शाहरुख खानकडून अनेक गोष्टी शिकता आल्या : दीपिका पादुकोण

Deepika Padukone On Pathaan Success : आम्ही रेकॉर्ड तोडण्यासाठी सिनेमा बनवत नव्हतो तर लोकांचे मनोरंजन करण्यासाठी आणि चांगल्या लोकांसोबत वेळ घालवण्यासाठी सिनेमा बनवत होतो अशी प्रतिक्रिया दीपिका पादुकोनने दिली आहे. शाहरुख खानकडून (Shah Rukh Khan) अनेक गोष्टी शिकता आल्या. लोकांच्या जीवनात आनंद आणण्याच्या दृष्टीने आम्ही ‘पठाण’ सिनेमा बनवला आहे असं ती म्हणाली. ‘पठाण’ (Pathaan) सिनेमाच्या यशानंतर दीपिका पादुकोण (Deepika Padukone) पहिली प्रतिक्रिया दिली. 

जॉन अब्राहम (John Abraham) ‘पठाण’च्या यशाबद्दल प्रतिक्रिया देताना म्हणाला,”आदित्य चोप्राचे खूप खूप आभार. आदित्यने मला सिनेमात दिलेलं स्थान खूप महत्त्वाचं आहे. हे आश्चर्यकारक आहे. सिद्धार्थ आनंद यांचेही आभार. ‘पठाण’च्या माध्यमातून शाहरुखसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे”. 


जॉन अब्राहम पुढे म्हणाला, “शाहरुख (SRK) हे एका भावनेचे नाव आहे. मी दीपिकासोबत काम केले आहे. ती अप्रतिम आहे. तसेच सर्व तंत्रज्ञांचे आभार. दीपिका आणि शाहरुख दोघंही सिनेमांतील गाण्यांप्रमाणे कमाल आहेत. विशाल शेखरने अप्रतिम संगीत दिले आहे. शाहरुख चार वर्षांनी परतला आहे. शाहरुख नंबर 1 अॅक्शन हिरो आहे. हा सिनेमा दीर्घकाळ माझा सर्वात मोठा सिनेमा राहील. आम्हाला पाठिंबा देणाऱ्या संपूर्ण मीडियाचेही आभार”.

हेही वाचा :  Urfi Javed : उर्फी जावेदने केली देशाची तालिबानसोबत तुलना

सिद्धार्थ आनंद म्हणाले, “माझ्या करिअरमध्ये पहिल्यांदाच मी नाराज होतो. सिनेमा रिलीज होण्यापूर्वी मला झोप आली नाही. पहिल्यांदाच आमचा सिनेमा सकाळी सहा वाजता प्रदर्शित होत आहे. आमची प्रार्थना स्वीकारली गेली आहे”.

शाहरुख खान म्हणाला,”पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून मी माझ्या चाहत्यांना पुन्हा एकदा आनंद देऊ शकलो याचा मला आनंद आहे. मी लोकांपर्यंत आनंद पसरवू शकेन ही मनापासून इच्छा आहे आणि ‘पठाण’ सिनेमाच्या माध्यमातून मला आनंद शेअर करण्याची संधी मिळाली आहे”. 

शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा सिनेमा 25 जानेवारी 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. रिलीजच्या पाच दिवसांत हा सिनेमा 500 कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. जगभरात शाहरुखच्या ‘पठाण’ची क्रेझ आहे. 

संबंधित बातम्या

लोक म्हणाले माझे सिनेमे चालणार नाहीत, मी रेस्टोरंट उघडण्याचा विचार केला, ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुख भरभरुन बोलला



Source link

About Team Majhinews

Marathi News Headlines - Majhinews covers Latest Marathi News from India and Maharashtra. Also, Find Marathi News on Entertainment, Business, World, lifestyle, Sports and Politics. Get all Live & Breaking headlines and Mumbai, Pune & other Metro Cities. Get ताज्या मराठी बातम्या लाइव at Majhinews.in.

Check Also

सुष्मितानं मानले डॉक्टरांचे आभार; पोस्ट शेअर करत म्हणाली, ’95 टक्के ब्लॉकेज होते…’

Sushmita Sen: बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री सुष्मिता सेन (Sushmita Sen) गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक …

थोडक्यात बचावला ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीन

A. R. Ameen: प्रसिद्ध संगीतकार  ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांच्या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती …