टायगर-नवाजुद्दीनच्या अ‍ॅक्शनचा धमाका, तारा सुतारियाच्या ग्लॅमरचा तडका!

Heropanti 2 Trailer : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफने (Tiger Shroff) नव्या पिढीचा ‘अ‍ॅक्शन हिरो’ म्हणून बॉलिवूडमध्ये स्वत:साठी एक हक्काचे स्थान निर्माण केले आहे. तो त्याच्या जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्ससह प्रेक्षकांची मन जिंकण्याची एकही संधी सोडत नाही. ‘वॉर’, ‘बागी’ फ्रँचायझी यांसारख्या त्याच्या स्टंट चित्रपटांनी चाहत्यांना थक्क केल्यानंतर, टायगर आता त्याच्या आगामी ‘हीरोपंती 2’साठी (Heropanti 2 ) प्रचंड चर्चेत आहे. अहमद खान दिग्दर्शित हा चित्रपट टायगर श्रॉफच्या 2014 मध्ये रिलीज झालेल्या ‘हीरोपंती’चा सीक्वल आहे. यात टायगर पुन्हा एकदा ‘बबलू’च्या भूमिकेत दिसणार आहे.

टायगर गेल्या काही काळापासून ‘हीरोपंती 2’च्या पोस्टरद्वारे त्याच्या चाहत्यांची उत्सुक वाढवत आहे. निर्मात्यांनी अखेर आज चित्रपटाच्या ट्रेलरचे अनावरण केले आहे.

पाहा जबरदस्त ट्रेलर

 


तारासोबत जमणार जोडी!

या चित्रपटात टायगर श्रॉफसोबत तारा सुतारिया (Tara Sutaria) मुख्य भूमिकेत दिसणार आहे, जिने यापूर्वी ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटात त्याच्यासोबत काम केले आहे. या दोघांव्यतिरिक्त नवाजुद्दीन सिद्दीकीही (Nawazuddin Siddiqui) या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटाचे संगीत ए आर रहमान यांनी दिले आहे, तर चित्रपटाची कथा रजत अरोरा यांनी लिहिली आहे.

हेही वाचा :  शाहरुख खानकडून अनेक गोष्टी शिकता आल्या : दीपिका पादुकोण

अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याने 2014 मध्ये ‘हीरोपंती’ (Heropanti) या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटातील रोमान्स, दमदार अॅक्शन आणि क्रितीसोबतच्या केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता लवकरच टायगर श्रॉफ या चित्रपटाच्या सिक्वेलमधून पुन्हा एकदा आपली हीरोपंती दाखवणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह – ABP Majha

Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …