ठेवा बाळांची नावे थोर संतांवरून, मूळ नावाला जपत जपा वारसा

घरात बाळाचा जन्म होणार कळल्यापासूनच आपल्या मुलाचे वा मुलीचे नाव काय ठेवायचे हे ठरवायला सुरूवात होते. तीच तीच नावं हल्ली मुलांची ठेवयला लोकांना आवडत नाहीत. पण महाराष्ट्राला थोर संतपरंपरेचा वारसा लाभला आहे आणि आजही अनेक घरात तो जोपासला जातो. संतांच्या या नावांवरून तुम्ही आपल्या बाळांची नावे नक्कीच ठेऊ शकता.

अर्थासह तुम्ही ठेवा संतांची नावे. संतांच्या नावावरून प्रेरणा घेऊन थोडीशी बगल देत आम्ही ही नावं सुचवत आहोत. या नावांचा अर्थ तोच आहे. खरं तर या संतांना लाडाने महाराष्ट्र आम्ही देत असलेल्या नावाने ओळखतो. तुम्हीही या मॉडर्न जगात संतांवरून आपल्या मुलामुलींची नावे ठेऊ शकता. (फोटो सौजन्य – Freepik.com)

​कबीर ​

​कबीर ​

संत कबीर हे अत्यंत प्रसिद्ध होते. अतिशय शक्तीशाली, महान आणि आदरणीय असा अर्थ असणारे नाव तुम्ही मुलाचे ठेऊ शकता. कबीर के दोहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. अत्यंत प्रसिद्ध असणारे हे कवी हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्माद्वारे सन्मानित होते. त्यामुळे दोन्ही धर्मामध्ये या संताचे नाव वापरण्यात येते.

हेही वाचा :  भगवान शिवची ही १० विशिष्ट नावे, मुलांवर राहील विशेष कृपादृष्टी

​ज्ञानदेव ​

​ज्ञानदेव ​

ज्ञानदेवांनी अत्यंत लहान वयात खूपच मोठी कामगिरी केली होती. रेड्याच्या तोंडून गीता वदवून घेतल्याची गोष्ट तर सर्वांनाच माहीत आहे. मुलाचे नाव संताच्या नावावरून ठेवायचा विचार असेल तर तुम्ही संत ज्ञानदेव यांच्या नावाचा नक्कीच विचार करू शकता.

(वाचा – सोनम कपूरला व्हायचंय आपल्या सासूसारखी आई, वाढदिवसाच्या शुभेच्छा देत व्यक्त केली इच्छा)

​समर्थ​

​समर्थ​

संतांची परंपरा जपत समर्थ रामदासांच्या नावातील समर्थ हे नाव तुम्ही निवडू शकता. हे नाव कायम लक्षात राहील असंच आहे. समाजातील तरूण वर्गाला आरोग्य आणि सुदृढ शरीराचे महत्त्व सांगणारे समर्थ रामदास हे थोर संत होते. शिस्तप्रिय असणाऱ्या समर्थांचे नाव हे तुमच्या मुलासाठी योग्य ठरेल.

(वाचा – जगप्रसिद्ध क्रिकेटर सराह टेलरने केली जोडीदार डायनाच्या प्रेग्नन्सीची घोषणा, लेस्बियन कपल होणार आई)

​मुक्ताई​

​मुक्ताई​

ज्ञानेश्वरांची लहान बहीण म्हणजे संत मुक्ताबाई. मुक्ताबाईने नेहमीच आपल्या मोठ्या भावांना साथ दिली. महाराष्ट्रातील थोर संत आणि कवियित्री म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मुक्ताबाई या मुक्ताई नावानेही प्रसिद्ध होत्या. मुक्ताईचे ताटीचे ४२ अभंग आजही प्रसिद्ध आहेत. आपल्या लहानग्या मुलीचे नाव तुम्हाला संतांच्या नावावरून ठेवायचे असल्यास, या नावाचा तुम्ही विचार करावा.

हेही वाचा :  मेणासारखी वितळेल पोटाची चरबी, या वेळात गाढ झोपी गेलात तर जिम व डाएटची गरज नाही

(वाचा – गरोदरपणादरम्यान पोटावर येणारी काळी रेषा म्हणजे नेमके काय? जाणून घ्या Linea Nigra विषयी)

​जनाई​

​जनाई​

संत जनाबाई हेदेखील थोर संत आणि कवयित्रीचे नाव. जात्यावर दळण दळत आयुष्याचे धडे देणाऱ्या जनाबाई या विठ्ठलभक्ताच्या घरी जन्मल्या होत्या. लाडाने जनाई असं त्यांना म्हटले जायचे. जनाई नावातच सर्वकाही आहे. जनमानसात लोकप्रिय अर्थात जनाई. तुमच्या मुलीचे नाव जनाबाईच्या नावावरून ठेवता येईल.

​निवृत्ती​

​निवृत्ती​

ज्ञानेश्वरांचे सर्वात मोठे बंधु निवृत्ती. हेदेखील थोर संत होते आणि समाजात बदल घडविण्यासाठी या संतांनी मोठा हातभार लावला. एखाद्या गोष्टीतून काम पूर्ण करून झाल्यानंतर बाहेर पडणे म्हणजे निवृत्ती स्वीकारणे. संतांच्या नावावरून प्रेरणा घेत तुम्ही निवृत्ती नावाची निवड करू शकता.

​मीरा​

​मीरा​

कृष्णभक्त मीरा कोणाला माहीत नाही? भक्तीत लीन असणारी मीरा ही सर्वांसाठीच मोठं उदाहरण ठरली. मीराप्रमाणे लीन आणि भक्तीत रममाण असणारी असे नाव आपल्या मुलीचे तुम्ही ठेऊ शकता. मीरा अर्थात समृद्धी. घरात समृद्धी घेऊन येणारी मुलगी.

​सोयरा​

​सोयरा​

संत सोयराबाईंच्या नावावरून प्रेरणा घेऊन तुम्ही मुलीचे वेगळे नाव सोयरा असे ठेऊ शकता. देवी अथवा नैसर्गिक सौंदर्य असा या नावाचा अर्थ असून वेगळ्या नावाच्या शोधात असाल तर नक्कीच संत सोयराबाईच्या नावावरून तुम्ही सोयरा हे नामकरण करू शकता.

हेही वाचा :  तिसरे महायुद्ध पेटण्यास एक ठिणगी पुरेशी, रशियाने केली युक्रेनची कोंडी

महाराष्ट्राला संतांचा वारसा लाभला आहे आणि त्यावरून तुम्ही अभिमानाने संतांची नावं आपल्या मुलांसाठी निवडू शकता. बाळांची नावे ठेवताना काहीतरी वेगळा विचार करत असाल तर नक्की या लेखातील नावांचा उपयोग करून घ्या.

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …

‘मुंबईत गिरगावमध्ये नोकरीची संधी पण मराठी उमेदवार नको’; महिला HR ची संतापजनक पोस्ट

HR LinkedIn Post Related to Marathi People : सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत …