ICT मध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी, २५ हजारपर्यंत मिळेल पगार

ICT Recruitment: मुंबईतील इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीमध्ये मुंबई (Institute of Chemical Technology Mumbai) विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

आयसीटी मुंबईमध्ये प्रोजेक्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह (Project Technical Executive), प्रोजेक्ट इंटर्न (Project Intern), प्रोजेक्ट इंजिनीअरिंग (Project Engineer) या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.

प्रोजेक्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह या पदांसाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आयटीआय फिटर आणि डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण असणे गरजेचे आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

इस्टर्न कोलफिल्डमध्ये बारावी उत्तीर्णांना संधी, ३१ हजारपर्यंत मिळेल पगार
प्रोजेक्ट इंजिनीअर पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त संस्थेतून बीई केमिकल इंजिनीअरिंगचे शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा २५ हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

HSL Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयाअंतर्गत विविध पदांची भरती
प्रोजेक्ट इंटर्न या पदासाठी उमेदवारांकडे मान्यताप्राप्त विद्यापीठ आणि संस्थेतून बीएससी केमिस्ट्रीमध्ये शिक्षण पूर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा १० हजार रुपये पगार दिला जाणार आहे.

हेही वाचा :  दहावी उत्तीर्णांसाठी पोस्टात भरती, परीक्षा न देता मुंबईत मिळेल चांगल्या पगाराची नोकरी

पदभरतीसाठी अर्ज करताना उमेदवारांनी रेझ्युमे, दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी), ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) आणि पासपोर्ट साईझ फोटो हे दस्तावेज सोबत जोडणे आवश्यक आहे.

महापारेषणमध्ये दहावी उत्तीर्णांना नोकरीची संधी
या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

Government Job साठी ‘या’ वेबसाइट्सवर अर्ज केलात तर बसेल भुर्दंड
इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपले अर्ज [email protected] या ईमेल आयडीवर पाठवायचा आहे. तर [email protected] या ईमेलला सीसी ठेवावे लागेल. यासाठी ११ मार्च २०२२ पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
पदभरतीचा तपशील पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

फिल्मसिटीमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या तपशील
TIFR Recruitment: टाटा रिसर्च सेंटरमध्ये भरती, पदभरतीचा तपशील जाणून घ्या

हेही वाचा :  CFSL Job: सेंटबँक फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये नोकरीची संधी, ६० हजारपर्यंत मिळेल पगार

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत फायरमन पदांची भरती

Pimpri Chinchwad Municipal Corporation Invites Application From 150 Eligible Candidates For Fireman Posts. Eligible Candidates …

अहमदनगर जिल्हा न्यायालय अंतर्गत सफाईगार पदांची भरती

Ahmednagar District Court  Bharti 2024 – Ahmednagar District Court Invites Application From 02 Eligible Candidates …