WhatsApp Tricks : व्हॉट्सॲपवर डिलीट मेसेजस ही पाहता येणार, वाचा कसं?

नवी दिल्ली : How to Read deleted Messages on WhatsApp : व्हॉट्सॲप या सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या इन्स्टंट मेसेजिंग ॲपवर अशा बऱ्याच ट्रिक्स आहेत, ज्या आपल्याला अजून माहित नाहीत. आता अशीच एक ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ती म्हणजे व्हॉट्सॲपवर डिलीट केलेले मेसेज पुन्हा कसे वाचायचे… तर आता व्हॉट्सॲपवर मेसेज करत असताना अनेकदा आपण एखाद्याला चुकीचा मेसेज पाठवतो. यापूर्वी याबाबत काहीही करता यायचं नाही पण आता यूजर्सकडे डिलीट मेसेजचा पर्याय आहे. पण अनेकदा डिलीट केलेल्या मेसेजमध्ये काय लिहिले आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता असते. तर हाच डिलीटेज मेसेज कसा वाचाल यासाठी काही सोप्या स्टेप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत…

व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामवर मेसेज आल्यावर तो सर्वप्रथम नोटिफिकेशनमध्ये दिसतो. अशावेळी डिलीट केलेले आणि न पाठवलेले मेसेज नोटिफिकेशनमध्ये वाचता येतात. येथे आम्ही तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्री टॅबबद्दल सांगत आहोत, जो तुम्ही खाली नमूद केलेल्या स्टेप्स फॉलो करून तुमच्या Android फोनमध्ये शोधू शकता.

स्टेप 1: सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनवर सेटिंग्ज ॲप उघडावे लागेल. आता तुम्हाला नोटिफिकेशन पर्याय निवडावा लागेल आणि नोटिफिकेशन हिस्ट्री वर टॅप करावे लागेल.

हेही वाचा :  WhatsApp वर चॅटिंगची मजा आणखी वाढणार, फॅन्सी फॉन्ट्स वापरुन कसं कराल चॅटिंग?

स्टेप2: येथे तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्री Enable करावी लागेल.

स्टेप3: आता तुम्ही WhatsApp किंवा Instagram वरील कोणताही डिलीट केलेला मेसेज नोटीफिकेसनमध्ये पाहू शकता.

(पण नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये मेसेज केवळ २४ तासांसाठी सेव्ह केले जातात. यानंतर हे कायमस्वरूपी हटवले जातात.)

आणखी एक ट्रिक
नोटिफिकेशन हिस्ट्री ही एक अतिशय प्रभावी पद्धत आहे, पण बऱ्याच फोन्समध्ये हा ऑप्शन नसतो. तर अशावेळी एक दुसरा पर्यायही आहे. तो म्हणजे WAMR. नोटिफिकेशन हिस्ट्रीमधील मेसेज २४ तासांनी गायब होत असून WAMR मध्ये मात्र मेसेज राहतो. विशेष म्हणजे तुम्हाला केवळ WhatsApp आणि Instagram वरूनच नाही तर इतर कोणत्याही मेसेजिंग ॲप्सवरून हटवलेले मेसेज या WAMR ने रिकव्हर करता येतात. तर हे कसं कराल पाहूया…

स्टेप1: सर्वप्रथम तुम्हाला Google Play Store वरून WAMR ॲप इन्स्टॉल करावे लागेल.

स्टेप2: ॲप इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्हाला काही आवश्यक परवानग्या द्याव्या लागतील जसे की नोटिफिकेशन ऍक्सेस.

स्टेप3: आता तुम्हाला ज्या ॲपप्सच्या नोटिफिकेशन्स सेव्ह करायच्या आहेत ते सिलेक्ट करावे लागतील.

स्टेप4: सेटअप पूर्ण केल्यानंतर, जेव्हाही तुम्हाला WhatsApp किंवा Instagram मध्ये हटवलेला संदेश दिसेल, तेव्हा तुम्ही WAMR ॲप मध्ये हटवलेला संदेश वाचू शकता.

हेही वाचा :  IVF करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवणे आहेत गरजेच्या, शंकानिरसरन व्हायला हवे

वाचाः WhatsApp Tricks: व्हॉट्सॲप वापरायची मजा आणखी वाढणार, फक्त या ट्रिक्स करा फॉलो

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

Weather Forecast: मुंबईसह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा; ‘या’ भागात पडणार पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : एप्रिल महिन्यापासून राज्यातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागतोय. मुंबईतही …

बारामतीच्या रणधुमाळी! प्रचारासाठी उतरल्या पॉवरफुल ‘पवार लेडीज’

Lok Sabha Election 2024 : अखेर प्रतिभा पवार या देखील बारामतीच्या रणमैदानात उतरल्यात. आतापर्यंत कधीही …