BSNL Recruitment: भारत संचार निगममध्ये बंपर भरती, ‘ही’ घ्या अर्जाची थेट लिंक

BSNL Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची अपडेट आहे. भारत संचार निगम लिमिटेड (Bharat Sanchar Nigam Limited, BSNL) मध्ये बंपर भरती सुरु आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

भारत संचार निगम लिमिटेड अंतर्गत ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसरच्या एकूण ११ हजार ७०५ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेतून इंजिनीअरिंगची पदवी असणे गरजेचे आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते ३० वर्षांदरम्यान असावे. परीक्षा, मुलाखत, दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी या प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवारांना १००० रुपये शुल्क भरावे लागेल. तर एससी/एसटी उमेदवारांना ५०० रुपये अर्ज शुल्क भरण्याची सवलत देण्यात आली आहे .

NET Exam:‘नेट’साठी २१ फेब्रुवारीपासून परीक्षा
पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

हेही वाचा :  ICT मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, २५ हजारपर्यंत मिळेल पगार

पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. तसेच उमेदवारांना संबंधित संस्थेने दिलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे.

पदभरतीतील ५० टक्के पदे ही GATE स्कोअरद्वारे तर उर्वरित ५० टक्के पदे मर्यादित अंतर्गत स्पर्धा परीक्षा (LICE) च्या माध्यमातून भरली जाणार आहेत. निवड झालेल्या उमेदवाांना संपूर्ण देशात नोकरी करावी लागणार आहे. यासाठी बीएसएनएलची अधिकृत वेबसाइट bsnl.co.in वर जाऊन अर्ज करावा लागणार आहे. ३१ जानेवारी २०२३ ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

MITL Job: महाराष्ट्र इंडस्ट्रियल टाउनशिपमध्ये नोकरीची संधी, ‘या’ पत्त्यावर द्या मुलाखत

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …