रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचं अधिकृत ट्वीटर अकाउंट झालं हॅक, हॅकर्सनी ठेवलं ‘हे’ नाव

RCB Twitter : आयपीएल फ्रँचायझी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे (Royal Challengers Banglore)  अधिकृत ट्वीटर अकाउंट शनिवारी (21 जानेवारी) हॅक झाल्याची घटना समोर आली. यादरम्यान हॅकर्सनी आरसीबीच्या अधिकृत ट्वीटर हँडलचे नाव बदलून ‘बोर्ड एप यॉट क्लब’ असं केलं होतं. हॅकर्सनी आरसीबीच्या ट्वीटरचं बायो देखील बदललं होतं आणि प्रोफाईल फोटो देखील बदलला होता. हॅकर्सनी बायोमध्ये लिहिलं की, सदस्य होण्यासाठी OpenSea वर कंटाळलेले एप किंवा म्युटंट एप खरेदी करा. पण हॅकर्सच्या काही विचित्र ट्वीटनंतर नेकऱ्यांनी लवकरच हे सारं ओळखलं. विशेष म्हणजे, RCB ने अद्याप हॅकर्सनी ट्वीट केलेला मजकूर काढून टाकलेला नाही किंवा फ्रँचायझीने ट्वीटर अकाउंट हॅक झाल्याचीबद्दल अधिकृच माहिती दिलेली नाही.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवर एक प्रमोशनल व्हिडिओ पोस्ट केला आहे. त्याचं दरम्यान त्याच्या ट्वीटर अकाऊंटशी छेडछाड करण्यात आली. त्याच वेळी, फ्रँचायझीचे ट्वीटर अकाऊंट हॅक केले गेले आणि हॅकर्सद्वारे काही विचित्र पोस्ट शेअर केले गेले हे पाहून त्यांचे फॉलोवर्सही आश्चर्यचकित झाले. आरसीबीचं ट्वीटर अकाउंट हॅक झाल्यानंतर नेटकऱ्यांनी केलेले काही ट्वीट्स पाहू…

 

हेही वाचा :  पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने बाबर आझमवरील आरोप फेटाळत दिलं सडेतोड उत्तर, पाहा ट्वीट

याआधीही हॅक झालं होतं आरसीबीचं ट्वीटर  

आरसीबीचे ट्वीटर अकाउंट हॅक होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सप्टेंबर 2021 मध्येही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे ट्वीटर अकाउंट हॅक झालं होतं. पण नंतर फ्रँचायझीने ते लवकरच पूर्ववत केलं. पण 21 जानेवारीला हॅक झालेले ट्वीटर अकाउंट आरसीबीने अद्याप रिस्टोअर केलेलं नाही. ट्वीटरवर आरसीबीचे ६.४ मिलियन फॉलोअर्स आहेत. अकाऊंट सप्टेंबर 2009 मध्ये तयार केले गेले. आरसीबी 585 लोकांना फॉलो देखील करते.

हे देखील वाचा-



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

विराटचा फोन हरवल्यावर नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया, झोमॅटोवाले म्हणतात ‘अनुष्काचा फोन वापर’

Virat Kohli Lost Phone tweet : भारतीय संघाचा (Team India) माजी भारतीय कर्णधार विराट कोहली …

IND vs AUS : केएस भरत की ईशान किशन? कोणाला मिळणार प्लेईंग 11 मध्ये जागा?

IND vs AUS, Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना …