आदित्य नारायणच्या गोड मुलीचे नाव त्विशा, त वरून मुलींची नावे

बाळाच्या जन्माच्या आधीपासूनच नावाची एक यादी काढली जाते. हल्ली तीच तीच नावं ठेवण्यापेक्षा वेगळ्या नावांकडे पालकांचा कल अधिक दिसून येतो. मात्र आद्याक्षरावरून नाव ठेवायची पद्धत अजूनही आहे. तुमच्या मुलीचे आद्याक्षर ‘त’ आले असेल आणि वेगळ्या नावांच्या शोधात असाल तर ही यादी तुमच्यासाठीच आहे.

प्रसिद्ध गायक आणि निवेदक आदित्य नारायणने त्याच्या गोड मुलीचे नाव त्विशा ठेवले आहे. तुम्ही या नावाचाही उपयोग करून घेऊ शकता. त्विशा नावाप्रमाणेच त वरून मुलींच्या नावाची यादी आम्ही देत आहोत. मुलींची नावे अर्थासहित जाणून घ्या. (फोटो सौजन्य – @adityanarayanofficial Instagram, Canva)

तनया

तनया

तनया अर्थात कन्या. घरात कन्यारत्न होणे हे भाग्याचं लक्षण मानलं जातं. नाजूक अशी कन्या म्हणजे तनया. तुम्ही तुमच्या मुलीसाठी या नावाची निवड करू शकता.

तपर्णा

तपर्णा

तपर्णा या नावाचा अर्थ आहे तृप्त करणारी. तृप्ती हे नाव खूप कॉमन झाले आहे. मुलीच्या जन्माने घरात सर्वांचेच आयुष्य तृप्त होते. घराला एक घरपण मिळते. वेगळ्या नावाच्या शोधात असाल तर हे नाव योग्य ठरू शकते.

हेही वाचा :  Name ideas for twins :जुळ्या मुलांसाठी ही आहेत हटके आणि स्टायलिश नावं

तितिक्षा

तितिक्षा

तितिक्षा हे नाव थोडे वेगळे आहे आणि कठीणही आहे. मात्र या नावाचा अर्थ तुम्हाला नक्कीच आवडू शकतो. क्षमा आणि सहनशीलता असा याचा अर्थ आहे. तुमच्या मुलीसाठी त आद्याक्षर आले असेल तर या नावाची निवड तुम्ही करू शकता.

(वाचा – लग्नाच्या १८ वर्षानंतर अपूर्व-शिल्पाला झाली मुलगी ठेवले पारंपरिक आणि युनिक अर्थाचे नाव, मुलींच्या नावासाठी घ्या प्रेरणा)

तुलिका

तुलिका

तुमचे रंगावर अधिक प्रेम असेल आणि तुमच्या घरी लहानशा परीचा जन्म झाला असेल तर तुम्ही तुलिका नाव ठेऊ शकता. रंगाने भरलेला रंगकुंचला असा या नावाचा अर्थ आहे. मुलीच्या जन्माने आई-वडिलांच्या आयुष्यात आनंदाचे रंग भरले जातात. त्याचेच हे नाव म्हणजे प्रतीक आहे.

(वाचा – ठेवा बाळांची नावे थोर संतांवरून, मूळ नावाचा जपा वारसा )

तृष्णा

तृष्णा

तृष्णा हे नाव कठीण असले तरीही तहान असा याचा अर्थ आहे. ज्या आई-वडिलांच्या घरी अनेक वर्ष वाट पाहिल्यानंतर मुलीचा जन्म झाला असेल त्यांच्यासाठी हे नाव अर्थपूर्ण आहे.

(वाचा – सोनम कपूरला व्हायचंय आपल्या सासूसारखी आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत व्यक्त केली इच्छा)

हेही वाचा :  संजय राऊत बाहेर आले, मलिक आणि देशमुख आत का? उदय सामंत यांनी राष्ट्रवादीला डिवचले

तोषा

तोषा

अगदीच ऐकिवात नसलेले असे हे नाव आहे. तोषा नावाचा अर्थ आहे आनंददायी. कायम आनंदी राहणारी आणि जगाला आनंद देणारी अशी मुलगी. घरात मुलीचा जन्म झाला असेल तर तुम्ही या नावाचा विचार करू शकता.

तारिणी

तारिणी

तुम्ही शंकर – पार्वतीभक्त असाल तर हे नाव तुमच्यासाठीच आहे. तारिणी हे पार्वतीचे एक नाव आहे. कोणत्याही संकटातून तारणारी असा याचा अर्थ आहे. पार्वतीच्या नावावरून प्रेरणा घेऊ तुम्ही हे नाव ठेऊ शकता.

तावीशी

तावीशी

धैर्य, बळकट आणि कणखर हे स्त्री चे रूप आहे. तावीशी अर्थात धैर्यवान. तुम्हाला तुमची मुलगी कणखर आहे आणि धैर्यवान व्हावी असे वाटत असेल तर तिच्या नावापासूच याची सुरूवात करा. धैर्यवान असा याचा अर्थ मनाला वेगळेच समाधान देतो.

तुहीना

तुहीना

एखाद्या पानावरील नाजूक दवबिंदू म्हणजे तुहीना. घरात नाजूकशा सुंदर मुलीचा जन्म झाल्यानंतर तिचे हे नाव तुम्ही ठेऊ शकता. नेहमीच्या नावांपेक्षा वेगळे आणि युनिक नाव असून इतर मुलींमध्ये नक्कीच वेगळेपणा जाणवेल.

तुर्वी

तुर्वी

प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांनी एक उंची गाठावी असे वाटत असते. तुर्वी अर्थात उच्च. हे नावदेखील कॉमन नाही. त्यामुळे आपल्या मुलीसाठी तुम्ही या नावाची निवड करू शकता. वेगळ्याच नावाचा शोध तुम्ही घेत असाल तर या नावावर तुमचा शोध संपू शकतो.

हेही वाचा :  अपूर्व-शिल्पाच्या मुलीचे पारंपरिक-युनिक अर्थाचे नाव, मुलींच्या नावासाठी घ्या प्रेरणा

त या आद्याक्षरावरून आम्ही तुम्हाला वेगळी आणि युनिक नावे सुचवली आहेत. ही नावे तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा आणि आपल्या मुलीचे नाव शोधण्यासाठी हा लेख नक्की वाचा.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …