नवाजुद्दीनच्या वक्तव्यानं वेधलं लक्ष

Nawazuddin Siddiqui: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या (Nawazuddin Siddiqui) अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळते. विविध चित्रपट आणि वेब सीरिजमधून नवाजुद्दीन हा प्रेक्षकांच्या भेटीस येतो. चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका साकारुन अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात करणारा  नवाजुद्दीन आता’लक्ष्मण लोपेज'(Laxman Lopez) या इंग्रजी भाषेतील चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहे. एका मुलाखतीमध्ये नवाजुद्दीन त्याच्या करिअरबाबत सांगितलं. 

ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये नवाजुद्दीननं सांगितलं, ‘मी चित्रपटात अनेक छोट्या भूमिका केल्या आहेत. मी माझ्या मेहनतीने  हे स्थान मिळवले आहेत. आजच्या काळात मला कोणत्याही परदेशी चित्रपटाने छोटी भूमिका दिली तर मी ती कधीच करणार नाही. याबाबत मी शपथ घेतली आहे. त्या चित्रपटासाठी मला निर्मात्यांनी 25 कोटी रुपये दिले तरी मी ते काम करणार नाही. मला वाटते अभिनेत्यानं कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. तुमचे काम चांगले असेल तर तुम्हाला प्रसिद्धी आपोआप मिळेल.’

नवाजुद्दीन सिद्दीकीचा आगामी चित्रपट 

‘लक्ष्मण लोपेज’ या आगामी चित्रपटामध्ये नवाजुद्दीन सिद्दीकी हा महत्वाची भूमिका साकारणार आहे. तसेच त्याचा ‘हड्डी’ (Haddi) हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटातील नवाजुद्दीन सिद्दीकीचा लूक रिलीज करण्यात आला होता. त्याच्या लूकनं अनेकांचं लक्ष वेधलं. 

हेही वाचा :  Bawaal : वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा 'बवाल' लवकरच होणार प्रदर्शित

live reels News Reels


नवाजुद्दीन सिद्दीकीच्या गँग ऑफ वासेपूर, मंटो या चित्रपटांना आणि सेक्रेड गेम्स या वेब सीरिजला प्रेक्षकांची पसंती मिळाली. नवाजुद्दीननं अनेक चित्रपटांसाठी कोट्यवधींचे मानधन घेतलं आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Haddi : हिरवी साडी, काजळ, लिपस्टिक, टिकली अन् झुमके…; अंगावर शहारे आणणारा नवाजुद्दीनचा लूक; ‘हड्डी’चे पोस्टर आऊट



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …