ती जिवंत राहील की नाही…. प्रियंकाने पहिल्यांदाच सांगितली मालतीच्या जन्माची गोष्ट

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसची मुलगी मालती मेरी एक वर्षांची झाली आहे. मात्र अद्याप तिचा गोंडस चेहरा दाखवण्यात आला नाही. मालती आणि प्रियंकाचं Vogue मॅगझिन करता फोटोशूट करण्यात आलं.

यानंतर पुन्हा एकदा मालतीच्या जन्माबाबत चर्चा झाली. प्रियंकाने स्वतः मालतीला जन्म न देता सरोगसीची मदत घेतली. यावर वेगवेगळ्या चर्चा झाल्या. प्रियंकाने आपल्या कामामुळे गर्भधारणेचा निर्णय घेतला नाही. अशा एक ना अनेक चर्चांवर प्रियंकाने मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत उत्तरे दिली आहे. (फोटो सौजन्य – Priyanka Chopra इंस्टाग्राम / iStock)

मालती जगेल की नाही याबाबत शंका

मालती जगेल की नाही याबाबत शंका

प्रियंका चोप्राने वोग मगॅझिनला दिलेल्या मुलाखतीत मालतीच्या जन्माची गोष्ट सांगितली आहे. मालतीचा जन्म हा पूर्ण एका ट्रायमेस्टरच्या अगोदर झाला आहे. जेव्हा मालतीचा जन्म झाला तेव्हा मी ऑपरेशन थिएटरमध्येच होती, असं प्रियंका सांगते. मालती खूप छोटी होती, अगदी माझ्या हातापेक्षाही छोटी, असल्याचं प्रियंकाने सांगितले.

हेही वाचा :  प्रियंकाने पहिल्यांदाच दाखवला लेकीचा फोटो, बाळाचा चेहरा लपविण्यामागची कारण काय?

(वाचा – उंची, दिसणं एवढंच काय नोकरीही सारखीच.. तरीही दोघं एका आईची मुलं नाहीत, काय आहे हा चमत्कार)

यांच्यामुळे वाचली मालती

यांच्यामुळे वाचली मालती

इंटेसिव केअर नर्सेस कसं करत होत्या ते प्रियंका आणि निक बघत होते. त्या देवाचं नाव घ्यायच्या आणि मालतीच्या शरीरात ट्यूब घालत होत्या. निक आणि मी दोघेही बघत होतो. आम्हाला कळतंच नव्हतं की, मालती जगेल की नाही.

(वाचा – पुण्यातील शिवन्या जन्माच्यावेळी अवघ्या ४०० ग्रॅमची, डॉक्टरांनीही सोडली होती आशा, पण पुढे जे घडलं तो एक चमत्कारच)

प्रियंका – मालतीचे खास क्षण

प्रियंका बाळाला जन्म देऊ शकत नव्हती

प्रियंका बाळाला जन्म देऊ शकत नव्हती

प्रियंकाने सांगितलं की, तिला काही मेडिकल प्रॉब्लेम होते. ज्यामुळे ती स्वतः बाळाला जन्म देऊ शकत नव्हती. त्यामुळे हा निर्णय घेणं गरजेचं होतं. मी या सरोगसी पद्धतीची खूप आभारी आहे कारण या वैद्यकीय स्थितीमुळे आईपण अनुभवू शकली. तसेच आपल्याकरता सरोगसी करणाऱ्या व्यक्तीचे देखील आभार मानले आहेत. ती व्यक्ती खूप चांगली असून प्रेमळ आणि मजेशीर होती. सहा महिन्यांपर्यंत आमच्या बाळाची त्यांनी काळजी घेतली, याकरता आम्ही आभारी आहोत.

हेही वाचा :  Oscar 2022 : बॉलिवूडची 'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा करणार ऑस्करच्या प्री इव्हेंटचे सूत्रसंचालन

(वाचा – गरोदरपणात गोंडस बाळाचा फोटो बघून खरंच तसं बाळ होतं, काय म्हणतात डॉक्टर))

मुलीचं नाव ठेवलं अतिशय युनिक

मुलीचं नाव ठेवलं अतिशय युनिक

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने २०१८ मध्ये लग्न केलं. गेल्यावर्षी जानेवारीत त्यांनी बाळाच्या जन्माची माहिती दिली. प्रियंका कायमच मुलीची झलक दाखवते पण अद्याप चेहरा दाखवलेला नाही. प्रियंकाने आपल्या आई आणि निकच्या आईशी संबंधीत मुलीचं नाव ठेवलं आहे. प्रियंकाने लेकीचं नाव मालती मेरी चोप्रा जोनस असं ठेवलं आहे.

सरोगसी म्हणजे काय?

सरोगसी म्हणजे काय?

जेव्हा एखादी वैद्यकीय समस्या असते. घर्भधारणेत धोका असतो किंवा गर्भधारणेमुळे आईच्या आरोग्याला धोका असतो किंवा एकट्या व्यक्तीची पालक होण्याची इच्छा असते तेव्हा सरोगसीच्या मदतीने बाळाला जन्म देऊ शकतो. सरोगसीमध्ये, पुरुष जोडीदाराचे शुक्राणू आणि स्त्री जोडीदाराची अंडी फलित करून सरोगेट आईच्या गर्भाशयात ठेवली जातात. ही संपूर्ण प्रक्रिया भारतात कायदेशीररित्या वैध आहे.

(वाचा – ब्रेस्टफिडिंग करणाऱ्या आईने अल्कोहोल पिणे योग्य? गायनोकॉलॉजिस्टने सांगितल्या वॉर्निंग टिप्स)



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …