ऐन दिवाळीत SBI कडून निराशा; काही कळण्याच्या आतच घेतला मोठा निर्णय

SBI Latest Updates : तुम्ही स्टेट बँकेचे खातेधारक असाल, तर ही बातमी तुमच्याचसाठी. देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक अशी ओळख असणाऱ्या स्टेट बँकेमध्ये फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit – FD) सुरु करणाऱ्यांचा आकडा मोठा आहे. 

सरकारी बँकांमध्ये करण्यात आलेल्या एकूण फिक्स्ड डिपॉजिट (Fixed Deposit – FD) मध्ये या बँकेचा 36 टक्के इतका वाटा आहे. अशा या स्टेट बँकेकडून कायमच खातेधारकांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवत काही निर्णय घेतले जातात. पण, आता मात्र ऐन दिवाळीच्याच दिवसांमध्ये बँकेनं अनेकांचा हिरमोड केला आहे. 

एसबीआयकडून फेब्रुवारी 2023 नंतर एफडी रिवाईज केलेल्या नाहीत. थोडक्यात एफडींवरील व्याजदरात कोणतीही वाढ बँकेकडून करण्यात आलेली नाही. किंबहुना हे दर घटवण्यातही आले नसून ते स्थिर ठेवण्यात आले आहेत. 

कोणत्या एफडीसाठी किती व्याजदर?

एसबीआयमध्ये 7 दिवस ते 45 दिवसांसाठीच्या एफडीमध्ये  3% व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आकडा 3.50 टक्के इतका आहे. 46 ते 179 दिवसांसाठीच्या एफडीवर 4.5 टक्के व्याज मिळतं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा दर 5 टक्के आहे. 1 ते 2 वर्षांसाठीच्या एफडीवर बँकेकडून 6.8 टक्के व्याज दिलं जातं. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा आकडा जास्त म्हणजेच 7.30 इतका आहे. तर, 2 ते 3 वर्षांच्या कालावधीतील एफडीवर बँक तुम्हाला 7 टक्के व्याज देते. 

हेही वाचा :  Loan Tips: कर्ज घेताना आणि फेडताना चुका होतायत? वेळीच जाणून घ्या 'या' महत्त्वपूर्ण टीप्स

3 ते 5 वर्षांदरम्यानच्या एफडीवर बँकेकडून 6.5 टक्के व्याज देते. तर, ज्येष्ठ नागरिकांसाठी व्याजदर 7 टक्के आहे. 5 ते 10 वर्षांसाठीच्या एफडीवर सर्वसामान्य नागरिकांना 6.5 तर, ज्येष्ठ नागरिकांना 7.5 टक्के इतकं व्याज दिलं जातं. 

एसबीआयकडून खातेधारकांना 400 दिवसांसाठीच्या एफडीचीही तरतूद करण्यात आली आहे.  ‘एसबीआय अमृत कलश’ (SBI Amrit Kalash)  असं या योजनेचं नाव. या एफडीवर 7.10 टक्के इतका व्याज दिला जातो. ज्येष्ठ नागरिकांसाठी हा व्यजदर 7.60 इतका आहे. एसबीआयनं व्याजदरांमध्ये कोणतीही वाढ केली नसल्यामुळे आता ज्या खातेधारकांनी व्याजाची अपेक्षा ठेवली होती त्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. 



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Loksabha : तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, देशातील ‘या’ बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

Loksabha Election 2024 : तिसऱ्या टप्प्यात म्हणजे 7 मे रोजी देशात 93 जागांवर मतदान होणार …

Loksabha : बारामतीच्या सभेत बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर, अजितदादांनी केली नक्कल, म्हणाले ‘आमच्या पठ्ठ्यानं…’

Rohit Pawar burst into tears : येत्या सात मे रोजी होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभेच्या (Loksabha Election) …