अभिनेत्री भाग्यश्रीने सांगितले तिचे ब्यूटी सिक्रेट, घनदाट केसांसाठी आणि त्वचेसाठी करते हा खास उपाय

अभिनेत्री भाग्यश्री बॉलीवूडपासून सध्या दूर असली तरी तिचं ग्लॅमर अजिबातच कमी झालेलं नाही. रिॲलिटी शो किंवा सोशल मिडिया या माध्यमातून ती नेहमीच तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. सोशल मीडियावर ती खूपच सक्रिय असते. भाग्यश्रीचे वय जवळ जवळ पन्नाशीच्या जवळपास पोहचली आहे.पण तीची काया अजूनही सुंदर आणि फिट पाहायला मिळत आहे. भाग्यश्रीच्या अनेक फोटोंवर अनेक जण कमेंट करु तिच्या या त्वचेचे गुपित विचारात असतात. तिच्या या पोस्टमध्ये तिने या गोष्टीचे उत्तर दिले आहे. त्वचा, केस आणि आरोग्य या तिन्ही गोष्टीसाठी तिने हा सोपा उपाय सुचवला आहे. (फोटो सौजन्य : iStock, @bhagyashree.online)

​कोरफडीचे महत्त्व

या व्हिडीओमध्ये भाग्यश्रीने कोरफडीचे महत्त्व सांगितले असून तिचा नियमित वापर केल्यास सौंदर्य आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींवर कसा परिणाम होतो, याची माहिती तिने शेअर केली आहे. कोरफड आपण घरामध्ये उगवू शकतो. सहज वाढणाऱ्या या रोपाची खूप महत्त्व आहे. कोरफडीचे आरोग्यासाठी केसांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदे होतात.

हेही वाचा :  'निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार

​त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी फायदेशीर

थंडीच्या दिवसांत त्वचेचा कोरडेपणा घालवून त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी कोरफडीचा चांगला उपयोग होतो. यामुळे त्वचेवर कोणतेही व्रण राहत नाहीत. त्याच प्रमाणे पिगमेंटेशन आणि ॲक्ने कमी करण्यासाठीही नियमित कोरफड लावणे फायद्याचे ठरते.

भाग्यश्रीने सांगितले कोरफडीचे महत्त्व

​लांबसडक केसांसाठी रामबाण उपाय

केसांना कलरिंग केल्यानंतर त्यांच्यामध्ये एक प्रकारचा ड्रायनेस, कडकपणा दिसतो. तो कमी करून केसांना मऊ करण्यासाठी कोरफड लावावी. त्याच प्रमाणे केसांवर केलेल्या केमिकलच्या वापरामुळे केसांचे नुकसान होते अशात तुम्ही कोडफडीचा वापर करु शकता. (वाचा :- Hair Fall Solution : ८ दिवसात केसांचं गळणं होईल कमी,घनदाट केसांसाठी Baba Ramdev नी सांगितले खास उपाय)

​अनेक आजारांवर ओषधी

जर तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी कोरफड उपयुक्त ठरते. तसेच कोरफडीचे नियमित सेवन रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करते. (वाचा :- केस गळणं थांबण्यासाठी रामदेव बाबांनी सांगितले खास उपाय, केस भराभर वाढतील)

​कोडफडीचे असे करा सेवन

हे सगळे फायदे मिळविण्यासाठी कोरफडीचा कसा वापर करावा, हे देखील तिने सांगितले आहे. त्यासाठी १ टेबलस्पून कोरफडीचा गर एक ग्लास पाण्यामध्ये व्यवस्थित मिसळावा आणि ते पाणी प्यावे.

हेही वाचा :  Kidney Health : उभे राहून पाणी प्यायल्यास किडनी खराब होण्याचा धोका, जाणून घ्या योग्य पद्धत |Standing and drinking water can affect your kidney health tips



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …