AAI Recruitment: भारतीय विमानतळ प्राधिकरणात नोकरी करण्याची संधी, जाणून घ्या तपशील

AAI Recruitment 2022: भारतीय विमानतळ प्राधिकरणात (Airports Authority of India, AAI) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये ग्रॅज्युएट/डिप्लोमा प्रशिक्षणार्थी पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत एकूण १२५ रिक्त पदे भरली जाणार आहेत. सिव्हिल ग्रॅज्युएट(Civil (Graduation) ची ६ पदे, इलेक्ट्रिकल ग्रॅज्युएटची (Electronics (Graduate) ०७ पदे,
इलेक्ट्रॉनिक्स (पदवीधर) ची(Electronics (Graduate)१३ पदे, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (पदवीधर) – (Computer Science/Information Technology (Graduate)) ०३ पदे, मेकॅनिकल / ऑटोमोबाईल (पदवीधर) (Mechanical / Automobile (Graduate)) – १ पद, सिव्हिल (डिप्लोमा) (Civil (Diploma))– १० पदे, इलेक्ट्रिकल (डिप्लोमा) (Electrical (Diploma))ची १० पदे
इलेक्ट्रॉनिक्स,डिप्लोमा (Electronics (Diploma))ची २५ पदे, कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (डिप्लोमा) (Computer Science/Information Technology (Diploma))ची १० पदे, मेकॅनिकल / ऑटोमोबाईल (डिप्लोमा) (Mechanical / Automobile (Diploma))ची ५ पदे, आयटीआय ट्रेड (संगणक ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टंट, इलेक्ट्रिकल, मेकॅनिक, इलेक्ट्रॉनिक्स) (ITI Trade (Computer Operator Programming Assistant, Electrical, Mechanic, Electronics)ची ३५ पदे भरली जाणार आहेत.

हेही वाचा :  राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर अंतर्गत विविध पदांची भरती

SBI मध्ये परीक्षा न देता मिळेल नोकरी, ७८ हजारपर्यंत पगार

मध्य रेल्वेत विविध पदांची भरती, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक
पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी २६ वर्षे इतकी वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे. पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

४ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. उमेदवारांना AAI ची अधिकृत वेबसाइट aai.aero वर जाऊन अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा
BMC Recruitment: सायन रुग्णालयात विविध पदांची भरती

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …