MCD Mayor Election : महापौर निवडणुकीत जोरदार राडा, आप-भाजप नगरसेवकांमध्ये धक्काबुक्की

Delhi MCD Mayor Election : दिल्ली महापालिकेच्या महापौर निवडणुकीत आप (AAP) आणि भाजप (BJP) नेत्यांमध्ये राडा झाला. (Political News) दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांना भिडले. (Latest Political News in Marathi) शपथ घेण्यावर झालेल्या वादात नगरसेवकांनी एकमेकांना धक्काबुक्कीही केली. नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी केल्यानं सभागृहात गोंधळ उडाला.

दिल्ली MCD-महापौर निवडणुकीत गोंधळ

दिल्ली एमसीडी-महापौर निवडणुकीत चुरशीची झाली आहे. या निवडणुकीत मोठा गोंधळ निर्माण झाला. यावेळी नगरसेवकांमध्ये हाणामारी झाली. यावेळी दोन्ही बाजूंनी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. एमसीडी महापौर निवडणुकीपूर्वी राज्य हज समितीच्या अध्यक्षपदावरुन वाद निर्माण झाला होता. याचे पडसादही यावेळी दिसून आले. दिल्लीच्या एलजीने काँग्रेसच्या नगरसेवक नाझिया दानिश यांचे नाव पाठवले आहे, असा आरोप ‘आप’कडून करण्यात आला. भाजप आणि काँग्रेसमध्ये डील असल्याचा आरोप आप आमदाराने केला आहे.

काँग्रेस निवडणुकीत तटस्थ

दिल्ली महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत लढतीत आज आम आदमी पार्टी (AAP) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) आमने – सामने आलेत. दरम्यान, या निवडणुकीत काँग्रेस तटस्थ राहिली. दिल्ली काँग्रेसचे प्रमुख अनिल चौधरी म्हणाले की, दिल्ली महानगरपालिकेतील महापौर, उपमहापौर आणि सभागृह नेतेपदाच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी किंवा भाजपला पाठिंबा न देण्याचा निर्णय पक्षाने एकमताने घेतला आहे. यावरुन आप पक्षाने काँग्रेसवर डील झाल्याचा आरोप केला. 

हेही वाचा :  'घोसाळकरांची हत्या करणाऱ्या मॉरिसला CM शिंदेंनी दिलेली पक्ष प्रवेशाची ऑफर'; '4 दिवसांपूर्वीच..'

दरम्यान, या निवडणुकीच्या दरम्यान राडा झाल्याच्या  व्हिडिओ फुटेजमध्ये आंदोलक नगरसेवक एकमेकांशी धक्काबुक्की करताना तसेच व्यासपीठावरुन माईक काढताना दिसत आहेत. पहिल्याच दिवशी जोरदार घोषणाबाजी आणि राडा पाहायला मिळाला. 

आप, भाजप नगरसेवकांनी जोरदार घोषणाबाजी 

नगरसेवकांच्या शपथविधीबाबत स्पीकरच्या निर्णयाविरोधात आप आणि भाजपचे नगरसेवक सभागृहातच भिडले नाहीत तर त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली ज्यामुळे सभागृहात गोंधळ उडाला. ‘आप’च्या नगरसेवकांच्या हातात ‘भाजप चोर है’ लिहिलेले फलक होते. 

 7 डिसेंबर रोजी झालेल्या मतमोजणीनंतर एक महिन्यानंतर महापौरपदाची निवडणूक आज झाली.  MCD निवडणुकीत 134 वॉर्ड जिंकून AAP ने नागरी संस्थेतील भाजपची 15 वर्षांची सत्ता संपवली. भारतीय जनता पक्षाने (भाजप) 104 वॉर्ड जिंकून दुसरे स्थान पटकावले, तर 250 सदस्यांच्या पालिका सभागृहात काँग्रेसने नऊ जागा जिंकल्या आहेत. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

NCERT मध्ये पदवीधरांना नोकरी; लेखी परीक्षा नाही! 60 हजारपर्यंत मिळेल पगार

NCERT Job 2024 : पदवीधर असून चांगल्या पगाराची नोकरी शोधताय? मग तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट …

मतदान करायचंय पण आधार, पॅनकार्ड सापडत नाही? तब्बल 12 ओळखपत्रांना आहे मान्यता

ECI Lists Out 12 Identity Proofs : राज्यात लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील दोन टप्प्यातील …