NHM Recruitment: ‘या’ महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात बंपर भरती, जाणून घ्या तपशील

Kolhapur Recruitment: रोजगाराची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. कोल्हापूर महानगरपालिका येथे विविध पदांची भरती केली जाणार आहेत. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

कोल्हापूर महापालिकेअंतर्गत विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ (Specialist Gynaecologist), विशेषतज्ञ भूलतज्ञ (Specialist Anaesthetist), विशेषतज्ञ बालरोगतज्ञ, (Specialist Paediatrician)पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी (Full Time Medical Officer), अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी (Part Time Medical) (स्त्रीरोगतज्ञ/ बालरोगतज्ञ) Officer (Gynaecologist/Paediatrician)या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

विशेषतज्ञ स्त्रीरोगतज्ञ, विशेषतज्ञ भूलतज्ञ, विशेषतज्ञ बालरोगतज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण १९ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

स्पेशलिस्ट गायनोकोलॉजीस्ट या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित पदानुसार एमडी/एमएस Gyn /डीजीओ / डीएनबीपर्यंत शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

स्पेशलिस्ट अनेस्थेटिस्ट या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार एमडी/एमएस Gyn /डीजीओ / डीएनबीपर्यंत शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

स्पेशलिस्ट पेड्रेटिशियन या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून एमडी Paed / डीसीएच / डीएनबी पर्यंतशिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  NEP ला अनुसरून शिक्षणपद्धतीमध्ये बदल, 'यूजीसी'ने घेतला पुढाकार

फूल टाइम मेडिकल ऑफिसर या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार एमबीबीएस, एमसीआय/एमएमसी पर्यंत शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून संबंधित पदानुसार एमडी/एमएस Gyn / डीजीओ/ डीएनबी एमडी Paed / डीसीएस / डीएनबीपर्यंत शिक्षण पूर्ण करणे आवश्यक आहे.

केंद्रीय विद्यालयांमध्ये ४,०१४ विविध पदांची भरती, ‘येथे पाठवा अर्ज

SET Exam: ‘सेट’ परीक्षा २६ मार्चला होणार
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

हेही वाचा :  शिवाजी विद्यापीठात नोकरीची संधी, थेट मुलाखतीतून होणार निवड

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा मजला, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत एस.पी.ऑफिसजवळ, कसबा बावडा रोड, कोल्हापूर ४१६००३ येथे पाठवायचे आहेत. २५ नोव्हेंबर २०२२ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

UPSC Recruitment 2022: केंद्रीय लोकसेवा आयोगात बंपर भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …