घरात

IPL Media Rights: जगातील सर्वात मोठी क्रिकेट लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल (IPL). भारतात तर कोट्यवधी क्रिकेटप्रेमी या लीगवर भरभरुन प्रेम करतात, त्यामुळे आयपीएल सामने पाहणाऱ्यांची संख्याही कोट्यवधींच्या घरात आहे. ज्यामुळे या महास्पर्धेचे सामने प्रसारीत करण्याचे हक्क कोणत्या कंपनीकडे जाणार यासाठीही लिलाव प्रक्रिया पार पडते. दरम्यान भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठीचे मीडिया …

Read More »

आयपीएलच्या प्रत्येक सामन्यातून 104 कोटींहून अधिक कमाई निश्चित, पहिल्या दिवशी चुरशीची स्पर्धा

IPL Media Rights: आयपीएलच्या प्रसारण हक्कांच्या लिलाव प्रक्रियेत पहिल्या दिवशी  व्हायकॉम 18, सोनी, स्टार इंडिया आणि झी समूह यांच्यात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली. दुसऱ्या दिवशीही स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. ज्यामुळं बीसीसीआयला अपेक्षेप्रमाणे कमाई होताना दिसत आहे. महत्वाचं म्हणजे, पहिल्या दिवशीच्या लिलाव प्रक्रियेनंतर बीसीसीआय आता आयपीएल प्रसारण हक्कांच्या लिलावातून एका सामन्यात 104 कोटी रुपये कमावणार असल्याचं निश्चित झालंय. आयपीएलच्या …

Read More »

IPL : आज होणार आयपीएल प्रसारण हक्कांसाठी लिलाव; BCCI 50-55 हजार कोटी मिळवण्याची संधी

IPL Media Rights 2023-27 Auction : भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड अर्थात बीसीसीआय (BCCI) आयपीएलच्या पुढील पाच वर्षांसाठीचे मीडिया राइट्ससाठी आज लिलाव प्रक्रिया (IPL Media Rights 2023-27  Auction) घेणार आहे. आज अर्थात 12 जून रोजी 11 वाजण्याच्या सुमारास ही लिलाव प्रक्रिया सुरु होणार आहे. यंदा या लिलाव प्रक्रियेत बऱ्याच मोठ्या कंपन्या सामिल होणार असून यामुळे BCCI ला जवळपास 50 ते 55 …

Read More »

प्रसारण हक्कांच्या शर्यतीतून ॲमेझॉनची माघार; ‘या’ चार कंपण्यात असेल तगडी टक्कर

IPL Media Rights Auction 2022 : क्रिकेटचा महासंग्राम असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचे फॅन्स भारतातच नाही तर आता जगभरात वाढत आहे. सर्वात प्रसिद्ध क्रिकेट लीग आयपीएलच्या आगामी 2023 ते 2027 पर्यंतच्या प्रसारण हक्कांसाठी सध्या बोली लावली जात असून या शर्यतीतून ॲमेझॉनने माघार घेतली आहे. रविवारी पार पडणाऱ्या या लिलाव प्रक्रियेत आता इतर चार बड्या कंपन्यात चुरशीची टक्कर सुरु असल्याचं दिसून येत …

Read More »

‘मी नेहमीच मोठी स्वप्ने पाहतो’ मर्सिडीज-बेंझ एएमजी खरेदी केल्यानंतर आंद्रे रसलची प्रतिक्रिया

Mercedes-Benz AMG:  दोन वेळा आयपीएलची जिंकणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला आयपीएलच्या पंधराव्या हंगामात काही खास कामगिरी करता आली नाही. परंतु, कोलकात्याच्या वेगवान गोलंदाज आंद्रे रसलनं उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सर्वांना प्रभावित केलंय. त्यानं फलंदाजीसह गोलंदाजीमध्ये दमदार प्रदर्शन केलंय. आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी कोलकात्याच्या संघानं आंद्रे रसलला 12 कोटींमध्ये रिटेन केलं होतं. आयपीएल 2022 संपल्यानंतर आता रसेलनं स्वतःला एक अप्रतिम भेट दिली. त्यानं …

Read More »

Harbhajan Singh: हरभजन सिंहकडून 14 वर्षापूर्वी घडली चूक, आज होतोय पश्चाताप!

Harbhajan Singh On Sreesanth: आयपीएलच्या पहिल्या हंगामात भारताचा फिरकीपटू हरभजन सिंह आणि वेगवान गोलंदाज श्रीसंतच्या कानशिलात लगावली होती. त्यानंतर क्रिडाविश्वात एकच खळबळ माजली. त्यावेळी हरभजन सिंह मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) तर, श्रीसंत पंजाब किंग्जच्या (Panjab Kings) संघाचा भाग होता. दरम्यान, 14 वर्षानंतर हरभजन सिंहनं या घटनेबद्दल खेद व्यक्त केलाय. श्रीसंतच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी हरभजन सिंहवर आयपीएलच्या संपूर्ण हंगामासाठी बंदी घालण्यात आली. …

Read More »

आकाश चोप्रानं हार्दिक पांड्याला निवडलं ‘कॅप्टन ऑफ द सीजन’, कारणंही आहे तितकचं खास

Captain of the Season: भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रानं (Akash Chopra) गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) कर्णधार हार्दिक पांड्याची (Hardik Pandya) आयपीएल 2022 मधील सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवड केली आहे. यंदाच्या हंगामात हार्दिकनं फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगली कामगिरी करत संघाचं नेतृत्व केलं. हार्दिकच्या कर्णधारपदात कोणतीही कमतरता नसल्याचेही त्यानं म्हटलय. आकाश चोप्रा काय म्हणाला?आकाश चोप्रानं आपल्या युट्यूब चॅनलवर बोलताना हार्दिक पांड्याच्या …

Read More »

पाच इनिंगमध्ये तीनवेळा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतला; विराट नव्हेतर, मग तो खेळाडू कोण?

<p style="text-align: justify;"><strong>IPL 2022: </strong>भारतात सर्वात लोकप्रिय असलेल्या आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार प्रदर्शन करून गुजरात टायटन्सनं पदार्पणाच्या हंगामातच ट्रॉफी जिंकली. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली गुजरातनं राजस्थान रॉयल्सचा सात विकेट्स राखून विजय मिळवला. यंदाच्या हंगामात अनेक दिग्गज खेळाडू गोल्डन डकचे शिकार ठरले. ज्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहलीचंही नाव आहे. परंतु, पाच डावात तीनवेळा शून्यावर …

Read More »

Hardik Pandya: गुजरातला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याला मिळालं खास ‘गिफ्ट’

IPL 2022: गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) उद्योगपती वीरा पहारियाकडून (Veera Pahariya) एक खास गिफ्ट मिळालं आहे. हार्दिक पांड्यानं स्वत: इंन्टाग्राम स्टोरीवर या गिफ्टचा व्हिडिओ शेअर केलाय. हार्दिकची पत्नी नताशा स्तांकोविक (Natasha Stankovic) हा व्हिडिओ बनवताना दिसत आहे. हे गिफ्ट मिळाल्यानं हार्दिक खूश दिसत आहे. गिफ्टमध्ये काय मिळालं?दरम्यान, हार्दिक पांड्याला मिळालेलं गिफ्ट एक पेंडेंट आहे. ज्याच्या एका …

Read More »

‘… तरच अर्जून तेंडुलकरला मुंबईच्या संघात जागा’, गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्ड स्पष्टचं बोलले

Arjun Tendulkar:  मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जून तेंडुलकर (Arjun Tendulkar) मुंबई इंडियन्सकडून (Mumbai Indians) आयपीएलमध्ये पदार्पण करेल, अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, संपूर्ण हंगामात अर्जून तेंडुलकरला संपूर्ण हंगामात प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर अर्जून तेंडुलकरला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान का मिळालं नाही? यावर अनेक दिग्गजांनी आपलं मत मांडलं होतं. मात्र, मुंबई इडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक शेन बॉन्डनं यामागचं …

Read More »